' या समाजाची विचित्र लिव्ह-इन प्रथा; आधी मुलांना जन्म, नंतर लग्न… – InMarathi

या समाजाची विचित्र लिव्ह-इन प्रथा; आधी मुलांना जन्म, नंतर लग्न…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या आपल्या देशात परदेशी संस्कृतीचं एक वेगळच फॅड आलं आहे ते म्हणजे लीव्ह इन रिलेशनशिप! याचा अर्थ म्हणजे लग्न न करता एकत्र राहणं!

मुळात ही गोष्ट कितीही सोपी वाटत असली तरी तितकीच धोकादायक आहे, आणि मुळात आपल्या देशातल्या कल्चर मध्ये अजिबात न पटणारी आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अहो, आपल्या इथे लग्न ठरलेलं असलं तरी घरचे  नवऱ्या मुला मुलीला फिरायला पाठवत नाहीत तर एकतरा राहणं तर सोडाच! आणि त्यामागे काही ठोस आणि अत्यंत महत्वाची कारणं आहेत!

हाच फरक आहे स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधला, आणि आजकाल जास्तीकरून शहरी भागात हा प्रकार फारच बोकाळला आहे! 

 

Couple in Temple Inmarathi

 

 

पण तुम्हाला माहीत आहे का हा प्रकार गावाकडच्या एका भागात एक प्रथा म्हणून मानला जातो! आणि या गावात तर लग्नाआधी एकत्र राहणंच नव्हे तर याच्याही पलीकडे ही प्रथा आहे!

या गावातल्या मुलीला मुल झाल्यावर ठरतं की तिचा लग्न लावायच की नाही? चला तर जाणून घेऊया त्या अजब प्रथेबद्दल!

जर कुठली मुलगी लग्नाआधी आई झाली तर? आपल्या इथे तर ह्याला पाप म्हटलं जातं, हे आपल्या संस्कृती, परंपरेच्या विरोधात आहे.

लग्नाआधी आई होणे तर खूप दूर राहिलं इथे तर एखाद्यावर लग्नाआधी सोबत राहणंही शक्य गैर मानलं जातं.

आता त्यात बऱ्यापैकी सुधारणा होऊन आपला समाज आता हळूहळू प्रेम विवाहांना मान्य करू लागला आहे.

पण तरी जे लोक विवाहाआधी सोबत राहतात त्यांच्याकडे एका वेगळ्याच नजरेने आजही बघितले जाते. आणि का? तर ती आपली संस्कृती नाही म्हणून.

 

pregnanat Indian Inmarathi

हे ही वाचा – “पहिल्या रात्रीची ‘ही’ विचित्र प्रथा” जी बंगालमध्ये आजही पाळली जाते!

असो. पण आज आम्ही तुम्हाला एका अश्या समाजाबाबत सांगणार आहोत ज्यांच्यामध्ये लग्नापूर्वी सोबत राहणेच नाही तर मुलं जन्माला घालणं देखील वैध समजलं जातं. तशी परंपराच आहे त्यांची.

आणि बर का, ही परंपरा पाश्चात्य देशांची नाही! आपल्याच देशातील आहे. आपल्याच देशातील एका समाजात लग्नापूर्वी मुलं-मुली सोबत राहतात मुल-बाळ जन्माला घालतात आणि मग ठरवितात लग्न करायचं की नाही.

 

garatia-tribe-woman-inmarathi01

हे ही वाचा – प्रेम करण्याची क्षमता सर्वसाधारण व्यक्तींपेक्षा आदिवासी लोकांमध्ये अधिक! कोणत्या आदिवासींमध्ये?

या समाजात विवाहपूर्वी मुल जन्माला घालणे शुभ मानलं जातं. जर लग्नाआधी मुल जन्माला घातलं नाही तर तो अपशकून मानला जातो.

ही परंपरा आहे आपल्या देशातील राजस्थान येथील. राजस्थान येथील उदयपुरच्या सिरोही आणि पाली येथे राहणारा गरासिया समाज मागील १००० वर्षापासून ही परंपरा निभावत आलेला आहे.

ही परंपरा म्हणजे आजच्या लिव्ह इन रिलेशनशिप सारखीच आहे. ह्या समाजात २ दिवसांचा विशेष विवाह मेळा भरविण्यात येतो. ह्या मेळ्यात मुलगा आणि मुलगी दोघेही एकमेकांना पसंत करतात आणि लग्नाशिवाय एकत्र राहू लागतात.

त्यानंतर ते मुलांना जन्म देतात आणि त्यानंतर लग्न करायचं की नाही हे ठरवितात. हे सर्वस्वी त्यांच्या इच्छेवर अवलंबून असते. इथे त्यांना स्वतःचा सोबती निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते.

 

garatia-tribe-woman-inmarathi

 

गरासिया समाजाच्या मान्यतेनुसार, खूप वर्ष आधी या समाजातील चार भावंड दूर कुठेतरी जाऊन राहू लागले. ह्यापैकी तिघांनी लग्न केले तर चवथ्या भावाने लग्न न करता मुलीसोबत राहण्यास पसंती दिली.

त्यानंतर जो भाऊ लिव्हइन मध्ये राहत होता त्याला तर मुले झाली पण इतर विवाहीत भावांना मात्र मुले झाली नाहीत.

तेव्हापासूनच हे लोक ही परंपरा जपतात. ह्या प्रथेला “द्रापा प्रथा” म्हटले जाते.

 

garatia-tribe-woman-inmarathi03

हे ही वाचा – ‘लोकशाही’ देश असलेल्या ब्रिटनच्या ‘शाही’ कुटुंबाने बनवलेले विचित्र नियम आजही पाळले जातात!

गरासिया समाजाच्या स्त्रियांना जर दुसऱ्या मेळ्यात आणखी कुठला तरुण आवडला तर त्यांना त्या तरुणासोबत राहण्याचे स्वातंत्र्य देखील असते.

म्हणजे ती स्वतःसाठी दुसरा लिव्ह इन पार्टनर देखील निवडू शकते.

पण ह्यासाठी त्या तरुणाला पहिल्यापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. येथील काही लोक तर वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर उभे असताना लग्न करतात, तर काहींचे लग्न हे त्यांच्या मुलांसोबत होते.

एवढचं नाही तर ह्या विवाहाचा संपूर्ण खर्च हा मुलाच्या घरचे करतात आणि लग्नही मुलाच्याच घरून होते.

 

garatia-tribe-woman-inmarathi02

 

आपलाच देश जिथे एकीकडे प्रेमविवाह हा अमान्य, अनैतिक समजला जातो. लग्नाआधी जर समजा कुठली मुलगी गरोदर झाली तर ती चारित्र्यहीन असल्याचं मानलं जातं!

जिथे लिव्ह इन रिलेशनशिप आजही संस्कृतीचा अपमान मानला जातो. तिथेच दुसरीकडे एक असा समाज आहे जो ह्या सर्व गोष्टी वैधच मानत नाही तर त्याचं स्वातंत्र्यही देतो.

होय, ही एक अत्यंत चक्रावून टाकणारी गोष्ट आहे, म्हणजे ज्या गोष्टीचा सुशिक्षित, सुसंस्कृत समाज टोकाचा विरोध करतो तीच गोष्ट ही गावाकडची लोकं अत्यंत आनंदाने स्वीकारतात!

तुमच्याही माहितीत अशी कोणती आणखीन ठिकाणं असतील जिथे असा किंवा तत्सम प्रथा असतील तर त्यांच्याविषयी कॉमेंट मध्ये आम्हाला जरूर कळवा!

===

हे ही वाचा – नवरा घरकामात मदत करणं घटस्फोटाचं कारण? संशोधनानंतरचा विचित्र निष्कर्ष…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?