' तुम्ही कल्पना केलेल्या स्वर्गाला विसरून जाल असे पृथ्वीच्या पोटातील अचाट सुंदर स्वर्गलोक! – InMarathi

तुम्ही कल्पना केलेल्या स्वर्गाला विसरून जाल असे पृथ्वीच्या पोटातील अचाट सुंदर स्वर्गलोक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण जेव्हा कुठलेही सुंदर ठिकाण बघतो, तेव्हा त्याची तुलना स्वर्गाशी करतो. कारण आपल्या माहितीप्रमाणे ह्या जगातील सर्वात सुंदर ठिकाणं म्हणजे स्वर्ग.

स्वर्ग आपण कधीही बघितला नाही, तर निव्वळ त्याची कल्पना केली आहे. त्यामुळे जेव्हा आपल्या डोळ्यांसमोर कुठलं नैसर्गिक सुंदर असं ठिकाणं येत तेव्हा आपण त्याची तुलना स्वर्गाशी करत असतो.

आता स्वर्ग खरंच आहे की, नाही हे तर आपल्यापैकी कुणालाच माहित नाही. पण आपल्या पृथ्वीवरच अनेक अशी ठिकाणं आहेत जे कदाचित स्वर्गापेक्षा काही कमी नाहीत.

आणि असेच काही ठिकाणं आपल्या पृथ्वीच्या पोटात लपलेली आहेत. आज आपण त्याच स्वर्गीय ठिकाणांचा फेरफटका मारणार आहोत.

हॅंग सोन डूंग गुहा, व्हियेतनाम

 

hang-son-doong-inmarathi
edition.cnn.com

 

केव्ह ऑफ दि माउंटेन नावाने प्रसिद्ध असलेल्या सोनू डंगू ही गुहा आजवर शोधलेली जगातील सर्वात मोठी गुहा आहे. व्हियेतनामच्या एका प्रसिद्ध राष्ट्रीय बागेत असलेली ही गुहा जवळपास २० ते ५० वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जातं.

निसर्गाची एक सुंदर आणि अनोखी निर्मिती आहे ही गुहा. ही गुहा ५ किलोमीटर लांब तर २०० मित्र उंच आणि १५० मित्र रुंद आहे.

सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे ह्या गुहेचं आपलं एक वेगळंच वातावरण आहे. ह्या गुहेच्या आत वेगवेगळ्या झाडा-झुडुपांनी भरलेलं जंगल देखील आहे.

 

प्यूर्टो प्रिंसेसा येथील भूमिगत नदी – फिलीपीन्स

 

Puerto-philipince-inmarathi
twitterom

 

ही नदी जगातील सर्वात लांब भूमिगत नदी आहे. ह्या नदीचा फेरफटका मारायला तुम्हाला नावेतून जावे लागेलं. २०१२ साली जगातील ७ आश्चर्यांत समाविष्ट करण्यात आलेली ही नदी फिलिपिन्सच्या पलावन ह्या बेटावर आहे.

२०१० साली झालेल्या एका शोधकार्यात ह्या भूमिगत नदीचा दुसरा तळ देखील शोधून काढला आहे, ज्यावरून हे कळून आलं, की जमिनीखाली ह्या नदीवर काही झरे देखील असू शकतात.

 

ओजार्क्स कवर्न्स गुहा – अमेरिका

 

Ozarks-inmarathi
pinterest.com

 

अमेरिकेच्या मिसौरी प्रदेशात असलेल्या ह्या गुहेला १८८० साली शोधण्यात आलं. ही गुहा एंजल शॉवर्स नावाने अतिशय प्रसिद्ध आहे. ह्या गुहेच्या छतावरून पाण्याच्या अनेक धारा केस्लाईटने बनलेल्या बाथटब सारख्या आकृतीत येऊन पडताना दिसतात.

ह्याला बघून असं वाटतं, की तुमच्यासाठी रीलॅक्स करण्यासाठी निसर्गाने स्वतः हा बाथटब बनवला आहे. आजवर एकूण १४ एंजल शॉवर्स ह्या गुहेत शोधण्यात आले आहेत.

 

सलीना तुरडा – रोमानिया

 

salina turda-inmarathi
businessinsider.com

 

रोमानिया येथील ट्रान्सिलवानिया जवळ असलेल्या मिठाची ही खाण १९९२ साली पर्यटकांसाठी उघडली होती. तेव्हापासून आजवर जवळपास २० लाख पर्यटकांनी इथल्या सौंदर्याचे दर्शन घेतले आहे.

सलीना तुरडा हे स्थान पर्यटकांसाठी विकसित करण्यासाठी रोमानिया सरकारने आतापर्यंत खूप पैसे खर्च केले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे ही सुंदर मिठाची खाण.

रीड फ्लूट गुहा – चीन

 

Reed-flute-inmarathi
imgur.com

 

पॅलेस ऑफ नॅचरल आर्ट ह्या नावाने प्रसिद्ध असलेली ही गुहा मागील १२०० वर्षांपासून चीन येथे येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र बनली आहे.

१८० वर्ष जुनी ही गुहा वेगवेगळ्या रंगांच्या लाईमस्टोनने सजलेली आहे. ही गुहा दुसऱ्या महायुद्धावेळी एका जपानी सैनिकाने शोधली होती.

 

स्प्रिंग्ब्रुक पार्क येथील नॅचरल ब्रिज – ऑस्ट्रेलिया

 

Natural-bridge-inmarathi
pinterest.com

 

ऑस्ट्रेलिया येथील क्वीन्सलँड क्षेत्रातील ब्रीसेन येत्हूल १०० किलोमीटरच्या अंतरावर हे सुंदर ठिकाण.

जिथे हा झरा एका गुहेच्या छताला भेदत पडत असतो. ह्यावेळी ह्या गुहेची छत ही एखाद्या पुल प्रमाणे दिसते, हे दृश्य डोळ्याचं पारण फेडणारं ठरतं.

 

वाइटोमो ग्लोवॉर्म गुहा – न्यूझीलंड

 

Waitomo-glowworm-cave-inmarathi
twitter.com

 

न्यूझीलंडच्या उत्तरी बेटावर स्थित ही गुहा, एका विशिष्ट प्रकारच्या चमकणाऱ्या फंगसमुळे खूप प्रसिद्ध आहे. ग्लोवार्म ह्या नावाने ओळखली जाणारी ही विशिष्ट फंगस केवळ न्यूझीलंड येथेच आढळते.

ग्लोवार्ममुळे ह्या गुहेत नेहेमी एक वेगळीच आणि तेवढीच सुंदर चमक पसरलेली असते.

जर खरंच कुठे स्वर्ग असेलं, तर ते असचं काहीसं दिसतं असेलं नाही का?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?