राष्ट्रवादीचे ‘संविधान बचाव’ : सौ चुहे खाके बिल्ली चली हज को !
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : अहमद शेख
===
सौ चूहे खाके बिल्ली चली हज को ही म्हण तर तुम्ही ऐकली असेलच… असाच काहीसा प्रकार आजकाल सूरू आहे..
आज संविधान बचावसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अभियान सुरू करतंय. होय! त्याच राष्ट्रवादीनं ज्यांनी काँग्रेससोबत मिळून इतक्या वर्षांत तब्बल ७२ वेळा घटना बदलली त्यात अनावश्यक गोष्टी घुसवल्या. तीच राष्ट्रवादी ज्यांनी इतक्या दिवस सामान्यांच्या जगण्याच्या अधिकारांचीसुध्दा पायमल्ली केली. तीच राष्ट्रवादी ज्यांच्या नेत्यांना आपल्या सभेनंतर मिनीटभरसुध्दा राष्ट्रगीतासाठी उभा राहणं जीवावर येतं.
तीच राष्ट्रवादी सत्तेत राहून सर्वसामान्यांच्या संपत्तीवर, पैशावर डल्ला मारण्यात पटाईत, तीच राष्ट्रवादी जी शेतकऱ्यांच्या पाण्यात हजारो कोटीचा भ्रष्टाचार करते आणि मायबाप शेतकऱ्यांनी पाणी मागितले तर त्यांना शिवांबू पाजण्यापर्यंत मजल मारते. तीच राष्ट्रवादी जिच्या काळात नीतीन आगे आणि खैरलांजीसारखी प्रकरणे घडतात दलितांवर अनन्वित अत्याचार होतात.
हीच ती राष्ट्रवादी आहे ज्याच्या नेत्यांनी पावलोपावली संविधानाची संविधानानं घालून दिलेल्या मर्यादांची आणि सर्वसामान्यांच्या हक्कांची पायमल्ली केली.
संविधान बचाव म्हणणाऱ्यांनी आपल्या भूतकाळात कधीतरी वाकून पाहायला हवं. आपण जेव्हा सत्ताधारी होतो तेव्हा किती वेळा आपण संविधान संपवण्याचा प्रयत्न केला. केवळ नाव राष्ट्रवादी असून चालत नाही तर त्याला नावाप्रमाणे कृतीचीही जोड दिली पाहिजे.
पक्ष काढताना ऐनवेळी सुचलं म्हणून दिलं गेलेलं हे नाव असावं नाहीतर या नावाचा अर्थ आणि नावाप्रमाणे जगण्यासाठी किती त्याग करावा लागेल हे समजलं असतं, तर कदाचित धूर्त साहेबांनी ह्या नावाचा विचारही केला नसता.
राष्ट्रवाद जगावा लागतो त्याला मिरवता येतच नाही आणि जर कोणी मिरवण्याचा प्रयत्न केला तर त्याचं अध:पतन कशा प्रकारे होतं हे या स्वत:ला राष्ट्रवादी म्हणून मिरवणाऱ्या ग्रुप ऑफ बांडगुळांना एव्हाना कळलंच असेल. यांना राष्ट्रवादी म्हणताना सुध्दा लाज वाटते परंतु आता नावचं राष्ट्रवादी ठेवलंय तर म्हणावं लागेलच.
तर विषय असाय की आता हे लोक संविधान बचाव अभियान चालवणार आहेत म्हणे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांकडून संविधान बचाव नावाचं अभियान चालवलं जाणार आहे. हे ऐकून तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेला हसू तर येणारच यात काही शंका नाही.
===
हे ही वाचा – बाळासाहेब ठाकरे – शरद पवार मैत्रीचे, जनतेसमोर न आलेले महत्वपूर्ण पैलू
===
पण ज्यांनी आजपर्यंत संविधानाचा उपयोग करून घेतला तेही आपल्या सोयीप्रमाणं आजपर्यंत आपण केलेल्या कुकर्मामुळं संविधानाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याचं लक्षात आल्यानंतर ते आता संविधानाल वाचवायला निघाले आहेत.
खरंतर ह्या मंडळींचं अभिनंदन करायला हवं ज्यांना उशीरा का होईना आपली पापं लक्षात आलीत आणि ते संविधान वाचवण्याच्या निमित्तीना प्रायश्चित करण्याच्या मार्गावर आहेत. आता हे संविधान वाचवताना, आपण कशाप्रकारे संविधानाच्या मर्यादा भंग केल्या दादागिरी करून जनतेची कशाप्रकारे लूट केली आपल्या एकूण एक पापांचा पाढा देखील सर्वसामान्यांसमोर वाचावा एवढीच अपेक्षा.
एवढ्या वर्षांची आपल्या हातात असणारी सत्ता एका लाटेनं जणू हिसकावून घेतली. नुसती हिसकावून घेतली नाही या वादळामुळं या मंडळींना पळताभुई थोडी झाली.
आणि केवळ आपल्या हातातून सत्ता गेली नाही तर मान,सन्मान आणि वारेमाप असणारे अधिकारही आपल्या हातून निसटल्याचं लक्षात आलं आणि आपण ज्या दंडेलशाहीचा वापर करायचो तो आपल्याला संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि आता तो अधिकार आपण वापरू शकत नाही हे लक्षात आल्यावर यांना वाटू लागलंय की संविधान धोक्यात आलंय आणि त्याला आपण वाचवलं पाहिजे.
हे जरी हास्यस्पद असलं तरी सध्याच्या त्यांच्या अभियानाचं याच्यापेक्षा चांगलं वर्णन तरी अजून काय करावं कारण जे संविधानानं अधिकार दिलेत ते तर त्यांनी सर्वसामन्यांकडून कधीच हिरावून घेतले आहेत त्यामुळे सर्वसासामान्यांसाठी संविधान वाचवा म्हणण्याची ह्यांची लायकी तरी आहे काय? हा प्रश्न तर पडणारचं.
मग ह्यांच संविधान बचाव कोणासाठी म्हणायचं तर त्याचं उत्तर असंय की, सगळ्यात पहिलं आमचा सत्तेचा अधिकार, भ्रष्टाचाराचा अधिकार, आमच्या ठेकेदारांचा बेकायदा वाळू, केमिकल, केरोसिन, पेट्रोल,डिजेल,स्मगलिंग, खंडणी, अपहरण इत्यादी आणि अशा अनेक काळ्या गोष्टी करण्याचा अधिकार.
दलित, मुस्लिम, मराठा अशा जातीय समीकरणातून राजकारण करण्याचा अधिकार, दंगली घडवण्याचा अधिकार, नेहमीच दलितांना राजकीय इच्छाशक्तीसमोर गुडघे टेकवायला लावण्याचा अधिकार, शेतकऱ्यांना दरिद्र अति दरिद्र बनवण्याचा अधिकार, कृषिमंत्री म्हणून आपण काही केलं नाही किंवा जे केलं ते केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं अशा प्रकारचे अधिकार, ज्या ज्या गद्दारांनी देश विकायला काढला अशा लोकांना साथ देण्याचे अधिकार आणि हे सर्व अधिकार परत मिळवण्यासाठी साहेबांची ही पलटन आता कामाला लागलीय.
आणि त्याला संविधान बचाव अशा प्रकारचं गोंडस नाव दिलं गेलंय.
आता ह्यांना कोण समजावणार की हे अधिकार संविधानानं दिलेलं नसून अशानं संविधानाची पायमल्ली होईल. संविधानानं दिलेल्या अधिकारांचं हनन करणं हा यांचा अधिकार आणि तो मोदी आणि फडणवीस सरकारनं अर्थात भाजप सरकारनं हिरावून घेतला. मग यासाठी आंदोलने, अभियाने तर होणारच.
कोणत्याही राजकीय हेतून प्रेरित झालेली गोष्ट मग ती आंदोलन, अभियान किंवा मग सामाजिक काम असू देत त्यामागे एक छुपा अजेंडा हा लपलेला असतो.
राष्ट्रवादीच्या संविधान बचाव मागे अशाच काही प्रकारचे अजेंडे आपल्याला पाहायाला मिळतील.
पहिला- गमावलेला जनाधार परत मिळविण्यासाठी प्रयत्न करणे.
दुसरा- अजित पवारांसारख्या नेत्यांने उधळलेल्या मुक्ताफळांमुळे महिलांची राष्ट्रवादीप्रति असलेली नाराजी दूर करणे.
तिसरा- कोरेगाव भीमा सारख्या आणि अन्य काही हेतुपुरस्सर घडविलेल्या दंगली तसंच मराठा मोर्चांच भांडवल करून मुस्लिम आणि दलितांना पुन्हा आपल्या पक्षाकडे आकर्षित करणे.
संविधान तर केवळ नावाला वाचावयचंय. शरद पवारांसारख्या दूरदृष्टी असलेल्या आणि अगम्य राजकीय इच्छाशक्ती असणाऱ्या नेत्याला हे तर नक्कीच माहीती असणार की, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाची निर्मीती आपल्या संपूर्ण आयुष्याचं कर्तृत्व आणि प्रतिभा पणाला लावून केली. त्या संविधानाला बुडवणं किंवा संपवणं हे या आणि येणाऱ्या अनेक शतकांत शक्य नाही.
मग हे अभियान म्हणजे केवळ आपली राजकीय पोळी भाजण्याचा गरमागरम कार्यक्रम आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही हे वाचकांनी आणि सर्वसामन्य मतदारांनी लक्षात ठेवावं एवढीच अपेक्षा…
===
हे ही वाचा – शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाही: इतिहास माहित नसणाऱ्यांसाठी विशेष “धागा”
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.