' नेदरलँडच्या पंतप्रधानांचा आदर्श भारतातील प्रत्येक व्यक्तीने घ्यायला हवा.. – InMarathi

नेदरलँडच्या पंतप्रधानांचा आदर्श भारतातील प्रत्येक व्यक्तीने घ्यायला हवा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपले नेतेच नाही तर त्यांचे कार्यकर्तेही समाजात असे वावरत असतात जणू काही हा देश त्यांच्याच हातात आहे. बाकी सर्वांना ते स्वतःपेक्षा तुच्छ दर्जाचे असल्यासारखे वागणूक देतात.

पण इतर देशांत ह्यापेक्षा खूप वेगळा सीन बघायला मिळतो. जिथे पंतप्रधान दर्जाची व्यक्ती देखील सामान्य व्यक्तीप्रमाणे वावरत असते.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा हे ह्याचं सर्वात मोठं आणि उत्तम उदाहरण होतं. त्या पाठोपाठ आता नेदरलँडच्या पंतप्रधानांचा एक असाच व्हिडीओ वायरल झाला आहे.

 

mark rutte-inmarathi
politico.eu

सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ वायरल होत आहे. ज्यात मार्क हे जमिनीवर त्यांच्या हातून सांडलेली कॉफी पुसताना दिसून येत आहेत.

पंतप्रधान Mark Rutte हे पार्लमेंटमधून बाहेर येत होते. तेव्हा गेट वर त्यांच्या हातून त्यांचा कॉफी मग खाली पडला आणि त्यातली कॉफी सांडली.

तेव्हा पंतप्रधानांनी कुठलाही विचार न करता मॉप मागवला आणि स्वतःच ती सांडलेली कॉफी पुसायला सुरवात केली. गेटवर उडालेले कॉफिचे शिंतोडे देखील त्यांनी स्वतः साफ केले.

ह्यादरम्यान तेथे उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या देखील वाजवल्या.

हा व्हिडीओ पाकिस्तानी पत्रकार हामिद मीरने ट्विटरवर शेअर केला आणि त्यांच्या साधेपणाचे कौतुकही केले. ह्या व्हिडीओला अनेकदा री-ट्वीट केले गेले.

लोकांनी पंतप्रधान मार्क ह्यांची खूप प्रशंसा केली. एवढचं नाही तर लोकांनी आपल्या देशातील नेत्यांना मार्क ह्यांचा आदर्श ठेवण्याचा सल्ला देखील दिला.

 

mark rutte-inmarathi01
india.com

Mark Rutte हे खूप लोकप्रिय आहेत. तेथील लोकांना त्यांचा साधेपणा विशेषकरून आवडतो.

पंतप्रधान Mark Rutte हे पंतप्रधान कार्यालयात सायकलने जातात. एवढंच नाही तर ते जेव्हा तिथल्या राजाला भेटायला गेले होते तेव्हा देखील ते सायकलनेच गेले होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?