' लंडनमध्ये चहाचं दुकान टाकणारा भारतीय युवक आज करोडपती झालाय ! – InMarathi

लंडनमध्ये चहाचं दुकान टाकणारा भारतीय युवक आज करोडपती झालाय !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक यशस्वी माणसामागे त्याच्या अपयशाची एक कहाणी नक्कीच असते. ज्यातून वर येऊन त्याने आज हे यश प्राप्त केलेलं असतं.

अपयश पचवणे आणि त्यातून बाहेर पडणे कठीण असते. त्यासाठी गरज असते ती केवळ प्रयत्न आणि महत्वाकांक्षेची.

अपयशाने खचून जाणारी व्यक्ती आयुष्यात काहीच साध्य करू शकत नाही. मात्र त्या अपयशातून बोध घेऊन पुढे वाटचाल करण्याची जिद्द काही व्यक्ती दाखवतात. या व्यक्ती मोठी प्रगती करू शकतात.

असे अनेक लोक आपल्याला माहित आहेत ज्यांनी अपयशाच्या अनेक पायऱ्यांवर चढत चढत अखेर यशाचे शिखर गाठले आहे. आज अशाच एका अवलियाची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याने थेट ‘सायबाच्या लंडन’मध्ये त्याचा व्यवसाय थाटला आहे.

तोदेखील भारतीयांचे अत्यंत आवडते प्येय असलेल्या चहाचा… 

 

rupesh-thomas-inmarathi

 

ह्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. काही काळाआधी थोडेसे पैसे घेऊन लंडन येथे आलेला हा तरुण आज १८ कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक आहे.

४१ वर्षीय रुपेश थॉमस हे मुळचे केरळ येथील आहेत. त्यांनी त्यांच्या चांगल्या भविष्याकरिता लंडनला जायचे ठरवले. आज रुपेश ह्यांचे इंग्लंडमध्ये दोन बंगले आहेत. ज्याची किंमत १०-१२ कोटी रुपये आहे.

 

rupesh-thomas-inmarathi02

 

पण हे सर्व रुपेशला असंच किंवा अगदी सहजपणे मिळालेलं नाही. त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली आहे. लंडनमधील त्यांचा सुरुवातीचा काळ फारच खडतर होता असं म्हणता येईल.

२००२ साली लंडनला गेल्यावर ते तिथल्या मॅकडोनाल्डमध्ये नोकरी करू लागले. जिथे त्यांना एका तासाचे ३५० रुपये मिळायचे.

परिस्थिती बिकट वाटत होती. तरीही त्यांनी आशा सोडली नाही. ते त्यांच्या पूर्ण निष्ठेने काम करत राहिले. काही काळाने त्यांना मार्केटिंगमध्ये नोकरी मिळाली. ज्यात ते सेल्समन बनून घरोघरी जाऊन सामान विकायचे.

त्यांच्यातील स्किल्स आणि कामाप्रती त्यांची प्रामाणिकता बघत त्यांना प्रमोट केले गेले. २००७ साली रुपेश ह्यांची ओळख एलेक्जेंड्रा हिच्याशी झाली. काही काळाने हे दोघे विवाहबंधनात अडकले.

 

rupesh-thomas-marriage-inmarathi

 

ह्याच दरम्यान त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली. त्यांच्या पत्नी अलेक्झांड्रा ह्यांना भारतीय चहा खूप आवडायचा.

 

rupesh-thomas-marriage-inmarathi

 

ह्यातून रुपेश यांना चहाचा व्यवसाय करण्याची कल्पना सुचली. एवढ्या वर्षांत रूपेशने जो काही पैसा जमा केला होता, ते सर्व पैसे गुंतवून त्यांनी इंग्लंडमध्ये चहाचा व्यवसाय सुरु केला.

हळूहळू त्यांचा हा व्यवसाय वाढू लागला. रुपेशच्या चहाचा हा ब्रँड फारच लोकप्रिय झाला. ह्या ब्रँडची लोकप्रियता एवढी वाढली की आज त्यांच्या चहाची सप्लाय इंग्लंडच्या सर्वात लग्जरी डिपार्टमेंटल स्टोर हार्वे निकोल्स ह्यांच्याकडे होत आहे.

 

tuktuk-brand-rupesh-inmarathi

 

आयुष्यातील एखाद्या साध्याशा घटनेमधून सुद्धा एखादी उत्तम कल्पना सुचू शकते. ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी असेल, तर यशस्वी होणे अशक्य नाही हे रुपेश थॉमस यांच्याकडे पाहून सांगता येते.

आज रुपेश थॉमस ह्यांनी दाखवून दिले की मेहनत आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर आपल्याला हवं ते आपण मिळवू शकतो…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?