सोने खरेदी करताना या गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुमची प्रचंड गंभीर फसवणूक होवु शकते
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सोने खरेदी करणे हा आपल्याकडे बहुतेकांच्या आवडीचा विषय असतो. स्त्रियांच्या तर हा विशेष जिव्हाळ्याचा विषय.
बाजारात आपण सोने खरेदी करतो तेव्हा काही गोष्टी ग्राहक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. ग्राहकांची होणारी फसवणूक आणि आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी त्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
सोने खरेदी करताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यावर हॉलमार्कचे निशाण आहे की नाही हा सर्वात पहिला निकष असावा.
हॉलमार्क म्हणजे सोन्याची शुद्धता आणि त्याच्या कॉलीटीची भारत सरकारने प्रमाणित केलीली मान्यता आहे. हॉलमार्क सोबत लिहिलेल्या नंबर वरून तुम्ही त्या सोन्याची कॉलीटी देखील पारखू शकता.
त्यावर ७५० हा आकडा असेल तर सोने हे १८ कॅरट कॉलीटीचे आहे, ९१६ हा आकडा असेल तर सोनं हे २२ कॅरट कॉलीटीचं आहे.
अनेकदा सोनार १८ कॅरटच्या सोन्याला २२ चा सांगून तुमची फसवणूक करतात.
तुम्ही नेहमी बघितले असेलं की, सण आले की, ह्या मोठमोठ्या सोन्याच्या दुकानांचे ऑफर्स सुरु होतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, ह्या दुकानदारांना कमी भावात सोनं विकणे कसं परवडत असेल आणि ते असे का करत असेतील ?
कारण सोन्याचा भाव हा तर रोज बदलत असतो. मग त्याहून स्वस्त दारात हे सोनार सोनं का विकत असतील. तर ते काही तुमचा फायदा करवून देण्यासाठी ह्या ऑफर्स ठेवत नाहीत तर त्यात तुमचं नुकसान आणि त्या दुकानदाराचा फायदा असतो.
ह्या ऑफर्समध्ये काही अशे दागिने असतात ज्यांच्यात स्टोन, क्रिस्टल, बीड ह्याचे वर्क जास्त असते. आणि सोनं कमी. पण ते विकणार सोन्याच्याच भावात. जसे सोनं असेल २२ कॅरटचं पण ते विकणार २४ च्या भावाने.
दागिन्यांवर बनलेल्या हॉलमार्कवर मुख्य ४ माहिती असतात.
पहिले म्हणजे त्रिभुजची निशाणी, सोनं किती कॅरटचे आहे तो नंबर, दुकानदाराचा लोगो आणि हॉलमार्किंग सेंटरचा लोगो. कुठल्याही सोन्याचा दागिना विकत घेताना ह्या चार गोष्टी नक्की तपासून घ्या.
डायमंडचे दागिने खरेदी करणे हे एक इन्वेस्टमेंट म्हणून चुकीचे आहे. कारण एकत्र हे दागिने विकणारे दुकानदार त्यांना हव्या त्या दारात विकतात आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही कधी हे दागिने रिसेल करायला गेले तर तेही सहजासहजी होत नाहीत.
ह्यापासून वाचण्यासाठी तुम्ही हिऱ्याचे दागिने हे कुठल्याही मोठ्या दुकानातून घेण्याएवजी एखाद्या छोट्या दुकानातून खरेदी करा आणि IGI सर्टिफिकेट देखील नक्की घ्या.
जेमस्टोन किंवा रत्न. आजकाल ह्यांची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अमुक ब्राम्हणाने सांगितलं म्हणून अमुक खडा घालायचा. पण हे रत्न खरेदी करताना ते नेहेमी सराफाच्या दुकानातूनच खरेदी करावे. कारण ह्या रत्नांच्या गुणवत्ता किंवा त्याची खरी किंमत ही आपल्याला माहित नसते.
त्यामुळे हे रत्न घेण्याआधी एक-दोन दुकानांतून त्याची किंमत माहित करून घ्या. म्हणजे तुम्हाला जरा अंदाज येईल.
जर तुम्ही कुठले महाग रत्न खरेदी करत आहात तर त्याच्या कॉलीटीचे सर्टिफिकेट देखील घ्या. त्यासोबतच त्या रत्नाची रिसेल किंवा बायबॅक वॅल्ह्यू देखील माहित करून घ्या.
अगदीच पारदर्शक रत्न हे एकतर नकली असतात किंवा अतिशय महागडे. सामान्य रत्नांत बबल्स किंवा जाळीदारपणा असणे स्वाभाविक आहे, कारण रत्न हे नैसर्गिक असतात.
त्यामुळे ते खरेदी करताना थोडं सावध होऊन त्यांच्या शुद्धतेची तपसणी करूनच खरेदी करा.
या काही गोष्टी सोने खरेदी करताना ध्यान्यात घेतल्या तर संभाव्य फसवणूक टाळली जाईल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.