' पाणीपुरी म्हणजे केवळ “जीभेचे चोचले” नव्हे, तर आहे भरपूर “आरोग्यदायी”! – InMarathi

पाणीपुरी म्हणजे केवळ “जीभेचे चोचले” नव्हे, तर आहे भरपूर “आरोग्यदायी”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

पाणीपुरी… नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं असा हा पदार्थ. भारतातील प्रत्येक शहराच्या प्रत्येक नाक्यावर तुम्हाला आणखी काही मिळाले नाही तरी पाणीपुरीची गाडी नक्की सापडेल.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरीच व्यसन असतं आणि त्यातही विशेषकरून मुलींना.

मुलींना तर पाणीपुरीची तल्लफच लागते, अनेकांना जशी सिगारेटची तल्लफ लागते ना तशीच! कधीही कुठेही त्यांना पाणीपुरी खायची इच्छा होऊ शकते.

देशभरात कुठेही फिरायला गेलं, तरीही संध्याकाळच्या पोटपूजेसाठी, आधी जाऊन पाणीपुरीची गाडी शोधणाऱ्या अनेक मुली तुमच्या ओळखीत असतील.

 

panipuri-inmarathi02

 

आपल्या पाणीपुरीची बातच काही और आहे. मस्त चटपटीत, थोडी आंबट, थोडी गोड, कधी तिखट अश्या अनेक चवींचे सुख कुठल्या पदार्थात एकत्र अनुभवयाला मिळत असेल तर तो पदार्थ म्हणजे पाणीपुरी.

अगदी ‘मल्टिफ्लेवर’ पाणीपुरी सुद्धा हल्ली खूपच फेमस झालेली आहे. लोक आवडीने ही पाणीपुरी खाताना दिसतात. पण हीच पाणीपुरी आरोग्यासाठी सुद्धा उत्तम ठरू शकते बरं का…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पाणीपुरी हा सर्व भावनिक आजारांवर एक रामबाण उपाय आहे.

म्हणूनच मूड चांगला असो वा खराब पाणीपुरी ही हवीच असते. हे सर्व तेच समजू शकतात ज्यांना ह्या पाणीपुरीचे व्यसन जडलेलं आहे.

पण बाजारात मिळणारी पाणीपुरी ही अनेकदा स्वच्छतेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. त्यापेक्षा घरी आपल्याला हवी तशी पाणीपुरी बनवून आपण त्या पाणीपुरीचा आस्वाद घेऊ शकतो.

 

panipuri-inmarathi

 

अनेकांना म्हणजे जे लोक पाणीपुरी खात नाहीत किंवा ज्यांना पाणीपुरी आवडत नाही, त्यांच्यामते ही हेल्दी नसते. पण हे निव्वळ एक कारण आहे त्यांच्याकडे पाणीपुरी न खाण्याचं. पण ह्यात काहीही तथ्य नाही.

पाणीपुरी ही हेल्दी आहे, ह्या पदार्थाचेदेखील आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.

म्हणजे ही केवळ आपल्या जिभेचे चोचलेच पुरवत नाही. तर काही प्रमाणात आरोग्यासाठी देखील फायद्याची ठरते. त्यामुळे आता बिनधास्त होऊन पाणीपुरीचा आस्वाद घ्या…!

१. तोंड येणे :

 

panipuri-inmarathi05

 

कधीकधी अति तिखट किंवा शरीरात उष्णता निर्माण करणारे गरम पदार्थ खाल्ल्याने तोंड येण्याची समस्या उद्भवते. अश्यावेळी पाणीपुरी तुम्हाला ह्या त्रासातून मुक्त करण्यास मदत करू शकते.

तोंड आल्यावर पाणीपुरी खाल्ल्याने तोंड येण्याच्या समस्येवर तत्काळ आराम मिळण्यास सुरवात होते.

त्यामुळे तोंड आलं आहे म्हणून पाणीपुरी खाऊ शकणार नाही हा गैरसमज सोडा आणि ह्या चटपटीत पाणीपुरीची मजा घ्या.

 

२. पोटाचा त्रास :

 

panipuri-inmarathi04

 

अॅसिडिटी किंवा अपचन झाल्याने कधीकधी पोट खूप जड वाटू लागत, ह्याचं कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने खाणे किंवा अति खाणे हे असू शकते. अश्यावेळी पाणीपुरी खाल्ल्याने ह्या समस्येचे निवारण होऊ शकते.

कारण पाणीपुरीच्या तिखट पाण्यामध्ये पुदीना, काळं मीठ, जीरं यांचा समावेश केलेला असतो. हे पदार्थ पाचक असल्याने पचनाचा सौम्य स्वरूपातील त्रास दूर होण्यास मदत होते.

तसेच पाणीपुरी खात असताना वाटाण्याऐवजी मुगाचा वापर करा, ते अधिक आरोग्यदायी ठरेल.

पाणीपुरीचे तिखट पाणी पिल्याने देखील अपचनाचा त्रास कमी होतो.

३. चिडचिड होणे :

 

panipuri-inmarathi06

 

उन्हाळ्यात उष्णतेमुळे चिडचिड होणे स्वाभाविक आहे. तसेच इतर वेळी देखील मूड स्वींग्समुळे चिडचिड होते. अश्यावेळी पाणीपुरी हा पदार्थ तुमचा मूड ठीक करण्यास मदत करेल.

चिडचिडेपणावर पाणीपुरी हा एक उत्तम पर्याय आहे.

 

४. पाणीपुरी किती आणि कधी खावी :

 

panipuri-inmarathi03

 

सायंकाळच्या वेळी पाणीपुरीचा आस्वाद घेणं आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचं ठरेल. तसेच एका वेळी ५-६ पाणीपुरी खाण्यात काहीही गैर नाही, हे आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे.

५-६ पाणीपुरीने शरीराला काहीही नुकसान होत नाही. जेवणापूर्वी १०-१५ मिनिटे आधी पाणीपुरी खाणे आरोग्यदायी आहे. पण वर्कआउट पूर्वी किंवा नंतर पाणीपुरी खाणे टाळावे.

पाणीपुरीचे हे आरोग्यदायी फायदे जाणल्यानंतर नक्कीच आता तुम्ही पाणीपुरीचा आस्वाद निश्चिंतपणे घेऊ शकाल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?