' पहिला ‘इ-मेल’ ते पहिले ‘फेसबुक लॉग-इन’ : माहिती तंत्रज्ञानाचा रोमांचकारी प्रवास – InMarathi

पहिला ‘इ-मेल’ ते पहिले ‘फेसबुक लॉग-इन’ : माहिती तंत्रज्ञानाचा रोमांचकारी प्रवास

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही नेहमीच सर्वांच्या आठवणीत राहणारी असते. कुठलीही नवीन गोष्ट जी पहिल्यांदा घडत असते त्यावरच त्याचं भविष्य अवलंबून असते. आपल्या जीवनातही त्या पहिल्या गोष्टी खूप महत्वाच्या, जवळच्या आणि नेहेमी लक्षात राहणाऱ्या असतात. जसे पहिली गाडी, पहिला पगार, पहिला पुरस्कार, पहिलं प्रेम ह्या काही अश्या गोष्टी आहेत ज्या नेहेमी आपल्या आठवणीत असतात आणि त्या कायम त्यांची जागा राखून असतात.

नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाउल ठेवणारा पहिला माणूस म्हणून आजही त्याचे नाव सर्वांना माहित आहे. अश्याच काही इतरही गोष्टी आहेत ज्या पहिल्यांदा कधी झाल्या त्या कोणी घडवून आणल्या हे आपल्या लक्षात राहून जाते. अश्याच काही गोष्टी इंटरनेट क्षेत्रातही घडल्या. ज्या घटनांमुळे आज आपण इंटरनेटचा एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर करू शकत आहोत. आज आपले जीवन ह्या इंटरनेट शिवाय अवघड आहे.

पहिला ईमेल :

 

first-email-inmarathi

 

आज आपण रोजच अनेक ईमेल्सची देवाण घेवाण करत असतो. ह्या ईमेल्सच्या सहाय्यानेच आपल्यात औपचारिक गोष्टी घडत असतात. पण तुम्हाला माहित आहे का की, हा पहिला ईमेल कोणी पाठवला असेलं. म्हणजे कुठून तरी ह्याला सुरवात झाली असणार ना. तर हा पहिला ईमेल १९७१ दरम्यान पाठविला गेला होता. ईमेलचे संशोधक रे टॉमलिंसन ह्यांनी हापहिला टेस्ट ईमेल त्यांच्याच जवळच्या दुसऱ्या कंप्यूटरवर पाठविला होता.

पहिला स्पॅम मेल :

 

first spam mail-inmarathi

पहला स्पॅम मेल हा पहिला ईमेल पाठविल्यानंतर काही वर्षांनी पाठविण्यात आला. ह्या स्पॅम मेलला ३ मे १९७८ साली Arpanet द्वारे ३९३ लोकांना पाठविण्यात आला होता.

पहीली वेबसाइट :

 

first website-inmarathi

आज आपल्याला ह्या इंटरनेटमुळे अनेक वेबसाईट्स बघायला मिळतात. पण जगातील पहिली वेबसाईट कुठली असेल? तर जगातील पहिली वेबसाईट ही वर्ल्ड वाईड वेब (WWW) चे शोधकर्ता टिम बर्नर्स ली ह्यांनी १९९१ साली लाइव्ह केले होते. ज्यामध्ये वर्ल्ड वाईड वेबची माहिती देण्यात आली होती.

पहिले ट्वीट :

 

first tweet-inmarathi

आता येत्या काहीच दिवसात ट्वीटर हे १२ वर्षांचे होणार आहे. ट्वीटर वर सर्वात पहिले ट्वीट हे २२ मार्च २००६ ला करण्यात आले होते. आणि ते ट्वीटरचा फाउंडर जॅक डोर्सी ने केलं होते. ह्या ट्वीटला १ लाख वेळा रीट्वीट करण्यात आले होते.

इंटरनेट वरील पहिला फोटो :

 

first photo on internet-inmarathi

 

आधी फोटो हे केवळ अल्बममध्ये दिसायचे. पण आज तर अल्बम हा इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. १९९२ मध्ये टिम बर्नर्स लीने हा फोटो इंटरनेटवर पोस्ट केला होता. आणि त्यानंतर सर्वकाही बदललं. हा फोटो कॉमेडी पॅरोडी ग्रुप Les Horribles Cernettes ह्यांचा होता.

पहिले सर्च इंजन :

 

first search engine-inmarathi

 

आज आपल्याला काहीही शोधायचं म्हटलं तर लगेच गुगल काढतो. पण गुगल यायच्या आधी देखी एक सर्च इंजिन येऊन गेलं. Archie Query Form हे इंटरनेटवरील पहिले सर्च इंजिन आहे. ह्याला १९९० साली Alan Emtage ह्यांनी डिझाईन केले होते.

अॅमेजॉन ची पहिली विक्री :

 

first amazon customer-inmarathi

ऑनलाइन शॉपिंग पोर्टल अॅमेजॉन ने १९९५ सालापासून विक्रीला सुरवात केली. अॅमेजॉन येथून विकत घेण्यात आलेली पहिली वस्तू ही एक पुस्तक होती. Douglas Hofstadter ह्यांचे ‘Fluid Concepts And Creative Analogies : Computer Models Of The Fundamental Mechanism Of Thought’ हे पुस्तक अॅमेजॉनने विकलेली पहिली वस्तू ठरली.

पहिला यूट्यूब व्हिडियो :

 

YouTube म्हणजे व्हिडीओज चा खजिनाच जणू. आज जगभरातील व्हिडीओज आपल्याला ह्या YouTube वर बघायला मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का की ह्याच YouTube वर पहिला व्हिडीओ कोणी आणि कुठला टाकला असेलं. तर हा पहिला व्हिडीओ प्लॅटफॉर्मचे को-फाउंडर जावेद करीम ह्यांनी पोस्ट केला होता. २३ एप्रिल २००५ मध्ये पोस्ट केलेला १८ सेकंदाचा हा व्हिडीओ प्राणीसंग्रहालयात बनविण्यात आला होता.

पहिले फेसबुक लॉग इन :

 

first on facebook-inmarathi

फेसबुकवर पहिले नॉन-फाउंडर लॉग इन हे Arie Hasit होते. तर फेसबुकवर पहिले लॉग इन हे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग ह्यांनी केले होते. Arie Hasit हे मार्क झुकेरबर्ग ह्यांचे हावर्डमध्ये रुममेट होते.

फ्लिपकार्टची पहिली विक्री :

 

first on flipkart-inmarathi

इंडियन ई-कॉमर्स प्लेटफार्म ‘फ्लिपकार्ट’ची सुरवात ही २००७ साली झाली. पण फार कमी वेळात फ्लिपकार्टने अनेक ग्राहक जोडले. फ्लिपकार्टने देखील आपली पहिली विक्री ही एका पुस्तकाचीच केली होती. ऑक्टोबर २००७ साली आंध्रप्रदेशच्या वी.वी.के. चंद्र ह्यांनी फ्लिपकार्टवरून John Wood ह्यांचे ‘Leaving Microsoft to Change the World’ हे पुस्तक विकत घेऊन ते फ्लिपकार्टचे पहिले ग्राहक बनले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?