IPL मध्ये खेळाडूंना भरपूर पैसा मिळतो, पण चीअरलीडर्सना किती पैसा मिळत असेल? जाणून घ्या..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या सर्वत्र IPLची धूम बघायला मिळत आहे. २००८ सालापासून IPL सुरु झाली आणि तेव्हापासून क्रिकेट विश्वच बदलून गेलं. वेगवेगळ्या शहरांतील टीम्सला खेळताना बघणे खरंच मनोरंजक असते. भारतात IPLची लोकप्रियता एवढी जास्त आहे की, ह्यादरम्यान अनेक चित्रपट देखील रिलीज केली जात नाही.
काही लोकांच्या मते IPL म्हणजे क्रिकेटचा नाही तर पैश्यांचा खेळ. कारण ह्या खेळात खूप पैसा आहे. IPL मधील खेळाडूंना आणि फ्रेंचाइजिना ह्या खेळातून अमाप पैसा मिळतो.
तसेच ह्या खेळाशी जोडल्या गेलेल्या चीअरलीडर्सना देखील खूप पैसा दिला जातो. IPL दरम्यान भारतात येऊन परफॉर्म करणाऱ्या ह्या चिअरलीडर्स अमेरिका, ब्रिटन, मेक्सिको, फ्रान्स, ब्राजिल, युक्रेन, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशातील असतात. ह्यातील बऱ्याच ह्या कोरिओग्राफी ग्रुप मधल्या असतात.
IPLमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना जसा पैसा मिळतो तसाच ह्या चीअरलीडर्सना देखील मिळतो. प्रत्येक मॅचसाठी ह्या चीअरलीडर्स जे मानधन दिल्या जाते ते खरंच आश्चर्यकारक आहे. आता कुठली टीम आपल्या चीअरलीडर्सना किती पैसा देते ते जाणून घेऊ.
दिल्ली डेयरडेविल्स :
दिल्ली डेयरडेविल्स टीमच्या चिअरलीडर्सना एका मॅचसाठी जवळपास १० हजार रुपये मानधन दिले जाते. म्हणजे ह्या हिशोबाने एक चीअरलीडर एका सिझनमध्ये २.५०-२.६० लाख रुपयांची कमाई करते.
चेन्नई सुपर किंग्स :
धोनीच्या नेतृत्वात खेळणारी चेन्नई सुपर किंग्सची टीम दोन वर्षांच्या बंदी नंतर ह्यावर्षीच्या IPLमध्ये खेळत आहे. ह्या टिमच्या चीअरलीडर्सना देखील एका मॅचसाठी १० हजार रुपये मानधन दिले जाते.
सनरायझर्स हैदराबाद :
IPL २०१६ च्या विजेत्या सनरायझर्स हैदराबाद आपल्या चीअरलीडर्सनाएका मॅचसाठी १० हजार रुपयांचे मानधन देते.
किंग्स इलेवन पंजाब :
किंग्स इलेवन पंजाब ही प्रीती झिंटा ची टिम देखील आपल्या चीअरलीडर्सना एका मॅचसाठी १० हजार रुपयांचे मानधन देते.
राजस्थान रॉयल्स :
राजस्थान रॉयल्स ह्या टीमने देखील दोन वर्षानंतर IPL मध्ये पुनरागमन गेलं आहे. ही टिम त्यांच्या चीअरलीडर्सना एका मॅचसाठी ११.५ ते १२ हजार रुपये देते. म्हणजेच एका सीझनमध्ये ह्या टिमच्या चीअरलीडर्स ३.२० ते ३.२५ लाख रुपयांची कमाई करतात.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर :
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दोन वेळा फायनल्स पर्यंत पोहोचली आहे. ही टिम आपल्या चीअरलीडर्सना एका मॅचसाठी १६ ते १८ हजार रुपयांचे मानधन देते.
मुंबई इंडियंस :
IPL ची सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असणारी टिम मुंबई इंडियन्स तीन वेळा IPL ची विजेती ठरली आहे. ही टिम आपल्या चीअरलीडर्सना एका मॅचसाठी १६.४ ते १६.८ हजार रुपयांचे मानधन देते.
कोलकाता नाइट रायडर्स :
किंग खान शाहरुखची टिम कोलकाता नाईट रायडर्स आपल्या चीअरलीडर्सना सर्वात जास्त मानधन देत असल्याचं सांगितल्या जाते. ही टिम आपल्या चीअरलीडर्सना प्रत्येक मॅचसाठी १९ ते २० हजाराचे मानधन देते. जे खरंच खूप जास्त आहे.
ह्याशिवाय मॅच जिंकल्यावर अनेक टिम्स आपल्या चीअरलीडर्सना ३००० रुपयांचा अतिरिक्त बोनस देखील देते. तसेच त्यांना पार्टी आणि एक्स्ट्रा अपियारंसकरिता वेगळे पिसे मिळतात. जे ७ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत असतात.
त्यांना फोटोशूट करिता ५ हजार रुपयांचे मानधन दिल्या जाते. तसेच त्यांचा सर्व खर्च म्हणजे राहणे, खाणे-पिणे, येन-जाणं इत्यादीचा खर्च देखील फ्रेंचाईजि करते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.