' या मंदिराचे अप्रतिम सौंदर्य आणि वास्तुशास्त्र पाहून तुम्ही ताजमहाल विसरून जाल! – InMarathi

या मंदिराचे अप्रतिम सौंदर्य आणि वास्तुशास्त्र पाहून तुम्ही ताजमहाल विसरून जाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत हा देश प्राचीन काळापासून जगासाठी आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. अनेक आकर्षण निर्माण करणारे घटक त्यासाठी कारणीभूत आहेत.

भारतीय संस्कृती आणि सभ्यता नेहमीच जगाला मार्गदर्शक ठरलेली आहे.

अनेक नवीन कला आणि संस्कृती या देशात जन्माला आल्या. आजही त्या प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा भारतामध्ये बघायला मिळतात.

भारतामध्ये फक्त एकाच संस्कृतीच्या नव्हे, तर अनेक मिश्रित संस्कृतीच्या आठवणी देखील तुम्हाला जुन्या वास्तु कलेतून बघायला मिळतील.

आपल्याकडे आजही अनेक अशा पुरातन वास्तू उपलब्ध आहेत ज्यामध्ये तुम्हाला अनेक संस्कृती आणि सभ्यता यांचा संगम बघायला मिळेल.

आपल्या देशामध्ये अनेक प्राचीन आणि पुरातन अशा वास्तू आज देखील आपण जतन करून ठेवलेल्या आहेत. यातीलच एक प्रसिद्ध वास्तु म्हणजे ताजमहल!!

ताजमहाल म्हणजे भारताची शान…..जगातील सात आश्चर्यांपैकी एक! प्रेमाची निशाणी म्हणून शाहजहाँ याने आपली बेगम मुमताजसाठी बांधून घेतलेली ही वास्तू जगभरात भारताची ओळख निर्माण करते.

शाहजहाने आपली प्रिय पत्नी मुमताज साठी ही वास्तु बांधली असली, तरी त्याच्या सौंदर्यामुळे आज संपुर्ण जगातील सर्वोत्तम वास्तुंपैकी एक आहे.

ताजमहल हे जगभरातील सर्वात जास्त भेट देली जाणारे स्थळ आहे. दररोज जगभरातून जवळपास १२,००० लोक ताजमहल पाहण्यासाठी येतात.

 

tajmahal InMarathi

हे ही वाचा – दिवसातून दोनवेळा अदृश्य होतं हे महादेवांचं मंदिर… वाचा यामागची रहस्यकथा…

भारतात अनेक जागा अशाही आहेत, ज्यांचं स्थापत्यशास्त्र खूप अलौकिक आहे, पण आपल्याला माहित देखील नाही.

राजस्थानच्या माउंट आबू येथील दिलवाडा हे मंदिर प्राचीन भारताच्या अप्रतिम वास्तूकलेचे एक आश्चर्यकारक उदाहरण आहे. पण तरी हे मंदिर अजूनही अज्ञात आहे.

 

DILWARA JAIN TEMPLE-inmarathi

 

हे मंदिर आणि ह्याची वास्तूकला एवढी सुंदर आहे, की त्यासमोर आपण ताज महाल देखील विसरून जाऊ. सुंदर आणि मन मोहून टाकणारं, अद्वितीय सौंदर्य आहे ह्या मंदिराचं.

एकीकडे ताज महालाचे बांधकाम हे ६ व्या शतकात झाले ,तर ह्या दिलवाडा मंदिराचे बांधकाम हे ११ व्या ते १३ शतका दरम्यान झाले. हे मंदिर देखील ताज महालाप्रमाणे संगमरवराचं आहे.

 

DILWARA JAIN TEMPLE-inmarathi01

 

हे मंदिर पाच मंदिरांचं एकत्रित करून बनविलं आहे. ह्याचे बांधकाम हे सोलंकी राजा वास्तूपाल आणि तेजपाल ह्या दोन भावंडांनी केले होते. हे सुंदर मंदिल जैन धर्माच्या तीर्थकरांवर आधारित आहे.

विमल वसही मंदिर : प्रथम जैन तीर्थंकर ऋषभदेव
लुन वसही मंदिर : २२ वे जैन तीर्थंकर नेमीनाथ
पीतलहर मंदिर : प्रथम जैन तीर्थंकर ऋषभदेव
पार्श्वनाथ मंदिर : २३ जैन तीर्थंकर पार्श्वनाथ
महावीर स्वामी मंदिर : अन्तिम जैन तीर्थंकर महावीर

 

DILWARA JAIN TEMPLE-inmarathi02

 

ह्यापैकी विमल मंदिर हे सर्वात प्राचीन आहे. जे १०३१ मध्ये बनविण्यात आले होते. हे मंदिर बनविण्यात १५०० शिल्पकार आणि १२०० श्रमिकांना खूप मेहनत करावी लागली होती.

दिलवाडा हे मंदिर पूर्ण होण्यासाठी १४ वर्षांचा कालावधी लागला. तर ह्याकरिता १८ कोटी रुपयांचा खर्च आला होता. ह्या पितलहार मंदिरातील ऋषभदेवाची पंचाधातुने बनलेली मूर्ती आहे. या मूर्तीचे वजन हे तब्बल ४ हजार किलोग्राम आहे.

विमल  मंदिर येथील आदिनाथ मूर्तीत खरे हिरे लागले आहेत. बाहेरून जरी हे मंदिर इतर मंदिरासारखे वाटत असलं तरी त्याची शिल्पकला ही अप्रतिम आहे. हे मंदिर खरचं वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना आहे.

 

DILWARA JAIN TEMPLE-inmarathi04

 

ललित कलाकृती आणि उत्कृष्ट मूर्तीकलेचे उदाहरण ह्या मंदिरात बघायला मिळतात. ह्याच्या भिंतींवर आणि छतावर बारीक नक्षीकाम अतिशय बारकाईने केलेले दिसते.

ह्या मूर्तीवर कोरण्यात आलेले भाव अगदी सजीव असे वाटतात. एवढे वर्ष जुने असूनही ह्या मूर्तीवरील चमक अजूनही नव्यासारखीच दिसते.

संगमरवरच्या दगडावर केलेले नक्षीकाम अत्यंत बारीक आणि सुंदर आहे. आजची आधुनिक वास्तुकला आणि शिल्पकला ह्या मंदिरातील शिल्पकलेच्या तुलनेत काहीच नाही.

 

DILWARA JAIN TEMPLE-inmarathi05

हे ही वाचा – भगवान विष्णूचे ‘सर्वात मोठे मंदिर’ आहे भारताबाहेर, त्याचा रंजक इतिहास ठाऊक आहे का?

दिलवाडाचे हे मंदिर बनविण्याची सुरवात ही सोलंकी राजा भीमदेवचे महामंत्री विमलशहा ह्यांनी केली. राजा भीमदेव ने चंद्रावती राजवटीत झालेले बंड नियंत्रित करण्यासाठी विमलशहा ह्यांना पाठवले होते.

हे बंड शांत करण्यासाठी खूप रक्तपात केला, त्यामुळे त्यांना अत्यंत निराशा वाटू लागली. त्यांनी एका जैन साधूला ह्या पापाचे पश्चाताप कसे करू, मला ह्या पापातून मुक्त करण्याचा एखादा मार्ग सांगा अशी विनंती केली.

तेव्हा त्या जैन साधकाने विमलशहाला सांगितले की, पापातून पूर्णपणे मुक्ती मिळणे हे तसे कठीणच, पण मंदिर बनवून तू थोडं पुण्य नक्की कमवू शकतो.

ह्याचीच प्रेरणा घेत विमलशहाने हे मंदिर बनविण्यास सुरवात केली. आणि त्यातून हे सुंदर, अलौकिक असे मंदिर उभारले गेले.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?