' भारतीय रेल्वेच्या प्रत्येक ट्रेनवर नंबर का दिलेला असतो? – InMarathi

भारतीय रेल्वेच्या प्रत्येक ट्रेनवर नंबर का दिलेला असतो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्यासाठी रेल्वे म्हणजे काही नवीन गोष्ट नाही.

कुठेही बाहेरगावी जायचे असल्यास आपण सर्वात जास्त प्राधान्य कशाला देतो?,  तर भारतीय रेल्वेला!

रेल्वे नसती तर प्रवास तितकासा सुकर आणि सहजही झाला नसता!

 

indian rail inmarathi

 

प्रवास राज्यांतर्गत असो वा देशांतर्गत, रेल्वेलाच पसंती दिली जाते.

विमानापेक्षा स्वस्तात होणारा, निसर्गाच्या सान्निध्यातला हा प्रवास, प्रत्येकाला हवाहवासा वाटतो.

अश्या या जिवाभावाच्या रेल्वेबद्दल आपल्या मनात आजही कुतुहूल आहे.

ट्रेन पाहिली की अनेक प्रश्न मनात उभे राहायचे आणि अजूनही राहतात.

आज इंटरनेटने माहितीचं भांडार उघडलं असलं, तरी रेल्वेसंबंधीचे प्रश्न लहानमोठ्या सगळ्यांनाच पडतात.

मुख्य प्रश्न म्हणजे, रेल्वे चालवतात कशी? हे मोटरमन लोक सिग्नल कसे ओळखतात? ते कंट्रोल रुमशी संवाद कसा साधतात?

यापैकी बहुतांश प्रश्नांची उत्तरे आपल्याला आता माहित पडलीयेत. पण अनेकांच्या मनातील एक प्रश्न आजही उत्तराची वाट पाहत बसला आहे.

‘तो’ प्रश्न म्हणजे प्रत्येक रेल्वेला जे नंबर दिलेले असतात त्या मागचं गौडबंगाल नेमकं आहे तरी काय?

 

indian-railway-number-secret-marathipizza01

स्रोत

 

आपल्या प्रत्येकाला हे माहित आहे की प्रत्येक रेल्वेगाडीचा अप आणि डाऊन मार्गाचा एक वेगळा क्रमांक असतो. उदा. पुणे-सिकंदराबाद एक्स्प्रेस..!

उदाहरणार्थ ही एक्स्प्रेस जेव्हा पुण्याहून सिकंदराबाद साठी रवाना होते तेव्हा तिचा नंबर असतो 12025 आणि जेव्हा ही एक्स्प्रेस पुण्याला येण्यासाठी सिकंदराबादहून सुटते तेव्हा तिचा नंबर असतो 12026.

तुम्हाला वाटत असेल की हे नंबर गाड्यांना सहज दिले असतील, पण तसं नाही आहे त्यामागे देखील एक सिस्टम आहे.

२० डिसेंबर २०१० मध्ये भारतीय रेल्वेने ट्रेन्ससाठी असलेली ४ डिजीट नंबरची सिस्टम बदलून ५ डिजीट नंबरची एक नवीन सिस्टम अंमलात आणली.

या पाच डिजीट पैकी पहिला डिजीट ट्रेनचा प्रकार दर्शवतो.

  • ० हा क्रमांक विशेष ट्रेनसाठी वापरला जातो. (उदा. समर स्पेशल, हॉलीडे स्पेशल)
  • १ हा क्रमांक लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी वापरला जातो. यामध्ये राजधानी, शताब्दी, जन साधारण, संपर्क क्रांती, गरीब रथ, दुरान्तो आणि मेल्सचा समावेश होतो.
  • २ हा क्रमांक देखील लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी वापरला जातो. पण हा क्रमांक तेव्हाच वापरला जातो जेव्हा १ ची पूर्ण सिरीज संपते.
  • ३ हा क्रमांक कोलकाता मधील उपनगरीय रेल्वे गाड्यांसाठी वापरला जातो.
  • ४ हा क्रमांक चेन्नई, नवी दिल्ली, सिकंदराबाद, आणि इतर प्रमुख शहरांमधील ट्रेन्ससाठी वापरला जातो.
  • ५ हा क्रमांक नेहमीच्या पॅसेंजर ट्रेन्ससाठी वापरला जातो.
  • ६ हा क्रमांक MEMU ट्रेन्ससाठी वापरला जातो.
  • ७ हा क्रमांक डीजेल मल्टीपल युनिट आणि रेलकार सर्विसेससाठी असणाऱ्या ट्रेन्ससाठी वापरला जातो.
  • ८ या क्रमांकाचा सध्या कोणताही वापर होत नाही.
  • ९ हा क्रमांक मुंबई आणि उपनगरीय रेल्वे गाड्यांसाठी वापरला जातो.

 

indian-railway-number-secret-marathipizza02

स्रोत

 

पाच डिजीट पैकी दुसऱ्या आणि त्यापुढील सर्व डिजीटचे महत्त्व हे पहिल्या डिजीटवर अवलंबून असते.

उदाहरणार्थ –

स्पेशल ट्रेन्स किंवा लांब पल्ल्यांच्या गाड्या असतील म्हणजेच o, १ किंवा २ या क्रमांकाने सुरु होणाऱ्या गाड्या असतील तर उरलेले चार डिजीट हे रेल्वे झोन आणि डिव्हिजन दर्शवतात.

खरतरं बहुतेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे नंबर हे पूर्वीच्या ४ डिजीट नंबर प्रमाणेच आहेत, फक्त त्यात सुरुवातीला १ हा क्रमांक घालून त्यांचा ५ डिजीट नंबरच्या नवीन सिस्टममध्ये समावेश केला गेला आहे.

झोनल कोड (दुसरा डिजीट) खाली दिलेले आहेत:

  • ०- कोकण रेल्वे
  • १- मध्य रेल्वे, पश्चिम-मध्य रेल्वे आणि उत्तर-मध्य रेल्वे (CR, WCR आणि NCR)
  • २- सुपरफास्ट, शताब्दी आणि जनशताब्दी आणि इतर काही विशेष ट्रेन्स, या प्रकारच्या ट्रेन्सचा पुढील डिजीट हा झोनल कोड असतो.
  • ३- पूर्व रेल्वे आणि पूर्व-मध्य रेल्वे (ER आणि ECR)
  • ४- उत्तर रेल्वे, उत्तर-मध्य रेल्वे आणि उत्तर-पश्चिम रेल्वे (NR, NCR आणि NWR)
  • ५- उत्तर-पूर्व रेल्वे आणि पूर्वोत्तर सीमांत रेल्वे (NER आणि NFR)
  • ६- दक्षिण रेल्वे आणि दक्षिण-पश्चिम रेल्वे (SR आणि SWR)
  • ७- दक्षिण-मध्य रेल्वे आणि दक्षिण-पश्चिम रेल्वे (SCR आणि SWR)
  • ८- दक्षिण-पूर्व रेल्वे आणि पूर्व तट रेल्वे (SER आणि ECoR)
  • ९- पश्चिम रेल्वे, उत्तर-पश्चिम रेल्वे आणि पश्चिम-मध्य रेल्वे (WR, NWR आणि WCR)

आता कळलं या नंबर मागचं सिक्रेट!!!

आणखी एक न उमगलेला प्रश्न-

हे वाचा- रेल्वेरुळांच्या मध्ये दगडी खडी का टाकतात?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?