नवी टेक्नॉलॉजी; कधीही पंक्चर न होणारे स्टायलिश टायर्स!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लहानपणी आपल्या सगळ्यांनाचं सायकल चालवायला आवडायची आणि आजही आवडते यात दुमत नाही. सायकलमध्ये ना पेट्रोल टाकाव लागतं ना कोणती चार्जिंग करावी लागते. सायकल विकत घेतली की मोटारसायकलवर जसा सारखा खर्च करावा लागतो तसा खर्च देखील करावा लागत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सायकल चालवल्याने शरीराचा चांगलाच व्यायाम होतो. जर तुम्ही दिवसा किमान २ तास जरी सायकल चालवली तरी तुमच्या शरीराचा पुरेसा व्यायाम होतो असं तज्ञांचं देखील मतं..!
पण म्हणतात ना एखादी गोष्ट कितीही उपयोगाची असू द्यात, कोठे ना कोठे तरी तिच्यात उन्नीस-बीस असतंच. सायकलमध्येही इतकं सगळ असूनही हे वाहन एका गोष्टीत मात्र मार खातं. ती गोष्ट म्हणजे टायर पंक्चर होणे. टायर पंक्चर झाला की थांबला ना रावं आपला प्रवास ! मग गॅरेज शोधा तिथे टायरचं पंक्चर काढा. मुख्य म्हणजे गॅरेज जवळपास असेल तर उत्तम, पण काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गॅरेज पर्यंत सायकल घेऊन जाणं म्हणजे अगदीच जीवावर येतं. सायकल चालवणाऱ्या प्रत्येकाला हा अनुभव कधीना कधी आलाचं असेल आणि नेहमी आपल्या सायकलचे गुणगान गाणाऱ्या प्रत्येकाने त्या परिस्थितीत सायकलला चार शिव्या हासडल्याच असतील. आजही तुम्ही सायकल वापरत आहात आणि कधीकधी उद्भवणाऱ्या या टायरच्या कटकटीला तोंड देत असाल तर बॉस आता तुमची ही समस्या कायमची दूर होणार आहे.
तंत्रज्ञान ही अशी गोष्ट ज्यामुळे आपलं जीवन अगदीच सुकर झालं आहे आणि या सायकलच्या टायरच्या समस्येसाठी देखील हेच तंत्रज्ञान आपल्यासाठी धावून आलं आहे. टायर पंक्चर न होण्यासाठी यापूर्वीही भरपूर संशोधन करण्यात आले, त्यामुळे ही काही नवीन वा आगळीवेगळी संकल्पना नाही म्हणा!! जगभरात अनेक उचापतखोरांनी जमेल तसा आपल्या संकल्पनेला आकार दिला. ‘फ्लॅट-फ्री ‘ टायरची संकल्पना ही त्यापैकीच एक!! परंतु त्यांच्या कडक आणि ताठरपणामुळे ग्राहकांमध्ये हे टायर्स जास्त प्रसिद्ध होऊ शकले नाहीत.
अमेरिकेच्या ‘उटाह’ राज्यामध्ये रेयान, जॅक आणि डेव्ह हे तीन मित्र ‘नोबल सायकलिंग शॉप’ नावाचं एक दुकान चालवतात. पूर्वीच्या ‘फ्लॅट-फ्री’ टायर्सच्या संकल्पनेमध्ये काही बदल करून या मित्रांनी नव्या धाटणीचे फॅशनेबल ‘फ्लॅट-फ्री’ टायर्स बनवले आहेत आणि सध्या त्यावर सायकलप्रेमींच्या अक्षरशः उड्या पडत आहेत. त्यांनी या नव्या टायर्सना नावं दिले आहे ‘निक्सो टायर्स’ (Nexo Tires)
‘निक्सो टायर्स’ दोन प्रकारचे आहेत. एक प्रकार आहे एयरलेस टायरचा आणि दुसरा प्रकार आहे ट्यूबलेस टायरचा. हे टायर्स पोलीमर ब्लेंडस पासून बनलेले असून अतिशय मजबूत आणि टिकाऊ आहेत. या टायर्सचं डिजाईन भरीव असून ते तुमच्या सायकलवर असणाऱ्या रीम्सवर आरामात बसवले जाऊ शकतात हे विशेष!! हे टायर्स अजिबात पंक्चर न होता जवळपास ३,१०० मैलांचा (५००० किमी) पल्ला सहज गाठू शकतात. तुमच्या आवडीनुसार वा वापरानुसार तुम्ही एयरलेस किंवा ट्यूबलेस टायर निवडू शकता. हे दोन्ही टायर्स ‘फ्लॅट-फ्री’ आहेत.
या तीन मित्रांनी केवळ ‘फ्लॅट-फ्री’ टायर्सच्या युगात क्रांती घडवली नसून त्याला फॅशनेबल रूपडं देखील दिलं आहे. पाहताक्षणी प्रेमात पडावं, अश्या मोहून टाकणाऱ्या विविध रंगात हे टायर्स उपलब्ध आहेत.
हे टायर्स कधीही पंक्चर होणार नाहीत हे सिद्ध करून दाखवणारे प्रात्यक्षिक देखील या मित्रांनी करून दाखवले आहे.
आणि याचं अजून एक वैशिष्ट्य तर तुम्हाला सांगायचंच राहिलं. अहो हे टायर्स रिसायकलेबल आहेत. म्हणजे पर्यावरणाचं देखील कोणत्याच प्रकारे नुकसान नाही..!
समस्त सायकलप्रेमींचा जागतिक प्रश्न सोडविल्याबद्दल या तीन ‘उचापतखोरांचे’ आभार मानलेचं पाहिजेत !!!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.