आईन्स्टाईनची अशीही बाजू : पत्नीवरची अनिर्बंध दडपशाही…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कुठलीही व्यक्ती ही परफेक्ट नसते, हे आपण सर्वच जाणतो आणि मानतोही. प्रत्येक व्यक्तीचा कुठला ना कुठला विक पॉईंट असतोच, आणि त्या कमतरतेला जो आपली स्ट्रेन्थ म्हणजेच ताकद बनवतो तोच जग जिंकतो.
हो की नाही…आता आपल्या सर्वांच्या आवडत्या अल्बर्ट आईन्स्टाईन ह्यांच्याकडेच पहा ना.
आईन्स्टाईन, ज्यांना संपूर्ण जग हे एक महान वैज्ञानिक म्हणून जाणते. ते त्यांच्या लहानपणी अभ्यासात तेवढे हुशार नव्हते. एवढचं नाही तर विद्यापीठात दाखल होण्यासाठी जी परीक्षा द्यावी लागते त्यात देखील ते अनुत्तीर्ण झाले होते.
त्यानंतर त्यांनी त्यांच्यातल्या कमतरतेला आपली ताकद बनवली आणि ते ह्या जगातील सर्वात महान वैज्ञानिक म्हणून ओळखले जाऊ लागले.
पण जसं सुरवातीला म्हटलं, कुठलीही व्यक्ती ही परफेक्ट नसते. तसे आईन्स्टाईन भलेही महान वैज्ञानिक होते पण तेही परफेक्ट नव्हते. त्यांनी अनेक असे शोध लावले ज्याच्या भरवश्यावर आज आपण एवढी प्रगती करू शकलो. ते निश्चितच एक अतिशय चांगले वैज्ञानिक होते पण ते कधीही एक चांगले पती होऊ शकले नाही. आणि हे आम्ही सांगत नाही तर त्यांच्याच काही पत्रांतून समोर आलं आहे.
नुकतंच अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांचे काही वैयक्तिक पत्र समोर आले आहे, ज्यावरून असे दिसून आले की, आईनस्टाईन हे त्यांच्या पत्नीवर दडपशाही करायचे.
आईनस्टाईन ह्यांच्या पत्नी Mileva ह्या देखील एक वैज्ञानिक होत्या. ह्या दोघांची पहिली भेट ही ‘ज्यूरीख पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट’मध्ये झाली होती. त्यावेळी इन्स्टिट्यूटमध्ये खूप कमी स्त्रिया शिकायच्या, Mileva देखील त्यापैकी एक होत्या.
ह्याच दरम्यान आईनस्टाईन आणि त्यांच्या पत्नीची ओळख झाली आणि ते प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. त्यांना दोन मुलं देखील झाले. ११ वर्ष संसार थाटल्यानंतर त्यांचं लग्न घटस्फोटपर्यंत येऊन पोहोचलं.
पण आईनस्टाईन ह्यांनी आपलं लग्न वाचविण्यासाठी आपल्या पत्नीसमोर काही अटी ठेवल्या. आणि आपल्या मुलांसाठी हे वाचविण्यासाठी Mileva ह्यांनी त्या अटी मान्य केल्या.
त्यांच्या पत्नी Mileva Maric ह्या कुठलं-कुठलं काम करतील ह्याविषयी आईन्स्टाईन ह्यांनी काही विचित्र नियम बनवले होते जे Mileva ह्यांना मान्य करावे लागायचे. ते नियम आणि अटी पुढीलप्रमाणे-
– आईनस्टाईन ह्यांना वाटायचं की त्यांच्या पत्नीने घरात नोकरांसारख काम करायचं. आणि त्या ऐवजी प्रेम सन्मान अश्या गोष्टींची अपेक्षा करू नये.
– पत्नीने घरातील सर्व कामे करायची आणि दिवसातून तीनदा जेवण बनवायचे.
– त्यांच्या ऑफिसची साफसफाई करावी पण त्यांच्या डेस्कला हात लावू नये.
– तिने आपल्यासोबत वेळ घालविण्यासाठी मला विचारणा करू नये आणि त्याची माझ्याकडून अपेक्षाही करू नये.
– माझ्यासोबतच्या सर्व व्यक्तिगत संबंधांचा त्यांनी त्याग करावा.
– जेव्हा केव्हा मला कुठल्या गोष्टीची तात्काळ गरज असेल तेव्हा मला त्यावर प्रश्न विचारणार नाही.
– माझ्या कुठल्याही गोष्टीवर टीका करणार नाही, त्यावर प्रश्न करणार नाही.
– जेव्हाही मी खोलीतून जाण्यास सांगेल तेव्हा तात्काळ खोलीतून बाहेर निघून जाणार.
– मुलांसमोर माझी प्रतिष्ठा खराब होईल असं काहीही करणार नाही.
आईन्स्टाईन ह्यांनी ह्या सर्व गोष्टी १०१४ साली लिहिल्या होत्या. ह्यावरून हेच दिसून येते की ते त्यांच्या पत्नीशी किती असभ्यपणे वागायचे.
त्यांच्या अश्याच वागणुकीला कंटाळून Mileva ह्यांनी अखेर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आणि एकेदिवशी आपल्या मुलांना घेऊन घर सोडून निघून गेली.
घटस्फोट झाल्याच्या काहीच दिवसांनी आईनस्टाईन ह्यांनी त्यांच्या चुलत बहिण एल्सा हिच्याशी लग्न केलं.
१९१२ सालापासूनच त्यांचे एल्सा हिच्याशी संबंध होते. त्यांनी एल्सा हिच्यासाठी देखील अनेक नियम बनविले होते, असे सांगितले जाते.
ज्या अल्बर्ट आईनस्टाईनला आपण एवढं महान मानतो, जे ते आहेतही. त्यांच्यातील प्रतिभा आणि हुशारीने त्यांना ह्या जगातील सर्वात महान वैज्ञानिकांच्या आणि सर्वात हुशार व्यक्तींच्या पंक्तीत बसवलं. पण ते त्यांच्या आयुष्यात एक चांगले पती कधीही होऊ शकले नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.