‘शिपायांचा उठाव’ आणि तात्या टोपेंचं धाडसी ‘ऑपरेशन रेड लोटस’
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
तात्यांच्या अज्ञात इतिहासाबद्दल कमी जणांना ठाऊक असेल.
१८५७; हे पर्व भारतातल्या बहुतांश लोकांना “शिपायांचे बंड” म्हणून माहित आहे. परंतु, जे लोक याला स्वातंत्र्ययुद्ध असं म्हणतात ते सुद्धा असं मानतात की ही एक उत्स्फूर्त घटना होती; याचं कारण म्हणजे भारतीय इतिहासकारांनी ब्रिटिशांचं युद्धाबद्दलचं जे काही वर्णन आहे तेच त्याविरुद्ध अनेक पुरावे असताना इतिहासात तंतोतंत उतरवून ठेवलंय.
जी काही संतुलित पुस्तके आज उपलबध आहेत त्यात सुद्धा लेखकांनी असं म्हटलंय कि कुठेतरी कट शिजत होता पण काहीही पुरावे उपलब्ध नाहीत.
त्यांना पुराव्यांसाठी फार लांब जाण्याची गरज नाहीये – “माझा प्रवास” ह्या पुस्तकात प्रत्यक्षदर्शी उल्लेख आपल्याला मिळतात. मी त्याचं इंग्रज भाषांतर वाचलंय, म्हणून म्हणतो की १८५७ बद्दल एक प्रामाणिक असं संशोधन व्हायला हवं. आता ज्या पुस्तकाबद्दल लिहिणारे खरं म्हणजे ती योग्य मार्गाने चालण्याची एक खूप चांगली सुरुवात आहे.
ह्या पुस्तकात अनेक असे पुरावे दिलेले आहेत जे सिद्ध करतात की १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध हे एक वेल प्लॅन्ड ऑपेरेशन होतं. ईस्ट इंडिया कंपन्यांचे (होय! अनेकवचन!) रेकॉर्डस्, युद्धाच्या आधीचे सुरु असतानाचे आणि नंतरचे पत्र – स्टेटमेंट्स, ब्रिटिश सरकारचे पत्र – रेकॉर्डस्, जे इंग्रज युद्धात सहभागी झाले अशांनी लिहिलेली पुस्तकं, ब्रिटिश संसदेच्या कामकाजाचे रेकॉर्डस्, काही भारतीय पुस्तकं – official आणि वैयक्तिक सुद्धा, “बंडखोरांचा” पत्रव्यवहार आणि अजून बरंच काही. हे सर्व पुरावे पुस्तकाच्या “Appendix” भागात व्यवस्थितरीत्या छापलेले आहेत… युद्धाच्या पूर्ण प्लॅनसकट!
पुस्तकाची सुरुवात ही युद्धपूर्व काळापासून होते, आणि ब्रिटिशांविरुद्धचा असंतोष हा कसा वाढत चालला होता याचं वर्णन आपल्याला मिळतं – हा असंतोष धार्मिक, राजकीय, आर्थिक या सर्वच स्तरांवर होता. हा काळ जरी बऱ्याच भारतीयांना माहित नसला तरी भारतीय इतिहासकारांनी याची व्यवस्थित नोंद करून ठेवलीये.
ब्रिटिश इतिहासकार आणि काही मूर्ख भारतीय अजूनही असं मानतात की ब्रिटिश राज हे भारतासाठी कल्याणकारी होतं. पुस्तकात भारताच्या अर्थव्यवस्थेचे पद्धतशीर खच्चीकरण आणि त्यामुळे भारतीयांचे झालेले हाल यावर प्रकाश टाकलेला आहे. हे पहिलं पुस्तक आहे ज्यात असं म्हटलंय की भारतीय सभ्यता हि ब्रिटिश सभ्यतेपेक्षा सांस्कृतिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या जास्त प्रगत होती.
या आधी शशी थरूर या धाटणीचं वाक्य बोलले होते, अत्यंत प्रगत भारतीय सभ्यतासुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर होती – असं ते म्हणाले होते.
पुस्तकात ब्रिटिशांचे दोन प्रमुख प्लॅन्सचा उल्लेख आपल्याला मिळतो – पहिला म्हणजे संपूर्ण भारताला ख्रिस्ती धर्मात कन्व्हर्ट करणे आणि दुसरा म्हणजे भारतीय लोकसंख्येत युरोपियन घटक वाढवणे.
ज्यांना हे पटत नसेल त्यांनी कृपया ब्रिटिशांच्या इतर वसाहतींकडे नजर टाकावी. १८५७-५९च्या घटनांमुळे हे प्लॅन्स पूर्ण फसले आणि त्यामुळेच असं म्हणता येईल – आपण युद्ध जरी हरलो असलो तरी स्वातंत्र्याचे पहिले युद्ध आपण जिंकलो होतो.
पुस्तकाचा भर हा प्रामुख्याने “लाल गुलाब” आणि “चपात्या” यांच्या पद्धतशीर वाटपावर आहे. हे वाटप पूर्ण वर्षभर फक्त ज्या ज्या ठिकाणी “उठाव” झाले त्या त्या ठिकाणीच करण्यात आले.
एवढच नव्हे पुन्हा असं कधी घडलं नाही. याचे पडसाद ब्रिटिश संसदेतही उमटले होते. बेंजामिन डेझराईली याने धोक्याची सूचना सुद्धा दिली होती. पण गुलाब आणि चपात्यांचा युद्धाशी संबंध काय? त्यासाठी हे पुस्तक वाचा.
पुस्तकात युद्धाचं वर्णन खूप खिळवून ठेवणारं आणि वाचकाच्या आत आत शिरत जाणारं आहे. इतिहासात लिहितांना झालेल्या चुकांना मस्त अधोरेखित करण्यात आलेलं आहे – आणि तेही इंग्रजांच्या नोंदींना रेफेरंस ठेऊन. हिंदू आणि मुस्लिम राजांच्या युतीला तसेच सामान्य जनांच्या सहभागालासुद्धा पुरावे देऊन सिद्ध करण्यात आलेलं आहे, त्यामुळे हे फक्त सैनिकांचे बंड होतं हे खोटं ठरतं.
इंग्रजांनी युद्धाच्या वेळी केलेले अमानवी अत्त्याचार हे हत्याकांडांच्या अनेक उदाहरणावरून दाखवून दिलेलं आहे – ज्यात संपूर्ण गावं उद्धवस्त करण्यात आली होती आणि तिथल्या रहिवाशांचा खून करण्यात आला होता.
ब्रिटिशांनी केलेली अनेक हत्याकांडं हे दाखवून देतात कि सभ्यतेच्या बाबतीत आपण किती पुढारलेलो आहोत. झाशी येथे झालेल्या हत्याकांडाचे कौतुक करणारे पत्र सुद्धा अस्तित्वात आहे. हा एक पूर्वनियोजित हल्ला होता, ज्यात सामान्य जनांमधून युद्धात उतरणाऱ्या लोकांना संपवण्याचा कट आखण्यात आला होता.
ही अमानवीय कावा यशस्वी ठरला – त्यानंतर तब्बल सत्तर वर्ष उठाव होण्यासाठी लागली. यावरून हे सुद्धा कळतं की का महात्मांनी आणि इतर नेत्यांनी उठाव करण्यास वेळोवेळी टाळलं – पुन्हा एक भयानक हत्याकांड होऊ नये याकरिता.
शस्त्रहीन नागरिकांवर हल्ला करणार नाही हे सिद्ध करण्यासाठी ब्रिटिशांनी १९१९ पर्यंत वाट बघितली. आजपर्यंत पाश्चिमात्त्य देशांमध्ये ही तथ्य स्वीकारली जात नाहीत आणि उच्च सभ्यतेच्या नावाखाली स्वत:चा ढिंढोरा पिटला जातो फक्त!
हे लोक इतके “सभ्य” होते की त्यांनी स्वतःच्या कुटुंबियांना एक ढाल म्हणून वापरल्याचे देखील उदाहरणं इतिहासात नमूद आहेत.
पुस्तकात युद्धाचा व्याप केवढा होता हे स्पष्टपणे दिलय. ब्रिटीश भारत गमावणार असच चित्र उभं राहिलं होतं. रशियाचा भारतात असलेला इंटरेस्टदेखील अधोरेखित करण्यात आलेला आहे. ही ब्रिटिशांची चिंता त्यांनी भारताचे दोन तुकडे करून कमी करण्याचा प्रयत्न केला.
पुस्तक आपल्या विद्वान इतिहासकारांची खिल्ली देखील उडवते. कारण- तात्या टोपेंच्या नियोजनाची, त्यांच्या शौर्याची त्यांना विषेश कल्पना नाही असं दिसतं. हे सगळं वाचून तुमच्या ओठांवर स्मित आल्याशिवाय राहणार नाही, आणि हृदयात असेल तो फक्त प्रार्थना भाव.
एकंदरीत हे पुस्तक सर्वांनी वाचलंच पाहिजे.
१८५७ शिवाय १९४७ झालच नसतं हे सिद्ध होतं. निर्घृण हत्याकांडांमुळे भारतीय लोक कसे गुलाम होऊन जगण्यास प्रवृत्त झाले हा याचा निष्कर्ष. ब्रिटिशांच्या निर्घृणतेमुळेच अहिंसावादी मार्ग स्वीकारावा लागला, तसेच ब्रिटिशांना हिंदू मुस्लिम ऐक्य देखील व्हायला नको होते.
ज्यांनी ह्या स्वातंत्र्ययुद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली आपलं त्यांच्यावर खूप मोठं कर्ज आहे.
===
Great Game India ह्या मॅगझीनमध्ये प्रकाशित झालेल्या श्री विशाल काळे ह्यांच्या बुक review चा मराठी अनुवाद.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.