' आदिमानवाची ओळख पुन्हा नव्याने पटणार ? – InMarathi

आदिमानवाची ओळख पुन्हा नव्याने पटणार ?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

वैज्ञानिकांनी मानवाच्या सर्वात जुन्या अवशेषांना शोधून काढल्याचा दावा केला आहे. सौदी अरब येथे वैज्ञानिकांना मानवाच्या मधल्या बोटाच्या हाडाच्या तुकड्याचे जीवाश्म आढळले आहेत. जे ८५,००० वर्ष जुने असल्याचे सांगितले जात आहे. ह्यामुळे आता मानवाचे अस्तित्वाचे आणि त्याच्या प्रवासाचे नवे खुलासे होणार आहेत.

 

human fossil-inmarathi04
adityafebriansyah1.blogspot.in

अरेबियन पेनिन्सुला येथे आढळलेले हे जीवाश्म आफ्रिकेच्या बाहेर सापडलेले सर्वात जुने जीवाश्म आहे. वैज्ञानिकांना हे जीवाश्म Al Wusta Site येथून मिळाले.

काहीच दिवसांपूर्वी आशियात देखील ८० हजार वर्ष जुने मानवाच्या दातांचे जीवाश्म सापडले होते. तर इकडे ऑस्ट्रेलियात ६५ हजार वर्ष जुने मानवाचे अवशेष आढळून आले होते.

ह्या सर्व जीवाश्मांच्या माध्यमातून हे कळून येते की, आफ्रिकेच्या आधी देखील आदिमानव हा आफ्रिकेतून खूप आधीच इतर क्षेत्रांत पोहोचला होता.

 

human fossil-inmarathi
nytimes.com

३०० हजार वर्षांपूर्वी आपले पूर्वज हे आफ्रिकेत राहत होते. वैज्ञानिक आधी असे मानायचे की, ६० हजार वर्षांआधी आफ्रिकेतून मानवांनी सोबतच स्थलांतर केले. पण आता हे हाडांचे नवे जीवाश्म मिळाल्याने हे दिसून येत आहे की, आपल्या पूर्वजांनी आफ्रिकेतून सोबत स्थलांतर नाही केले तर त्या आदिमानवांनी वेगवेगळ्या वेळी स्थलांतर केले.

सौदी अरब येथे मिळालेले हे जीवाश्म ह्याचं प्रमाण आहे की आपले पूर्वज हे निव्वळ समुद्राच्या किनारीच नाही तर समुद्रापासून दूर असलेल्या क्षेत्रात देखील राहायचे.

केवळ माणसांचेच नाही तर जनावरांचे देखील काही जीवाश्म येथे आढळले आहेत. त्यासोबतच दगडांचे काही अवजार देखील सापडले आहेत. ह्यामुळे आता मानवाच्या अस्तित्वाबाबत अनेक प्रश्न उभे झाले आहेत. तसेच Al Wusta क्षेत्रात असणाऱ्या ह्या आदिमानवांच्या अंत कसा आणि का झाला असावा हे जाणून घेणे ह्याहून रंजक ठरणार आहे. आता वैज्ञानिक ह्या दृष्टीने शोध घेत आहेत. ह्यातून आदिमानवांसंबंधी नक्कीच काहीतरी रंजक अशी माहिती समोर येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?