नासाच्या भारतीय वंशाच्या महिला शास्त्रज्ञांचा नवा प्रकल्प : भारताची मान अभिमानाने उंचावणार
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
अंतराळात खूप रहस्य दडलेले आहेत. जगभरातील वैज्ञानिक अंतराळातील ह्याच रहस्यांचा उलगडा करण्यासाठी वेळोवेळी निरनिराळे प्रयोग करत असतात. पण एका रिपोर्ट नुअस्र ह्या रहस्यांपैकी केवळ ५ टक्के रहस्यांचा छडा लावण्यात मानवाला यश आले आहे. म्हणजेच अजून ९५ टक्के रहस्य हे आपल्यासाठी रहस्यच आहेत. ह्याबाबत आणखी माहिती मिळविण्यासाठी नवनवीन शोध लावण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्नशील असतात. संपूर्ण जगातील वैज्ञानिक ह्याबाबत माहिती मिळविण्यासाठी कित्येक प्रयोग करत असतात.
जगातील सर्वात मोठी स्पेस एजन्सी नासा देखील अंतराळातील ह्याच रहस्यांचा उलगडा करण्याच्या प्रयत्नात आहे. नुकतच नासाने आपल्या नवीन प्रोजेक्ट Cold Atom Laboratory बाबत माहिती दिली. आणि जर त्यांचा हा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर ती आपल्या भारतीयांसाठी देखील खूप अभिमानास्पद ठरणार आहे.
ह्यामागे कारण म्हणजे ह्या प्रोजेक्टच्या लीडर. हो.. नासाच्या ह्या महत्वपूर्ण प्रोजेक्टला लीड करणारी एक स्त्री आहे, एक भारतीय स्त्री. अनिता सेन गुप्त असे ह्यांचे नाव. अनिता ह्या एक एरोस्पेस इंजिनिअर आहेत, त्या नासाच्या ह्या नव्या फिजिक्स प्रयोगाच्या प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम बघणार आहेत.
Cold Atom Laboratory ह्या प्रोजेक्ट अंतर्गत नासा ब्रम्हांडातील सर्वात थंड स्पॉट बनवणार आहे. हा स्पॉट अंतराळाच्या तुलनेत १० अरब पट जास्त थंड असणार आहे. ह्या परिस्थितीत एका अणूमध्ये कश्याप्रकारे बदल होतात कुठले बदल होतात ह्याचा शोध लावला जाईल. पृथ्वीवर ह्या तापमानाला केवळ १-२ सेकंदच मॅनेज केल्या जाऊ शकते. पण अंतराळात ह्या तापमानाला ८-१० सेकदांपर्यंत अनुभवल्या जाऊ शकते. ह्याप्रकारे वैज्ञानिकांना अणूंचे परीक्षण करण्यासाठी जास्त वेळ मिळेल.
अनिता सेन गुप्त ह्या मुळच्या भारतीय वंशाच्या आहेत. त्या भारतातील पश्चिम बंगाल ह्या राज्यातील आहेत. त्यांनी Viterbi School of Engineering University, Southern California येथून Aerospace आणि Mechanical इंजिनीअरची पदवी घेतली आहे.
अनिता सेन गुप्ता ह्यांनी नासामध्ये अनेक महत्वपूर्ण प्रोजेक्ट्समध्ये महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांनी २०१२ साली नासातर्फे मंगल ग्रहावर पाठविण्यात आलेल्या Curiosity Rover करिता Supersonic Parachute System बनविणाऱ्या टिमचे प्रतिनिधित्व केले होते. सध्या अनिता नासामध्ये Senior Vice President of Systems Engineering, Virgin Hyperloop One मध्ये कार्यरत आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.