USB चिन्ह ते बाटल्यांच्या झाकणांतील रबरी चकती: रोजच्या जीवनातील ९ महत्वाच्या फॅक्टस!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या मनात नेहेमी काही प्रश्न येत असतात पण ह्या धावपळीच्या जीवनात आपल्याला इतरांचं सोडा स्वतःचच ऐकायला वेळ नाही. म्हणून आपण ह्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो. ज्या गोष्टींबाबत आपल्याला प्रश्न पडतात त्यांची उत्तर न शोधता आपण त्याकडे कानाडोळा करतो. आपल्याला त्या गोष्टींची उत्तरे जाणून घ्यायला हवी.
तुम्ही केला असेल कानाडोळा पण आम्ही नाही… म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी तुम्हाला पडणाऱ्या काही अश्याच प्रश्नांची उत्तर घेऊन आलो आहोत…
i-phone च्या कॅमेरा आणि फ्लॅशमध्ये छिद्र का असते?
जर तुम्ही कधी लक्ष दिले असेल तर तुमच्या लक्षात आले असणार की i-phone च्या कॅमेरा आणि फ्लॅशमध्ये एक अगदी छोटसं छिद्र असतं. पण तुम्हाला माहित आहे का हे छिद्र का असते. तर हे छिद्र ह्यासाठी असते रिअर कॅमेऱ्याने व्हिडीओ बनविताना आवाज रेकॉर्ड करण्याचं काम करता यावं.
बॅग स्लॉटेड पॅच :
बॅगवर असणारे स्लॉटेड पॅच ज्यांना लॅश टॅब्स देखील म्हणतात ते तुम्ही बघितले असेलच. पण अनेकांना वाटते की हे बॅगला आणखी सुंदर बनविण्यासाठी असतात पण असं नाहीये, हे स्लॉटेड पॅच बॅगला एखादी गोष्ट टांगण्यासाठी केलेली सोय असते.
USB चा लोगो :
त्रिशूलच्या आकाराचा USB चा लोगो हा तर आपण सर्वांनीच बघितला असेलं. हा लोगो असा ह्याकरिता बनविला गेला कारण त्रिशूल हा शक्ती दर्शवतो, त्याचप्रमाणे USB वरील हा लोगो हा टेक्नोलॉजीच्या शक्तीला दर्शवतो.
वाईनच्या बॉटल मधील स्टेम :
तुमच्या हाताची उब लागून वाईनचे तापमान वाढू नये म्हणून वाईनच्या बाटलीनाध्ये स्टेम लावलेले असते.
बार्बी डॉलचं पूर्ण नावं :
बार्बी ही सर्वच लहान मुलांची आवडती बाहुली आहे. हिला बनविणाऱ्या कंपनीने म्हणजेच Mattel, Inc ने ह्या बाहुलीचे पूर्ण नाव Barbara Millicent Roberts असे ठेवले होते. एवढचं नाही तर हिचे George आणि Margaret Roberts नावाचे आई-वडील देखील आहेत.
टॉयलेट पेपर :
पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी अनेक ठिकाणी टॉयलेट पेपरचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, की ह्या टॉयलेट पेपरच्या एका दिवसाची जगभरातली गरज पूर्ण करण्यासाठी ३० हजार झाडं कापावे लागतात. म्हणजे पाणी वाचविण्यासाठी आपण निसर्गाचा ऱ्हास करतोय.
टाळ्याच्या खाली एक छिद्र असते :
टाळ्याच्या खाली एक छोटेसे छिद्र असते जेणेकरून पावसात जर टाळं लावलं तर त्यात पाणी जमा होऊ नये तर ते वाहून जावं आणि त्यावर गंज चढू नये.
स्नीकर ला हे नाव कसं पडलं? :
स्नीकर ह्या शब्दाचा अर्थ हा गुप्तपणे काही करणे असा होतो. त्यामुळे ह्या बुटांना स्नीकर्स हे नाव देण्यात आले कारण हे बूट घालून चालल्याने आवाज होत नाही.
बाटलीच्या झाकणात ती रबरची डिस्क का लागलेली असते? :
जर तुम्ही कधी लक्ष दिलं असेलं तर तुम्हाला प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणात एक रबरची डिस्क लागलेली दिसली असेलच. पण कधी तुम्ही विचार केला की ही रबरची डिस्क झाकणात का लावली जात असेल? तर ही डिस्क ह्याकरिता लावली जाते जेणेकरून त्या बाटलीतील कार्बोनेशन हे उडून जावू नये तर ते टिकून राहावे. जर तुमच्या कोल्ड्रिंकच्या प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणात ती रबरची डिस्क बसवली नाही तर त्याचा फीज काही वेळातच निघून जाईल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.