' भारतातील सर्वात सक्षम सुरक्षा यंत्रणा वापरतात ही अद्वितीय हत्यारे – InMarathi

भारतातील सर्वात सक्षम सुरक्षा यंत्रणा वापरतात ही अद्वितीय हत्यारे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

जगभरातील विविध देशात बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा महत्वाचा पैलू आहे. त्यासाठी विविध सुरक्षा यंत्रणांची निर्मिती प्रत्येक देशाने केली आहे.

प्रत्येक देशाने स्वतःची एक सुरक्षा यंत्रणा निर्माण केली असून जी देशावर होणाऱ्या हल्ल्यांचा प्रतिकार करते, तसेच गुन्हेगारांना पकडते. देशाच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी सैन्यावर असते.

परंतु देशांतर्गत सुरक्षेसाठी पोलिस दल, सीआरपीएफ सारख्या संस्था जश्या आपल्या देशात आहेत तशा अनेक देशात कार्यरत असतात.

या संस्थां देशांतर्गत चालणाऱ्या विघातक कृत्यांचा प्रतिकार करतात आणि गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचा नायनाट करतात.

 

security-inmarathi
sputniknews.com

मग अश्या ह्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणांना बऱ्याचदा मोठयाप्रमाणावर कारवाया कराव्या लागतात. विविध शत्रूंशी ते वेगवेगळ्या पद्धतीने लढत असतात. कधीकधी शत्रू प्रचंड शस्त्रसज्ज आतंकवादी असतो, तर कधी शत्रू एखादा माफिया, सराईत गुन्हेगार, अंडरवर्ल्डचा डॉन असतो.

अश्यावेळी ह्या प्रचंड शस्त्रसज्ज शत्रूंचा सामना करण्यासाठी या सुरक्षा यंत्रणांना ही शस्त्रसुसज्ज राहावं लागतं आणि शास्त्रांच्या बाबतीत त्यांना प्रचंड ऍडव्हान्स राहावं लागतं.

 

Indian advance army InMarathi

 

ह्या शस्त्रांमध्ये अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरलेले असते. तर चला आज आपण जाणून घेऊयात शस्त्र अस्त्रांच्या तंत्रज्ञानाबद्दल आणि भारत देशातील सुरक्षा यंत्रणा कुठल्या प्रकारच्या ऍडव्हान्स शस्त्रांचा वापर करतात त्याबद्दल…

भारत देशातील सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख शत्रु आहेत पाकिस्तानी सैन्य, दहशतवादी, नक्षलवादी, देशांतर्गत पसरलेली गुन्हेगारी , तस्कर, ड्रग माफिया आणि चोर – लुटेरे, या सर्वांचा वेगवेगळ्या स्तरावर सामना करण्यात येत असतो, त्यावेळी त्यांचा प्रतिकार करण्यासाठी विविध हत्यारांचा वापर केला जातो. या हत्यारांत वेगवेगळ्या ऍडव्हान्स रायफल, मशीन गन इत्यादींचा समावेश होतो.

१ ) SPG – Special Protection Group

SPG कमांडो प्रामुख्याने FN F2000 Assault Rifles , FN P90 Personal Defense Weapon, FN SCAR – H Assault Rifle आणि FN Five Seven Pistol या हत्यारांचा वापर करतात.

 

rifle-inmarathi
militaryfactory.com

२) NSG – National Security Guards

 

covwrshot-inmarathi
biggerhammer.net

NSG प्रामुख्याने SIG SG550 Rifles सिरीजचा वापर करतात. त्यात SIG SG553LB, SIG SG551SB आणि SIG SG553SB चा समावेश होतो. याबरोबरच MP5 Varients जसे MP5A3 , MP5A5, MP5K आणि MP5SD यांचा समावेश होतो. याबरोबरच ते SSG3000 , PSG1A1 आणि Barret 98B Sniper Rifles, Block – 17 ह्या प्राथमिक खांद्याचा बंदुका आणि SPAS- 15 या आधुनिक शॉटगनचा देखील वापर करतात.

३) BSF And CRPF

 

CRPF-inmarathi
english.kolkata24x7.com

BSF आणि CRPF दोघी सारख्या शस्त्रास्त्रांचा वापर करतात कारण ते प्राथमिक संरक्षण देण्याचं काम करत असतात. ते X- 95 Carbines , AKMS Assault Rifles, RCL , MK.lll, INSAS Rifle आणि LMG, MAG 2A1 मशीन गन्स आणि MP5 पिस्टल , Glock पिस्टल आणि 9mm 1A पिस्टल यांचा देखील वापर करतात.

BSF याबरोबरच Barret M107A1 आणि विध्वंसक रायफलचा देखील वापर करतात. तरी प्राथमिक पातळीवर हे दोन्ही सैन्य गट SSG -69 व MX4 चा देखील वापर करतात.

इतर सुरक्षा यंत्रणा जसे ITBP ( Indo Tibet Border Police) आणि CISF हे देखील सारखेच हत्यार वापरतात फक्त थोडाफार फरक असतो.

पोलीस दल:-

भारतातील SWAT / QRT दलांकडे AKM Assault Rifles, MP5 , SMG Variants , INSAS Family Rifles, M4A1 ( मिझोराम पोलीस कमांडर आणि मुंबई QRT फक्त वापरतात), याबरोबरच पंजाब SWAT X-95 , MP-9 आणि SG550 rifles Series देखील वापारतात.

 

colt-inmarathi
discovermilitary.com

भारतातील इतर पोलीस दल हे उच्च पातळीवर साधारणतः AKM आणि INSAS Rifles चा वापर करतात. अजूनही मोठया प्रमाणात Sterling Carbines आणि SLR Battle Rifles चाच वापर केला जातो.

भारतातील इतर specialized units जे NSG च्या धरतीवर तयार करण्यात आले आहेत, जसे OCTOPUS हे NSG सारखेच हत्यार वापरतात, जसे MP5 SMGs आणि PSG-1 Sniper Rifles. OCTOPUS ही भारतातील एकमेव यंत्रणा आहे जी Colt 9mm SMG चा वापर करते.

अश्याप्रकारे भारतातील विविध दल वेगवेगळ्या अत्याधुनिक सुरक्षा हत्यारांचा साहाय्याने देशातील शत्रूंचा बिमोड करत असतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?