' खवय्यांच्या पसंतीचे ‘कडकनाथ’ चिकन आता मिळणार घरपोच ! कसे ते जाणून घ्या.. – InMarathi

खवय्यांच्या पसंतीचे ‘कडकनाथ’ चिकन आता मिळणार घरपोच ! कसे ते जाणून घ्या..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपल्याला समाजामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन प्रकारची माणसे पाहायला मिळतात. मांसाहारी माणसे ही शाकाहारी माणसांपेक्षा अधिक सुदृढ असतात, असे मानले जाते. मांस, मच्छी अशा खाद्यपदार्थांपासून आपल्याला योग्य ती पोषक घटक मिळतात. त्यामुळे मांस खाणे थोड्याफार प्रमाणात कधीही खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते.
जर तुम्ही मांसाहारी असाल, तर तुम्ही कधीतरी नक्कीच कडकनाथ चिकन हे ऐकले असेल किंवा कुठेतरी पाहिले देखील असेल. कडकनाथ चिकन हे इतर आपल्या सामान्य बॉयलर चिकनपेक्षा आरोग्यासाठी चांगले असते आणि त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या आजारांपासून लांब राहण्यास मदत होते.

 

Kadaknath app.Inmarathi
thehindu.com

मध्यप्रदेशच्या झाबुआ बरोबरच इतर काही जिल्ह्यांमध्ये कोंबड्याची एक खास जात पाहायला मिळते. या कोंबड्याच्या जातीला कडकनाथच्या नावाने ओळखले जाते. या कोंबड्याची विशेषता ही आहे की, या कोंबड्याच्या मांसामध्ये फॅट कमी असते आणि प्रोटीन हे जास्त प्रमाणात असते. त्यामुळे या प्रकारच्या कोंबड्यांना मागणी जास्त असते. आता तर तुम्हाला हा कडकनाथ कोंबडा घरी बसूनच मिळेल, कारण यासाठी सहकारिता विभागाने ‘मध्यप्रदेश कडकनाथ अॅप’ तयार केले आहे.

कडकनाथ कोंबड्याची विशेषता

स्थानिक भाषेमध्ये कडकनाथला कालीमासी देखील म्हटले जाते, कारण याचे मांस, चोच, जीभ, पाय, चामडी, पिसे हे सर्वकाही काळ्या रंगाचे असते. हा कोंबडा प्रोटीनयुक्त असतो आणि यामध्ये फक्त नावापुरती चरबी असते. असे म्हटले जाते की, हृदयाचा आजार असलेल्या लोकांसाठी आणि मधुमेह असलेल्या लोकांसाठी कडकनाथ एक सर्वात उत्तम औषध आहे. याव्यतिरिक्त कडकनाथ या कोंबड्याला सेक्स वर्धक देखील मानले जाते. याच्या व्यतिरिक्त यामध्ये व्हिटामिन बी १, बी २, बी ६ आणि बी १२ खूप मोठ्या मात्रेमध्ये असते. एवढेच नाहीतर याचे मांस खाल्ल्याने डोळ्यांची नजर देखील वाढते.

 

Kadaknath app.Inmarathi1
imimg.com

याच्या तीन प्रकारच्या प्रजाती असतात

कडकनाथ कोंबड्याच्या प्रजातीचे तीन रूपे आहेत. त्यातील पहिला प्रकार म्हणजे जेड ब्लॅक याचे पंख पूर्णपणे काळे असतात. दुसरा प्रकार म्हणजे पेंसिल्ड, या कोंबड्याचा पेन्सिलसारखा असतो. या कोंबड्यांच्या पंखांवर पेन्सिल शेड दिसून येतात. यातील तिसरी आणि शेवटीची प्रजाती ही गोल्डन कडकनाथ असते. या प्रकारच्या कोंबड्याच्या पंखावर गोल्ड ठिपके असतात.

या कोंबड्यांची किंमत चकित करणारी आहे

स्वादिष्ट चिकन असल्यामुळे या कोंबड्यांच्या चिकनला खूप मागणी आहे. कडकनाथ हा कोंबड्यांचा प्रकार मध्यप्रदेशच्या झाबुआ आणि धार भांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. तसेच, छत्तीसगढ, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांमध्ये देखील कडकनाथ चिकन मिळते. पण आता या कोंबड्याची मागणी देशातील कान्याकोपऱ्यामधून येत चालली आहे. कर्नाटक, उत्तरप्रदेश, हैदराबाद या राज्यांमधील लोक कडकनाथची पिल्ले घेऊ इच्छित आहेत.

 

Kadaknath app.Inmarathi2
agrifarming.in

आता परिस्थिती अशी झाली आहे की, झाबुआचे कृषी विज्ञान केंद्र असलेल्या हॅचरीमध्ये कडकनाथ या जातीच्या कोंबड्यांची पिल्ले घेण्यासाठी महिन्यांपासून वेटिंग चालू आहे. या प्रजातीच्या कोंबड्यांची अंडी देखील खूप महाग असतात. या कोंबडीचे एक अंडे जवळपास १५ रुपयांना विकले जाते. तसेच, एका कडकनाथ कोंबड्याची किंमत ९०० ते १२०० रुपये प्रतिकिलो एवढी असते. तसेच, या जातीच्या कोंबडीची किंमत ३००० रुपयांपासून ४००० रुपयांच्या दरम्यान असते.

 

Kadaknath app.Inmarathi3
medifitbiologicals.com

मध्यप्रदेश सरकारने कडकनाथ मोबाईल अॅप तयार केले आहे. कडकनाथ अॅपच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती कडकनाथ कोंबडा खरेदी करण्यासाठी ऑनलाईन मागणी करू शकतो. भविष्यात या ऑनलाईन ऑर्डर बरोबरच होम डिलेव्हरीची सुविधा देखील उपलब्ध करण्यात येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?