' एकेकाळी अडगळीच्या खोलीत सुरू झालेल्या या कंपन्या आज करत आहेत कोट्यवधींची उलाढाल! – InMarathi

एकेकाळी अडगळीच्या खोलीत सुरू झालेल्या या कंपन्या आज करत आहेत कोट्यवधींची उलाढाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपण नेहमी तक्रार असतो की, आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, फक्त ती संधी मिळत नाहीये. पण तुम्हाला माहित आहे का, आज जगात ज्या अनेक बड्या कंपन्या आहेत, त्यांची सुरुवात ही अगदी छोट्या ठिकाणांपासून झाली आहे.

हे अरबोंचे व्यवसाय हे एका छोट्याश्या गॅरेजपासून सुरु झाले आहेत. म्हणजे ह्या मोठ-मोठ्या कंपन्या आहेत ना, त्यांचं पहिलं कार्यालय म्हणजे छोटी अडगळीची खोली होती.

 

गुगल :

 

google-inmarathi

 

गुगल शिवाय तर आज आपले जीवनच अपूर्ण आहे. आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे गुगलकडे असतं. जवळजवळ जगभरातील सर्वच लोक आज गुगलचा वापर करतात.

हल्ली तर गुगलच्या कॅम्पसबद्दल देखील खूप चर्चा असते. आज गुगलचे कार्यालय हे जगातील सर्वात मोठ्या आणि पसरलेल्या कार्यालयांपैकी एक आहे.

हे कार्यालय एवढे अप्रतिम आहे की, लोक तेथे काम करण्याचं स्वप्न बघतात. पण आज वेगेवगळ्या ठिकाणी एवढी मोठमोठी कार्यालये असणाऱ्या गूगलची ही स्थिती आधीपासून नव्हती. गुगलची सुरुवात देखील एका छोट्याश्या ठिकाणावरुनच झाली आहे.

गुगल सुरु करण्यासाठी लॅरी पेज आणि सर्जेई ब्रायन ह्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यांनी एका गॅरेज पासून ह्याची सुरवात केली.

एवढचं नाही तर गुगलची निर्मिती केल्यानंतर त्यांना वाटले की याचा वाईट परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत आहे म्हणून त्यांनी गुगलला विकण्याचा देखील प्रयत्न केला. पण ते काही शक्य झाले आणि आणि आज गुगल हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे.

 

अॅमेझॉन :

 

amazon-inmarathi

 

ही कंपनी आज जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अशी ऑनलाईन रिटेलर कंपनी आहे. १९९४ साली जेव्हा ह्या कंपनीची सुरुवात झाली तेव्हा ह्या कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस ह्यांच्याकडे कुठलंही मोठं ऑफिस नव्हतं.

त्यांनी त्यांच्या स्टोररूममध्येच एक ऑनलाईन बुक स्टोर उघडले आणि ह्या कंपनीने १९९५ साली आपलं पहिलं पुस्तक विकलं. १९९७ साली जेफ ह्यांनी आपलं हे छोटसं बुक स्टोर लोकांकरिता खुलं केलं.

ह्या Amazon.com वर आपल्याला गरजेची प्रत्येक वस्तू आज उपलब्ध आहे. आज जेफ यांना जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणले जातात.

 

अॅप्पल :

 

apple-inmarathi

 

जगभरातील इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस प्रेमींसाठी अॅप्पल ही सर्वात आवडती कंपनी आहे. ती एक स्टेटस सिम्बॉल आहे. आज अॅप्पलची मार्केट वॅल्ह्यू ही १ ट्रिलियन डॉलर एवढी आहे. आज अॅप्पल ही एक अतिशय यशस्वी कंपनी आहे.

ह्या कंपनीची सुरुवात देखील एका गॅरेज पासूनच झाली होती. १९७६ साली स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोजनिएक ह्या दोघांनी मिळून अॅप्पल कंपनीची स्थापना केली होती.

त्यावेळी स्टीव्ह जॉब्स हे केवळ २१ वर्षांचे तर वोजनिएक हे २६ वर्षांचे होते. ह्यांनी त्यांच्या ह्या कंपनीची सुरवात कॅलिफोर्निया येथील एका गॅरेजमधून केली होती. तेथेच त्यांनी पहिला अॅप्पल कॉम्प्युटर तयार केला होता.

 

डिजनी :

 

disney-inmarathi

 

लहान तसेच मोठ्यांना देखील वेड लावेल असं प्रसिद्ध थीम पार्क, डिजनी हे सुरुवातीला एवढा सुंदर नव्हतंच. वॉल्ट डिजनी आणि त्यांच्या भावाने त्यांच्या काकाच्या गॅरेजमध्ये पहिला डिजनी स्टुडीओ सुरु केला.

येथेच एलिस कॉमेडीजची शुटींग करण्यात आली होती. आज हा डिजनी लॅण्ड जगभरातील लहान मुलांची आवडती जागा आहे. तसेच तो हॉलीवूड चित्रपट स्टुडीओ देखील आहे.

एका गॅरेजपासून सुरु झालेला हा प्रवास आज इथवर येऊन पोहोचला आहे की, आज डिजनी जगातील सर्वात जास्त कमाई करणारी मनोरंजन कंपनी बनली आहे.

 

हार्ले डेव्हीडसन :

 

Harley-Davidson-inmarathi

 

बाईक प्रेमींसाठी हार्ले डेव्हीडसन चालवणं हे एक स्वप्न असतं. १९०१ साली २१ वर्षांच्या विलियम हार्ले ह्याने त्याच्या सायकलची क्षमता वाढविण्यासाठी त्यात एक छोटंसं इंजिन बसविण्याचं ठरवलं.

दोन वर्षानंतर त्यांनी त्यांच्या बालपणीचा मित्र अर्थर डेव्हिडसन ह्याच्या सोबत गॅरेजमध्ये पहिल्यांदा एक मोटारसायकल बनवली. तर हार्ले डेव्हिडसन कंपनीची अधिकृत स्थापना १९०३ साली झाली.

आज ही जगातील सर्वात प्रसिद्ध मोटारसायकल कंपन्यांपैकी एक आहे.

 

मायक्रोसॉफ्ट

 

microsoft-inmarathi

 

बिल गेट्स आणि पॉल एलेन यांनी १९७५ साली अगदी थोड्याश्या संसाधनांच्या मदतीने एका गॅरेजमध्ये ह्या कंपनीची सुरवात केली होती.

मायक्रोसॉफ्टचा कल हा केवळ सॉफ्टवेयर मार्केटकडे होता. आईबीएम सोबत काम करताना कंपनीने आपल्या पहिल्या ऑपरेटिंग सिस्टीमचा लायसन्स घेण्यासाठी केवळ ८० हजार डॉलर द्यावे लागले होते.

आज ह्या सर्व कंपन्या यशाच्या शिखरावर येऊन पोहोचल्या आहेत.  आपण हे विसरायला नको की यांची सुरुवात ही मात्र एका छोट्याश्या गॅरेज पासून झाली होती. त्यामुळे सुरवात ही मुळात महत्वाची, त्यानंतर आपल्या मेहनतीवर यश हे अवलंबून असते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?