निरोगी आयुष्य जगायचंय? जेवणानंतर या पाच गोष्टी चुकूनही करू नका!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लहानपणी जेव्हा सायंकाळी आई “जेवण करून घे रे… जेवण करून घे रे” म्हणून मागे लागायची तेव्हा तिला एकच उत्तर मिळायचं, ‘मी बाबा सोबत जेवण करीन’…
मग रात्री उशिरा बाबा कामावरून येणार आणि त्यानंतर त्यांच्यासोबत जेवण करणार आणि त्यांच्याच कुशीत झोपणार. आता मात्र रात्री जेवायला बाबांची वाट बघत नसलो तरी जेवण हे उशिराच होतं.
रात्री उशिरा जेवण्यासाठी तेव्हा बाबांसोबत जेवायचं आहे हे कारण असायचं, तर आता कामाचं कारण आहे.
==
हे ही वाचा : व्यायाम आणि डाएटशिवाय तुम्ही प्रदीर्घ निरोगी आयुष्य जगू शकता! कसं? जाणून घ्या…
==

कामाच्या व्यस्ततेमुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांची एकच दिनचर्या झाली आहे. सकाळी उठलं की ऑफिसला जायचं, दुपारी कामं पूर्ण झाली की जेवायचं, सायंकाळी उशिरा घरी यायचं आणि मग १०-११ वाजता जेवून झोपी जायचं. बाकी कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळचं नसतो.
त्यामुळे कळत नकळत आपल्याला काही सवयी जडल्या गेल्या आहेत. ज्या कदाचित आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतात. जसे की काही लोकांना जेवण झाल्यावर चहा पिणे, झोपणे अश्या वाईट सवयी असतात. हो वाईटच… कारण त्या आपल्या शरिरासाठी खूप घातक असतात.
त्यामुळे आज आपण जेवण झाल्यावर कुठल्या गोष्टी करू नये हे जाणून घेणार आहोत.
थंड पाणी पिणे :

जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी पिणे हे तसे आरोग्याच्या दृष्टीने वाईटच समजले जाते, त्यामुळे जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे असा सल्ला डॉक्टर देतात.
पण तरी काही लोकांना ते जमत नाही. त्यामुळे तुम्ही जेवण झाल्यावर थोडं पाणी पिऊ शकता हाही पर्याय डॉक्टर देतात. पण काही लोकांना अति थंड पाणी पिण्याची सवय आहे. जी अतिशय चुकीची आहे. जेवण झाल्यावर कधीही खूप थंड पाणी पिऊ नये. ह्याने तुमच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो.
==
हे ही वाचा : चिडचिड, उदासीनता दूर ठेवण्यासाठी ही एक सवय लावून घ्या आणि निरोगी आयुष्य जगा
==
एवढचं नाही तर ह्यामुळे आर्टरीज ब्लॉक देखील होऊ शकतात.
सिगारेट ओढणे :

जेवणाआधी किंवा नंतरच नाही तर कुठल्याही परिस्थितीत सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी धोकादायकच आहे. अनेकांना जेवण झाल्यानंतर लगेच सिगारेट ओढण्याची तल्लफ येते, पण ही एक अतिशय घातक सवय आहे. जेवण झाल्यावर लगेच सिगारेट ओढल्याने तुमच्या शरीराला खूप नुकसान पोहोचू शकते.
फळे खाणे :

फळे खावीत, ती आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतात. त्यांच्या सेवनाने सुदृढ आयुष्य आणि सौंदर्य लाभते. पण फळे ही कधी खावीत हे देखील माहित असणे तेवढेच महत्वाचे आहे.
जसे की अनेकांना सवय असते की जेवण झाल्यावर ते फळे खातात. पण ही चुकीची सवय आहे.
आयुर्वेदात देखील ही एक चुकीची सवय असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. जेवणानंतर लगेच फळे घेतल्याने अन्नाच्या स्वाभाविक पचन क्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे जेवणाआधी किंवा नंतर अर्ध्या तासाचे अंतर ठेवून फळे खावीत.
चहा किंवा कॉफी घेणे :

ही सर्वात कॉमन सवय आहे. अनेकांना जेवण झाल्यावर चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते. ही सवय काम करणाऱ्या लोकांमध्ये जास्त बघायला मिळते. पण ही सवय तुमच्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
कारण जेवण झाल्यावर लगेचच चहा किंवा कॉफीचे सेवन केल्याने शरीरात घातक रसायनांची निर्मिती व्हायला लागते.
==
हे ही वाचा : तारुण्य व आरोग्य टिकवण्याचा रामबाण उपाय आयुर्वेदाने कित्येक शतकांपूर्वीच देऊन ठेवलाय!
==
जेवल्यानंतर लगेच झोपणे :

घरी राहणाऱ्या स्त्रियांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह ह्या आजारांचे सर्वात मोठे कारण म्हणजे जेवल्यानंतर लगेच झोपणे. ही सवय देखील अत्यंत हानिकारक आहे. जेवण आणि झोप ह्यांच्यामध्ये कमीतकमी एका तासाचे तरी अंतर असायलाच हवे.
जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर तुम्ही तुमच्या शरीरात अनेक आजारांची निर्मिती करत आहात.
त्यामुळे रोजच्या ह्या सवयी कटाक्षाने टाळा आणि निरोगी आयुष्याकडे वाटचाल करा.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
