' धोकादायक ते सुरक्षित : ‘आग लावण्या’च्या गोष्टीच्या शोधाची रंजक कथा – InMarathi

धोकादायक ते सुरक्षित : ‘आग लावण्या’च्या गोष्टीच्या शोधाची रंजक कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आगपेटीचा शोध हा अतिशय सोयीस्कर असा आहे, ज्यामुळे कुठल्याही प्रकारची मेहनत न करता आग पेटवता येऊ शकते. आजच्या काळी आगपेटी ही प्रत्येकाच्या घरी कामात येणारी वस्तू आहे.

मेणबत्ती लावायची असेल नाहीतर लायटर खराब झालं असेलं तरी आपण आगपेटीचा वापर करतो. म्हणजे ज्याने कोणी ह्या आगपेटीचा शोध लावला असेल त्याने खरंच खूप मोठं काम केलं. आज ह्या आगपेटीचा अनेक ठिकाणी अनेक प्रकारे वापर केला जातो.

पण ह्या आगपेटीचा शोध कसा लागला हे तुम्हाला माहित आहे का? पहिली आगपेटीची काडी कशी तयार झाली, त्याचा शोध कोणी लावला हे तुम्हाला माहित आहे का?

 

John_Walker-matches InMarathi

 

त्याआधी आपण हे जाणून घेऊ की, आज जी माचिस आपण वापरतो ती कशी तयार केली जाते. तर त्यासाठी सर्वातआधी लाकडाची एक काडी तयार केली जाते. त्यानंतर त्या काडीचा टोकाचा भाग हा वितळलेल्या मेणात किंवा गंधकात बुडवला जातो.

त्यावर लाल फॉस्फरसचे मिश्रण लावले जाते. पण ह्या काडीने आग निर्माण करण्यासाठी त्या काडीला आगपेटीवर लावलेल्या रसायनावर घासणे गरजेचे असते. त्यातूनच अग्नीची निर्मिती होते.

 

match-box InMarathi

 

पण आधीच्या काळातील आगपेटीची काडी अशी नव्हती. ३१ डिसेंबर १८२७ ला ह्या आगपेटीचा शोध लावण्यात आला. ह्याचा शोध ब्रिटीश वैज्ञानिक जॉन वॉकर ह्यांनी लावला. पण जॉन वॉकर ह्यांनी शोध लावलेल्या आगपेटीच्या काडीला पेटविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागायची. आणि ह्याचा वापर करणे देखील कठीण आणि तेवढेच धोकादायक देखील होते.

 

match-box 1 InMarathi

 

ह्या आगपेटीच्या काडीला तयार करण्यासाठी लाकडाच्या काडीवर अँटीमनी सल्फाईड, पोटॅशिअम क्लोरेट, बाभूळाच्या झाडाचे डिंक किंवा स्टार्च लावला जातो. ह्यातून आगीची निर्मिती करण्यासाठी ह्याला रेगमाल वर घासावं लागायचं ह्यामुळे मसाला जळायचा पण ह्यामुळे ह्यात कमी प्रमाणात स्फोट व्हायचे जे कुठल्याही परिस्थितीत घातक होते.

तसेच गंधकाच्या जळण्याने ह्याचा दुर्गंध अतिशय असहनीय असायचा.

 

match-box 2 InMarathi

 

ह्याचा धोका कमी करण्यासाठी ह्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या. १८३२ साली फ्रान्समध्ये अँटीमनी सल्फाईडच्या जागी फॉस्फोरसचा वापर करण्यात आला, ज्यामुळे ह्याची दुर्गंधी दूर झाली.

पण ह्या आगपेटीच्या काडीला पेटविल्यानंतर त्यातून जो धूर उठायचा तो खूप विषारी होता. ह्यामुळे कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना रोगाची लागण होऊ लागली. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

ह्यानंतर १८५५ साली स्वीडन येथील एका ट्यूबकरने दुसऱ्या रासायनिक पदार्थांच्या मिश्रणातून एक सुरक्षित अशी आगपेटीची कडी तयार केली. जिचा वापर आपण आजही करतो.

 

Matches-inmarathi
clarksvilleonline.com

 

भारतात आगपेटीचे निर्माण कार्य १८९५ सालापासून सुरु झाले. पण ही आगपेटी विदेशी होती. १९२७ साली शिवकाशी येथे नाडार भावंडांनी स्वदेशी आगपेटीचे उत्पादन करण्यास सुरवात केली, ज्याचा पहिला कारखाना हा अहमदाबाद येथे सुरु झाला. आणि अश्या प्रकारे आपल्या देशात ह्या आगपेटीचा वापर सुरु झाला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?