खाद्यपदार्थात केलेली “भेसळ” ओळखण्यासाठी सहज-सोप्या अफलातून १० पद्धती
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
खाद्यपदार्थात होणारी भेसळ ही भारतात उद्भवणारी एक मोठी समस्या आहे. खाण्यापिण्याचा वस्तूमध्ये अनेकदा काहीही मिसळून विकलं जातं, तसे खाद्यपदार्थ शरीराला अपायकारक असतात. त्याने शरीराला वेगवेगळे आजार जडायचा धोका देखील असतो.
अश्या भेसळयुक्त पदार्थांमुळे बऱ्याचदा विषबाधा होते आणि अनेक पोटाचे विकार देखील उदभवतात. त्यामुळे अश्या भेसळयुक्त पदार्थापासून जपुन राहणे गरजेचे आहे.
पण ह्या अश्या भेसळयुक्त पदार्थाना ओळखायचं कसं? असा प्रश्न नेहमी पडत असतो. तर आज आम्ही तुम्हाला काही प्रयोग सुचवतो आहे ज्यामाध्यमातून आपण भेसळयुक्त पदार्थ ओळखू शकता..
मसाले :-
मसाले हे खाद्यपदार्थांचा अविभाज्य भाग असतात. मसाले खाद्यपदार्थ रुचकर व स्वादिष्ट बनवतात. पण मसाल्यात देखील तेवढ्याच प्रमाणात भेसळ होत असते.
ही भेसळ आपल्याला लक्षात येत नाही पण जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या व्याधी जडतात तेव्हा आपल्याला त्याचं गांभीर्य लक्षात येतं. तर आपण जाणून घेऊयात मसाले पदार्थातील भेसळ कशी ओळखायची …
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
१) लाल तिखट (मिर्ची पावडर)
भेसळ:- कृत्रिम कलर , विटेचा भुसा
टेस्ट:- चमचा भर तिखट ग्लासभर पाण्यात टाका. चमचा ने मिश्रण तयार करा. लाल रंगाची बारीक लेयर तयार झाल्यास त्यात आर्टिफिशियल कलर असल्याचं स्पष्ट होतं आणि जर ते ग्लासच्या तळाला जमा झाले तर समजा विटेचे तुकडे आहेत.
–
- कुठली अंडी बनावट आहेत ओळखण्यासाठी सोप्या आणि खात्रीलायक टिप्स..
- या दिवाळीत भेसळयुक्त उटण्याला करा रामराम! घरगुती उटण्याने मिळवा सतेज कांती
–
२) हळद
भेसळ :- कृत्रिम पिवळा रंग, लीड क्रोमॅट, खडूची पावडर
टेस्ट:- हळद एका पारदर्शक ग्लासमध्ये घ्या आणि पाण्याचे व HCL ऍसिडचे काही ड्रॉप्स त्यात ऍड करा. त्यानंतर ते मिश्रण व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या, जर गुलाबी रंग दिसला तर त्यात कृत्रिम पिवळा रंग आहे. जर बुडबुडे दिसले तर समजून घ्यायचं की खडूची पावडर आहे.
लीड क्रोमॅट आहे का नाही हे तपासण्यासाठी चमचा भर हळद पाण्यात मिक्स करा, जर भेसळ असेल तर ती काही क्षणातच पाण्यातून बाहेर पडेल आणि कोपऱ्यात साचेल.
३) कोथिंबीर पावडर
भेसळ:- husk
टेस्ट:- कोथिंबीर ची पावडर थोडीशी चमचा भर पाण्यात टाका, जर husk मिश्रित असेल तर तरंगताना दिसेल. शुद्ध पावडर खाली तळाला बसेल.
४) जिरे
भेसळ :- गवताच्या बिया, कोळसा, लाकडाचा भुसा, स्टार्च
टेस्ट:- चमचाभर जिरे ग्लासभर पाण्यात मिसळा, भेसळ केलेले पदार्थ तरंगताना दिसतील आणि शुद्ध पदार्थ तळाला जाऊन बसतील.
जिरे गवताच्या बियांसोबत , कोळशासोबत एकत्र केले जातात, त्यांना ओळखण्यासाठी फक्त एकच करा जिऱ्याला दोन्ही हातांनी रगडा, जर हात काळे झाले तर भेसळ आहे.
५) काळी मिरी
भेसळ:- पपईच्या बिया
टेस्ट:- काही काळ्या मिरीचे दाने दारूच्या बाटलीत टाकून बघा, पपईच्या बिया बुडतील पण खरी मिरी तरंगताना दिसेल.
६) मोहरी
भेसळ:- अर्जेमोन बिया
टेस्ट:- सरळ मोहरीला बारीक कुटून घ्या, जर कठीण बाह्य भाग आणि पांढरी पावडर असेल तर अर्जेमोने बिया आहेत, जर मऊ बाह्य भाग आहे आणि पिवळा आतला भाग आहे तर खरंच मोहरी आहे.
७) साखर
भेसळ:- खडूची पावडर
टेस्ट:- चमचाभर साखर पाण्यात मिसळा जर ती विरघळली तर साखरच आहे आणि न विरघळताच पाण्याचा रंग पांढरा झाला तर खडूची पावडर आहे.
–
- सावधान: तुम्ही वापरत असलेलं ‘सॅनिटायझर’ डुप्लीकेट तर नाहीये ना? अशी घ्या टेस्ट
- प्लास्टिक बॉटल्समधील पाणी खरंच सुरक्षित आहे का ? जाणून घ्या.
–
८) मीठ
भेसळ:- खडूची पावडर
टेस्ट:- साखरेप्रमाणेच चमचाभर मीठ पाण्यात टाका जे विरघळल तर मिठच आहे आणि जर पाण्याचा रंग पांढरा झाला व पावडर तळाला जाऊन बसली तर मात्र खडूची पावडर आहे.
९) हिरवी मिर्ची आणि हिरवा भाजीपाला
भेसळ:- कृत्रिम हिरवा रंग
टेस्ट:- ब्लॉटिंग पेपरवर तुमचं सॅम्पल ठेवा, जर त्या पेपर वर हिरव्या रंगाचे ठसे दिसले तर तुमच्या सॅम्पलमध्ये कृत्रिम हिरवा रंग आहे.
कापसाचा तुकडा घ्या. त्याला पॅराफिन मध्ये बुडवा आणि तुमच्या सॅम्पल वर घासा, जर कापूस हिरवा झाला तर केमिकल रंग मिश्रित केला आहे. सॅम्पलला घसण्याआधी कोमट पाण्यात अर्ध्या तासासाठी ठेवा. जर हिरवा रंग पाण्यात दिसला तर भेसळ आहे.
१०) डाळी / बेसन
भेसळ:- कृत्रिम पिवळा रंग
टेस्ट:- डाळीची कुटून पावडर बनवा आणि चमचाभर पावडर कोमट पाण्यात मिक्स करा ( हे बेसणासोबत पण करता येऊ शकतं). काही HCL चे थेंब त्या मिश्रणात टाका. जर ते मिश्रण गुलाबी अथवा जांभळं झालं तर त्यात कृत्रिम पिवळा रंग मिश्रित केला गेला आहे.
आजच्या घाई गडबडीच्या युगात, बाहेरील पदार्थ विकत घेऊन आणण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी मध्यमवर्गीय कुटुंबात देखील रेडीमेड पदार्थ आणून खाण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे.
शहाणे व्हा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, त्यांचे आरोग्य ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. भेसळयुक्त पदार्थांपासून चार हात दूर राहा; हे प्रभावीपणे करण्यासाठी आम्ही वर दिलेल्या सोप्या पद्धती तुम्ही लगेच अंमलात आणाल अशी अपेक्षा आहे…
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.