' आकाशात लाखो तारे असूनही रात्र ही अंधारमय का असते? जाणून घ्या – InMarathi

आकाशात लाखो तारे असूनही रात्र ही अंधारमय का असते? जाणून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, एका दिवसात २४ तास असतात. ज्यात रात्र आणि दिवस अशी साधारण बारा-बारा तासांची विभागणी असते. म्हणजे पृथ्वीच्या ज्या भागासमोर सूर्य असेल तिकडे दिवस आणि दुसऱ्या बाजूला रात्र असते. पण वैज्ञानिकांना अनेक वर्षांपासून एक प्रश्न सतावतो आहे, तो म्हणजे जर अंतराळात असंख्य तारे आहेत आणि ते चमकत असतात, तर पृथ्वीवर रात्र ही काळी आणि अंधारमय का असते.

 

night-inmarathi
wikipedia.org

१९व्या शतकात जाणकार मानायचे की, ब्रम्हांड हे अनंत आहे. ते कधीही बदलत नाही. युरेका नावाच्या एका निबंधात लेखक एडगर एलन पो ह्यांनी सांगितले की, अंतराळाबाबत काही गोष्टी ह्या अत्यंत चुकीच्या आहेत. “जर ह्या ताऱ्यांच्या नभांगणाचा काहीही अंत नाही आणि जर ते स्थिर आहे, तर प्रत्येक रात्री आकाशातील रचना एकसारखीच दिसेल आणि अशी कुठलीच जागा असू शकणार नाही जिथून एकही तारा दिसणार नाही.

हे त्यांना पटलं नाही म्हणून त्यांनी ह्या दाव्याला आव्हान दिलं की अंतराळ हे अनंत नाही. पण तरी रात्र काळी का असते ह्यावर देखील प्रश्न उभे झाले. ह्यासोबतच असंख्य तारे, अनंत अंतराळ ह्यावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले.

 

night-inmarathi02
thenewsminute.com

ह्यावर जर्मन खगोलशास्त्रज्ञ हेनरीच विल्हेम ओल्बर्स ह्यांच्या मनात देखील एक प्रश्न उपस्थित झाला की, आकाशात लाखो चमकणारे तारे, ग्रह आहेत तरी देखील रात्र ही अंधारी का असते. १९ व्या शतकात ओल्बर्सच्या ह्या वक्तव्याला ओल्बर्स पॅराडॉक्स म्हटले गेले.

तर एडगर एलन पो ह्यांच्या निबंधानुसार, आकाशात एवढ्या मोठ्या संख्येत तारे आहेत जे मोजलेही जाऊ शकत नाही. त्यांनी सांगितले की, जेव्हा आपण टेलिस्कोपच्या मदतीने अंतराळात बघतो तेव्हा आपल्याला अनेक ठिकाणी रिकामी जागा दिसते. याचे हे एक कारण असू शकते की अंतराळ हे एवढं विशाल आहे की, कुठल्याही ग्रहावरून प्रकाशाची किरणे आपल्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. त्यांच हे वक्तव्य थोडेफार बरोबर देखील आहे. पण अश्याही अनेक गोष्टी आहेत ज्या कदाचित आपल्याला माहित नाहीत.

विसाव्या शतकापर्यंत खगोलशास्त्रज्ञ असे म्हणायचे की, अंतराळातील सर्व तारे मोजणे शक्य नाही. ते हे देखील मानायचे की, अंतराळ हे अनंत आहे.

 

night-inmarathi03
bbc.com

अल्बर्ट पो ह्यांचे वक्तव्य पटवून देण्यासाठी १९ व्या शतकातील काही वैज्ञानिकांनी सांगितले की, ताऱ्यांच्यामध्ये धुळीने बनलेले ढग आहेत जे त्यांच्या प्रकाशाला शोधून घेतात ज्यामुळे तो प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. पण त्यांनी हे नाही स्पष्ट केलं की हे धुळीचे ढग एवढा प्रकाश शोषून घेतल्यानंतर स्वतः चमकायला लागतील.

अंतराळ हे अनंत नाही तर त्यालाही सीमा आहे, ज्यात अरबो तारे आहेत पण ते एवढे जास्त देखील नाही की ते संपूर्ण अंतराळाला प्रकाशित करू शकतील. पण अंतराळात अंधार असण्याचं हे एकच कारण नाही.

आपण मानतो की अंतराळ हे अंतहीन आहे. ते दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यात गोष्टी बदलत असतात. पण हे एका मर्यादित आकारात आहे आणि ह्याला एक निश्चित वय देखील आहे.

आजपासून जवळपास १५ अरब वर्षांआधी बिंग बॅंग नावाच्या एका स्फोटाने आपल्या अंतराळाचा जन्म झाला होता. एका बिंदूवर ह्याचा जन्म झाला होता ज्यानंतर तो निरंतर वाढतच चालला आहे. आता हे अंतराळ मोठं होत चाललं आहे आणि त्यामुळे इतर तारे आणि आकाशगंगा एकमेकांपासून दूर होत चालल्या आहेत.

 

night-inmarathi01
apod.nasa.gov

जरी हे अगदी मंद गतीने होत असलं तरी प्रकाश देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला खूप वेळ लागतो. जेव्हा खगोलशास्त्रज्ञ १० लाख प्रकाशवर्ष दूर असलेल्या एखाद्या आकाशगंगेला बघतात तेव्हा ते त्या आकाशगंगेचं १० लाख वर्षांपूर्वीच रूप बघत असतात. कारण आज ह्या आकाशगंगेहून जो प्रकाश निघाला असेल त्याला आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप वेळ लागेतो. म्हणजेच दुरून येणारा प्रकाश रस्त्यात नष्ट देखील होत असेल आणि अनेकदा तो त्या स्पेक्ट्रममध्ये राहत नसेल जे आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकू.

खगोलशास्त्रज्ञ रुडॉल्फ किप्पेनहान म्हणतात की रात्रीच्या वेळी जेव्हा सूर्य पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूने असेल तेव्हा पहिल्या बाजूला अंधारच दिसेल. कारण आकाशगंगेबाबत आपल्याला अजूनही संपूर्ण माहिती नाही.

तर आता तुम्हालाही ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळालं असेल की, असंख्य चमकणारे तारे असतानाही रात्र ही अंधारमय का असते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?