तरुण वयातच केस पांढरे का होतात? त्यावर तुम्ही काय करू शकता?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
माणसाच्या सौंदर्यात भर घालण्यात त्याच्या केसांचा खूप मोठा हात असतो, आणि माणूस हा कोणाच्याही केसांवर पहिले भुळतो कारण दाट काळेभोर आणि नीट नेटके केस तुमची वेगळीच छाप समोरच्या व्यक्तीवर पाडतात!
आणि फक्त काळेभोर दाट केस असून चालत नाही, त्यांची एक विशिष्ट फॅशन असेल तर ते आणखीनच खुलून दिसते!
नुकत्याच आलेल्या आयुषमान खुराना याच्या ‘बाला’ चित्रपटातून याच समस्येवर भाष्य केले गेले, फक्त बाईच नाही तर अनेक पुरुषांना सुद्धा केसांच्या गळण्यावर किंवा चांगले केस नाहीत अशा समस्यांना सामोरे जायला लागते, जे कोणत्याही व्यक्तीला कधीच आवडत नाही!
अवेळी टक्कल पडणे, केस गळणे, केसांची वाढ नीट न होणे, केस लवकर पांढरे होणे, त्यासाठी वापरला जाणारा हेयर डाय आणि त्यातली केमिकल्स या अशा समस्यांना माणूस सुद्धा तितकाच जवाबदार आहे!
कारण केसांची योग्य काळजी न घेण किंवा त्यांना योग्य ते पोषण न मिळणं यामुळेच या समस्या उद्भवतात!
काळे, चमकदार केस हे सर्वांनाच हवे असतात. पण सर्वच एवढे नशीबवान नसतात. आजकालच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगात तर अवेळी केस पांढरे होणे हे आता सामान्य झाले आहे. कारण आता ६० नाही तर ३० वय असतानाचा लोकांचे केस पांढरे होतात.
पण तुम्हाला माहित आहे की, असे अवेळी केस का पांढरे होतात ते? तर ह्यामागे अनेक कारण असतात. अवेळी केस पांढरे होणे ह्यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत, तेच आपण आज जाणून घेणार आहोत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा – उष्णतेचा त्रास झाल्यावर तुम्ही काय करता? त्याने चक्क सूर्यदेवावर केस केलीय !
–
अवेळी केस पांढरे होणे ह्यामागील एक महत्वाचे कारण म्हणजे तणाव. ब्रिटीश वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीनुसार वैज्ञानिकांनी ह्याचा शोध लावला आहे की, तणाव आपल्याला वेळेआधीच वृद्धत्वाकडे घेऊन जातो.
मेलानिन हे एक असं तत्व आहे जे आपल्या केसांना काळं ठेवण्याचं काम करत. जेव्हा मेलानिन नवीन पेशींची निर्मिती करणे थांबवतं तेव्हा आपले केस हे पांढरे होऊ लागतात.
जसं शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या विटामिन्सची गरज असते तसचं केसांना काळे ठेवण्यासाठी विटामिन बी -१२ महत्वाचे असते. ह्याच्या कमतरतेमुळे मेलानिन नवीन पेशींची निर्मिती करू शकत नाही.
ज्या लोकांना नेहेमी डोकेदुखीचा त्रास असतो किंवा सायनस हा आजार असतो त्या लोकांचे केस देखील वेळेआधीच पांढरे होतात.
आजकाल केसांना सिल्की शाईनी बनविण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे शाम्पू आणि कंडिशनर उपलब्ध आहेत. त्याच्या जाहिराती देखील मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि त्या बघून आपल्या सारखे लोक ते केमिकल युक्त शाम्पू वापरतात. ह्यामुळे देखील केस पांढरे होतात.
आजकाल फक्त वृद्धांनाच नाही, तर लहान मुलांना तसेच तरुणांना देखील मधुमेह हा आजार होतो आहे. केस पांढरे होण्याचं हे देखील एक महत्वाचं कारण आहे.
जर तुम्ही मद्यपान, धुम्रपान, ड्रग्स इत्यादी गोष्टींच्या आहारी गेले असाल, तर हे देखील तुमचे केस पांढरे होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
अवेळी केस पांढरे होण्याचं एक कारण अॅनिमिया हे देखील असू शकतं. ह्यात शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे केसांना योग्य ते पोषण मिळत नाही, ह्यामुळे देखील केस पांढरे होऊ शकतात.
रात्री उशिरापर्यंत जागणे आणि दिवसभर काम करणे हे अत्यंत चुकीचे आहे. कारण शरीरासाठी झोपं ही खूप महत्वाची आहे. असं अवेळी झोपणे किंवा झोपं पूर्ण न घेणे ह्याने देखील केस पांढरे होऊ शकतात.
कधी कधी हे अनुवांशिक देखील असतं. जर तुमच्या कुटुंबातील कुणाचे म्हणजेच आजी-आजोबा, आई-वडील ह्यांचे केस जर अवेळी पांढरे झाले असतील, तर तुमचे केस देखील अवेळी पांढरे होऊ शकतात.
आपले केस पांढरे व्हायला लागले की, आपण लगेच त्याला डाय करायला लागतो. पण जास्त डाय केल्याने केस आणखी पांढरे होण्याची शक्यता असते. कारण ह्यात वापरण्यात आलेले केमिकल्स केसांकरिता अत्यंत हानिकारक असतात.
आणि सध्या तर जाहिरातीत सुद्धा दाखवतात की केमिकल्स शिवाय डाय आले आहेत पण खरं बघायला गेलं तर कोणताही डाय केमिकल्स शिवाय बनूच शकत नाही, कारण त टिकण्यासाठी त्यात केमिकल्स सारख्या गोष्टी घालाव्याच लागतात!
सध्याच्या तरुण मुलांमध्ये तर केस जाणून बुजून पांढरे करायचे किंवा वेगवेगळे कलर द्यायचे ही फॅशन झाली आहे, जी अत्यंत हानिकारक असून त्यांचे परीणाम खूप वाईट आहेत! कारण तरुण वयात केसांना योग्य ते पोषण न मिळता केमिकल्स चा भडिमार झाल्यामुळे सध्याच्या तरुण पिढीला ही त्रास भोगावे लागतात!
आपलं रूप आपल्याच हातात असतं, त्यामुळे त्याची कशी काळजी घ्यायची आणि केसांची कशाप्रकारे निगा राखावी हे प्रत्येकाला मनावर घ्यायला पाहिजे, फॅशन किंवा ट्रेंड चा विचार थोडा बाजूला ठेवून काय गुणकारी किंवा काय जास्त चांगलं आहे याकडे लक्ष देणं गरजेच आहे!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – गळणाऱ्या केसांना घरगुती उपायांनी ब्रेक लावायचा असेल तर या टिप्स उपयोगी ठरतील
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.