फक्त ‘सगळ्यांच्या हॅट्स’ चोरण्यासाठी त्या समुद्री लुटारूंनी जहाजावर हल्ला केला!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – विशाल दळवी
===
आपल्यापैकी अनेकांनी “पायरेट्स ऑफ द कॅरेबियन” हा चित्रपट बघितला असणार, त्यामुळे आपल्याला पायरेट्स म्हणजे काय ते माहिती असणारच! पायरेट्स म्हणजेच समुद्री लुटेरे, समुद्री डाकू.
एखादं जहाज घेऊन आणि काही माणसं घेऊन एकेकाळी हे समुद्री लुटेरे समुद्रावर अधिराज्य गाजवायचे. एखाद्या मालवाहू जहाजावर हल्ला करून त्या जहाजातील ऐवज चोरी करायचे.
सन १६५० ते १६८० ह्या काळात जेव्हा एकिकडे छत्रपती शिवाजी महाराज आपलं आरमार उभारत होते त्याच वेळी युरोप आणि आफ्रिकेला जोडणाऱ्या अटलांटिक महासागरात हे समुद्री लुटेरे/पायरेट्स धुमाकूळ घालत होते.
जमैकाचा व पोर्तुगाचा द्वीपावरील इंग्रज आणि फ्रेंच समुद्री लुटेऱ्यांनी स्पॅनिश वसाहती आणि मालवाहू जहाजांवर कॅरेबियनच्या समुद्रात हल्ला केला होता. तेव्हापासून ह्या समुद्री लुटेऱ्यांचा जन्म झाला होता.
१९९० साली कॅरेबियन आणि अमेरिकन पायरेट्सने आपला मोर्चा हिंद महासगराकडे व लाल समुद्राकडे वळवला याला पायरेट्स राऊंड देखील म्हटले जाते. यावेळी त्यांचा निशाण्यावर होती ईस्ट इंडिया कंपनी आणि मुस्लिम व्यापारी, जे आपला माल युरोपात घेऊन जात असत.
पायरेट्सला मोठयाप्रमाणावर पाठबळ तेव्हा मिळालं जेव्हा १७१६ ते १७३० च्या शेवटपर्यंत जे स्पॅनिश गृहयुद्ध चालू होतं ते संपलं. ज्यामुळे अनेक अमेरिकन आणि इंग्लिश खलाशी, नाविक बेरोजगार झाले आणि समुद्री लुटमारीच्या धंद्याकडे वळले.
ते उत्तर अमेरिकेतील पूर्वोत्तर सागर, कॅरेबियन आणि हिंद महासागरातील पश्चिम अफ्रिकेच्या समुद्र किनाऱ्यावरील जहाजांना आपलं लक्ष करीत असत.
एडवर्ड थाच जो ब्लॅकबर्ड म्हणून तो ओळखला जात असे, बरथॉलॉमेव रॉबर्ट्स जो ब्लॅक बार्ट म्हणून ओळखला जात होता, ब्लॅक सॅम बेलामी, जॉन “कालिको जॅक” राखम, हे काही प्रसिद्ध समुद्री लुटेरे त्याकाळी समुद्रावर अधिराज गाजवायचे.
याबरोबरच बेंजामिन होर्निगोल्ड नावाचा अजून एक कुख्यात समुद्री लुटेरा त्याकाळी अस्तित्वात होता. १७१३ साली त्याने त्याचा समुद्री लुटेऱ्याचा “करीयर” ला सुरुवात केली !
त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला, होर्निगोल्ड हा कनिष्ट पातळीचा समुद्री लुटेरा, बहामास मधील एका छोट्याशा किनाऱ्यावर येणाऱ्या जहाजांना तो लुटत असे. लहान मालवाहू जहाज हे त्याचे प्रमुख लक्ष असे.
१७१७ पर्यंत ३० तोफा असणाऱ्या “रेंजर” या युद्धनौकेचा तो मालक बनला, जी त्याकाळी बहामास मधील सर्वात शक्तिशाली युद्धनौका होती. त्याने जवळपास ३५० माणसांची खंबीर फौज उभी केली होती, जी येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना लुटत असत.
होर्निगोल्ड जेंव्हा कॅप्टन होता तेव्हा त्याचा उजवा हात एडवर्ड थेच हा होता. जो नंतर “ब्लॅकबर्ड” या नावाने प्रसिद्ध झाला. ह्या दोघांनी एकत्र अनेक सुनियोजित लुटी केल्या होत्या.
यादरम्यान त्यांनी अनेक छोट्या मोठ्या जहाजांवर कब्जा मिळवला आणि त्यानंतर त्यांना बहामासचे राजे हा किताब मिळाला. यांच्या त्रासाला कंटाळून १७१७ मध्ये दक्षिण कॅरोलिनाचा गव्हर्नरने यांना पकडण्यासाठी सुसज्ज नौसेनेला पाठवलं होत.
होर्निगोल्डला पकडण्यासाठी गेलेल्या या लष्करी सेनेवर होर्निगोल्डच्या समुद्री लुटेऱ्यांनी इतका जोरदार हल्ला चढवला की त्यांचा जहाजाचा पार धुवा उडवला. जहाजावरचा सैनिकांनी स्वतःचा जीव वाचवत पळ काढला.
१७१७ मध्ये, होर्निगोल्ड आणि त्याचा साथीदारांनी एकदा होऊंडर्सच्या किनाऱ्यावरील मालवाहू जहाजावर हल्ला केला.
त्या जहाजांवरील नाविकांनी होर्निगोल्डकडे जीवनाची भीक मागितली, तेव्हा होर्निगोल्डचा माणसांनी सांगितलं की रात्री दारू पिल्यामुळे नशेच्या अवस्थेत होते!
आणि त्या नशेत त्यांनी त्यांचा टोप्या पाण्यात फेकल्या आणि त्यांनी या जहाजावर आक्रमण फक्त टोप्यांची चोरी करण्यासाठी केलं होतं! त्या नाविकांच्या टोप्या घेतल्यानंतर त्यांनी त्यांना मुक्त केलं.
काही इतिहासकारांच्या मतानुसार हा हल्ला फक्त होर्निगोल्ड आणि थेच यांनी आपली ताकद दाखवून देण्यासाठी केला होता.
होर्निगोल्ड ने कधीच ब्रिटीश जहाजांवर आक्रमण केलं नाही, त्याचा दावा होता की तो ब्रिटिश साम्राज्याचा अर्थव्यवस्थेच शत्रूच्या जहाजांवर आक्रमण करून रक्षण करत आहे.
परंतु काही दिवसांनी त्याचा साथीदारांनी त्याचावर दबाव टाकायला सुरवात केली. त्यांची मागणी होती की सर्व साम्राज्याचा जहाजांना लुटायच होतं. त्यांना कुठल्याही साम्राज्याचा झेंडा नको होता. त्यांचा दबावासमोर होर्निगोल्डच काहीच चालू शकलं नाही.
त्यावेळी थेचसुध्दा दुसऱ्या जहाजावर होता. त्यामुळे होर्निगोल्ड असाह्य होता, शेवटी त्याला एका छोट्याशा नौकेवर बसवून हुसकावून देण्यात आले.
पुढे काही दिवसांनी तो जमैकाला गेला आणि त्याने जमैकाच्या गव्हर्नर कडे क्षमायाचना केली, नंतर जमैकाचा गव्हर्नर वूड्स रॉजर्स ने त्याला आश्रय दिला व त्याचा वरील सर्व गुन्हे माफ केले.
ब्रिटिश साम्राज्याचा अधिपत्याखाली असलेल्या कुठल्याही प्रदेशात जर समुद्री लुटेऱ्याने आश्रय मागितला आणि क्षमा याचना मागीतली तर ती त्याला देण्यात यावी असा आदेश ब्रिटीश राजा जॉर्ज याचा होता.
त्याला “Kings Pardon” म्हटलं जायचं. त्यानुसारच होर्निगोल्डला क्षमा करण्यात आली होती. नंतर त्याची “पायरेट्स हंटर” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचा आयुष्याचा शेवटच्या वर्षात पायरेट्स हंटर म्हणून त्याला त्याचा जुन्या साथीदारांना पकडण्याचा मोहिमेवर पाठवण्यात आले.
१८ महिने बहामास मध्ये राहून सुद्धा तो त्याचा जुन्या साथीदारांना पकडण्यात असमर्थ ठरला. तो एकाही साथीदाराला पकडू शकला नाही.
सर्व त्याचा हातावर तुरी देऊन पसार व्हायचे. एकदा न्यू मेक्सिको आणि बहामासच्या समुद्रातील पट्ट्यात आलेल्या वादळात तो सापडला आणि त्यानंतर तो व त्याचे साथी कधीच कुठे दिसले नाहीत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.