या गावात मागील ४०० वर्षांपासून एकही बाळाने जन्म घेतला नाही, वाचा त्यामागचे कारण
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अंधश्रद्धेपासून समाजाला मुक्त करण्यासाठी अनेकांना आपले प्राण गमवावा लागला मग ते दाभोळकर असो किंवा कॉ. पानसरे. पण तरी या अंधविश्वासाची मुळे एवढी खोलवर रुजलेली आहेत की, त्यापासून समाजाला मुक्त करणे हे काही सोप्प नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
आजही आपल्या देशात ह्या अंधविश्वासाची अनेक उदाहरणे बघायला मिळतात. जुने लोक हे सर्व मानायचे कारण तेव्हा त्यांच्यात अशिक्षित लोक जास्त होते, त्यामुळे ते ह्या अंधविश्वासाला बळी पडायचे. पण आज जेव्हा देशात शिक्षित लोकांची सख्या ही अशिक्षित लोकांच्या तुलनेत जास्त आहे तरीदेखील अंधविश्वास आहे तेवढाच आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे नव्या पिढीचे शिक्षित लोक ज्यांना आधुनिक जीवन हवं, ते देखील ह्या अंधविश्वासाला बळी पडतात. ह्याची अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतील जिथे आजही लोक अंधविश्वासाला बळी पडून काही अनिश्चित प्रथा पाळत आहेत. जसे की, मध्यप्रदेशातील एका गाव होतं.
मध्यप्रदेश राज्याची राजधानी भोपाल येथून १३० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका गावात एक वेगळीच प्रथा मानली जाते. या गावात जवळपास मागील ४०० वर्षांपासून कुठल्याच महिलेने गावात मुल जन्माला घातले नाही. संका श्यामजी असे या गावाचे नाव आहे.
हे ही वाचा –
===
परिस्थिती कशीही का असेना पण तरीही महिला ह्या गावात आपलं मुल जन्माला घालत नाही. जर कुठल्याही गर्भवती महिलेला लेबर पेन सुरु झालं की, तिला गावाबाहेरचं घेऊन जावं लागतं. यामुळे मागील ४०० वर्षांपासून या गावात एकही बाळ जन्माला आलं नाही.
एकतर ते दवाखान्यात होतं किंवा मग गावाबाहेरील एका खोलीत.
ह्या प्रथेमागे गावकऱ्यांची मान्यता आहे की, हे गाव शापित आहे. त्यामुळे जर कुठलीही महिला ह्या गावात कुठल्या बाळाला जन्म देईल तर त्या बाळाचा मृत्यू होईल किंवा त्याला एखादा गंभीर आजार होऊ शकतो.
ह्याबाबत ANI ने गावातील सरपंचांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की,
‘१६व्या शतकापासून या गावात ही परंपरा चालत आली आहे. आमचं गावं शापित आहे. कारण येथे जेव्हा एक मंदिर बांधलं जात होतं, तेव्हा एक महिला चक्कीवर दळण दळत होती. ज्यामुळे मंदिराच्या निर्माण कार्यात अडथळा आला. ह्याचा देवाला राग आला आणि त्यांनी शाप दिला की, ह्या गावात कुठलीही महिला आपल्या बाळाला जन्म देऊ शकणार नाही.’
तेव्हापासून गावातील लोक ह्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू लागले. पण त्यांच्यामते ही कुठली अंधश्रद्धा नाही तर सत्य आहे.
पण आजही जिथे आपण एवढं आधुनिक प्रगतीशील जीवन जगत आहोत, जिथे आज विज्ञानाच्या भरवश्यावर आपण काहीही साध्य करू शकतो. तिथेच काही लोक असेही आहेत जे या अंधश्रद्धेलाच सत्य मानून त्यावर विश्वास ठेवून जीवन जगत आहेत.
हे ही वाचा –
===
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.