' खरं बोलण्याचे हे फायदे माहिती आहेत का तुम्हाला? – InMarathi

खरं बोलण्याचे हे फायदे माहिती आहेत का तुम्हाला?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्याला लहानपणी पासूनच हे शिकवलं जातं की नेहमी खरे बोलावे, खोटं कधी बोलू नये. आपल्यावर तसेच उत्तम संस्कार करण्यात येतात. पण तरी देखील आपण खोटं बोलतोच. खरे बोलणे ही केवळ एक चांगली सवयच नाही तर ह्याने तुमचे जीवन अधिक सुखकर होते. आपल्याला असं वाटत असतं की जर खोटं बोलून आपलं काम होत आहे तर कशाला उगाचंच खरे बोलून ते बिघडवावे.

त्यामुळे आपण कसलाही विचार न करता सर्रास खोटं बोलून मोकळे होतो. खोटे बोलण्याने जरी तेवढ्या वेळेपुरता आपल्याला फायदा होत असला तरी ही सवय चुकीचीच आहे. तर ह्याउलट खरे बोलण्याने तुमचं आयुष्य अधिक चांगलं होऊ शकतं.

 

smiling-face-inmarathi

 

जे लोक नेहमी खरे बोलत असतात त्यांचा स्वभाव हा साधासरळ असतो. अश्या स्वभावाच्या लोकांपासून लोक प्रभावित होतात. कारण अश्या लोकांच्या बोलण्यात आणि वागण्यात कुठल्याही प्रकारचं कपट, कटकारस्थान, खोटारडेपणा नसतो. असे लोक खोटं बोलून आपलं काम काढून घेण्याऐवजी खरे बोलणे पसंत करतात. त्यामुळे असे लोक इतरांना जास्त आवडतात.

 

truth-inmarathi02
cortijocalonge.es

 

आजकालच्या पिढीचं आयुष्य हे खूप च कमी झालं आहे. कमी वयाचा संबध हा तणाव, चिंता, भीती आणि असुरक्षा अश्या भावनांशी असतो. ज्यामुळे व्यक्तीला आजार जडतात आणि परिणामी त्याचा प्रभाव आयुष्यावर आणि वयावर होतो. तेच खरे बोलणाऱ्या व्यक्ती ला कुणाचीही भीती नसते.

खोटं बोलण्यामुळे येणारा तणाव आणि भीती देखील त्याला नसते. अश्या प्रकारची व्यक्ती ही आपले जीवन अधिक संतुष्टपणे जगत असते, तसेच ती इतरांच्या तुलनेत अधिक निरोगी जीवन जगते.

 

truth-inmarathi04
certainlyher.com

 

खरे बोलणाऱ्या व्यक्तीचे जीवन हे खोटं बोलणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक आनंददायी असते. तिला कुठलीही चिंता अथवा भीती नसल्याने ती जीवनातील लहान लहान क्षणांचा आनंद घेऊ शकते.

 

peaceful mind inmarathi
awarenessjunkie.com

 

खरे बोलणाऱ्या व्यक्तीचे मन हे अशांत नसून शांत असते. आजकालच्या जीवनशैली मुळे, कामाच्या भारा मुळे लोकांचे मन खूप अशांत झाले आहे. अनेक लोक विनाकारण, नेहमी तणावाखाली जगत असतात. एकदा जर तुम्ही खोटं बोललात तर तुम्हाला ते सिद्ध करण्यासाठी किंवा खरं लपविण्यासाठी आयुष्यभर खोटंच बोलावं लागतं.

पण नेहमी सत्याच्या बाजूने असणाऱ्या व्यक्तीचे मन हे नेहमी शांत असते कारण तिला खरं लपविण्याचा विचार सतावत नसतो. स्थिर आणि शांत मन असणारी लोक जीवनात अधिक यशस्वी देखील होतात.

 

ratan-tata-inmarathi

 

खोटे बोलून जिथे आपल्याला तणाव, भीती, नेहमी खरे लपविण्याचा दोष या सर्व गोष्टी मनात राहतात, तिथे खरे बोलून आपण तणावमुक्त आणि स्वच्छंदी जीवन जगू शकतो, जे अधिक आनंदी असेल…

खोटं बोलण्यामुळे कदाचित क्षणिक फायदा मिळेलही, मात्र त्याचा लाभ कायम टिकत नाही. हे खोटं बाहेर न येण्याची भीती कायम आपल्या मनात राहते. खरं बोलण्याची सवय नेहमीच फायद्याची ठरते. काहीही लपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कुठल्याही तणावाखाली राहण्याची गरज पडत नाही.

सत्य आणि अहिंसेचे तत्वज्ञान महात्मा गांधींनी सांगितले त्याची कालसुसंगतता आजही अबाधित आहे. जो मनुष्य सत्याचा मार्ग पत्करतो त्याचाच अंतिम विजय होतो. ज्याच्या उक्तीत आणि कृतीत खोटं असतं त्याला त्याचा पश्चात्ताप होतो. यशस्वी आणि विजयी होण्यासाठी त्या महात्म्याला स्मरून खरे बोलण्याचा संकल्प करूयात..!

 

mahatma-gandhi-inmarathi
biography.com

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?