' यशस्वी आयुष्य जगायचंय ? या गोष्टी आचरणात आणल्या तर ते जास्त अवघड नाही.. – InMarathi

यशस्वी आयुष्य जगायचंय ? या गोष्टी आचरणात आणल्या तर ते जास्त अवघड नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आयुष्यात अनेकदा असं होतं जेव्हा आपण कुठलाही विचार विनिमय न करता कुठला तरी निर्णय घेतो. आणि मग आपल्याच चुकीच्या निर्णयावर आपण आयुष्यभर पश्चाताप करत बसतो. त्यामुळे कधीही कुठलाही महत्वाचा निर्णय हा घाईघाईने घेऊ नये.

पण कधीकधी आपण खूप उत्साही होऊन एखादा चुकीचा निर्णय घेतो. त्यावेळी जरा संयम बाळगणे गरजेचे असते. पण आपण अश्या चुका करण्यापासून वाचू शकतो, फक्त त्यासाठी काही नियम पाळावे लागतील.

प्रार्थना करण्याआधी विश्वास ठेवायला शिका :

 

learn to live-inmarathi01

 

जेव्हा केव्हा आपल्याला खूप हताश निराश वाटतं तेव्हा आपण सर्वात आधी मंदिराची पायरी चढतो. देवाकडे प्रार्थना करतो की आपल्याला त्या संकटातून निघण्याचा मार्ग दाखवावा.

पण तरी देखील आपल्याला आपल्या श्रद्धेवर पूर्णपणे विश्वास नसतो, त्यामुळे आपल्याला शाश्वती नसते की सर्व ठीक होऊ शकतं. पण खरे पाहता जर आपण देवावर श्रद्धा ठेवत असू तर आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवायला देखील शिकलं पाहिजे.

बोलण्याआधी नीट ऐकायला शिका :

 

learn to live-inmarathi02
theblaze.com

 

आपल्या आस पास अनेक असे लोक असतात ज्यांना निव्वळ बडबड करता येते, म्हणजे ते कधीही कोणाचं ऐकून न घेता स्वतःच बोलत बसतात. अशी अनेक लोक आपण बघत असतो.

पण कधीही बोलायच्या आधी समोरची व्यक्ती काही बोलू इच्छिते का हे जाणून घेणे देखील गरजेचे आहे. म्हणजे विनाकारण बोलण्याआधी समोरच्याचं ऐकून घ्यावं. ह्याने तुमच्या ज्ञानात तर भर पडते, तसेच लोक तुमच्यापासून दूर न जाता जवळ येतात. तुम्हाला इतरांबद्दल जाणून घेखील घेता येते.

पैसे खर्च करण्याअगोदर कमवायला शिका :

 

learn to live-inmarathi03
corecommunity.vn

 

आजच्या आधुनिक जगात लोक विनाकारण खर्च करत फिरतात. कुठल्याही गोष्टीवर पैसे खर्च करण्याआधी विचार करत नाही. त्यातच आजच्या तरुण पिढीला पैश्याचं तसं फारसं महत्व राहिलेलं नाही.

कारण त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी कधीही कुठल्याही गोष्टीची कमी होऊ दिलेली नसते. त्यामुळे त्यांना पैश्याचे महत्वच कळलेले नसते. पण आई-वडील तुम्हाला आयुष्यभर सांभाळू शकत नाही त्यामुळे खर्च करण्याअगोदर कमवायला शिकले पाहिजे. आणि पालकांनी देखील वेळेतच मुलांना पैश्यांचे महत्व समजावून द्यायला हवे.

अपयश स्वीकारण्याआधी प्रयत्न करयला शिका :

 

Young man climbing up a mountain.
bodyforwife.com

 

अनेकदा आपण पूर्ण प्रयत्न करत नाही आणि मग अपयश स्वीकारून स्वतःच स्वतःला समजतो की ते आपल्यासाठी नव्हतं. जे अत्यंत चुकीचे आहे. कुठल्याही गोष्टीवर गिव्ह अप करण्याआधी पुरेपूर प्रयत्न करायला शिका, स्वतःकडून बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. गिविंग अप करणे हा उपाय नाही. म्हणून अपयश स्वीकारण्याआधी एक शेवटचा प्रयत्न नक्की करून बघा.

मरण्याआधी जगायला तर शिका :

 

learn to live-inmarathi
huffingtonpost.com

 

अनेकांना ही सवय असते की ते आजचा कमी आणि उद्याचा जास्त विचार करतात. म्हणजे भविष्याचा विचार जास्त करतात. पण आपण उद्याच्या फिक्रीत आपला आज वाया घालवतो आहे खे खूप कमी लोकांच्या लक्षात येते. उद्या आपण असू नसू कोणाला माहित, म्हणून आजचा दिवस आत्ताची वेळ जगायला शिका. उद्याच्या चिंतेत रोज थोड थोड मारण्यापेक्षा आजमध्ये जगायला शिका.

जर ह्या काही नियमांचे पालन तुम्ही तुमच्या जीवनात केले तर तुमच्या आयुष्यात नक्कीच एक प्रभावी बदल घडून आल्याचं तुमच्या लक्षात येईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?