कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी तिने ‘नवरदेव भाड्याने घेऊन’ केले खोटे लग्न
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
व्हियेतनामची राजधानी हनोई येथे एक विवाह संपन्न झाला. हा विवाह अगदी परफेक्ट असा होता. ह्यात इतर विवाहांप्रमाणे नवरदेव होता, नवरी होती, वऱ्हाडी होते, सतेज होता, सिंगर्स होते, केक होता आणि सोबतच एक फादर देखील होते.ह्या विवाहात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. जसं एखादं लग्न असायला हवं अगदी तसच सर्व होतं इथे.
पण तरी देखील काहीतरी विचित्र होते ह्या लग्नात. आणि ते विचित्र ह्यासाठी होते कारण ह्या लग्नातील नवरदेव, वऱ्हाडी इत्यादी सर्व हे खोटं होतं.
हे लग्न होतं ‘खा’ नावाच्या एका मुलीचे, पण हे एक खोटं लग्न होतं. आणि तिने असं का केलं ह्याचं कारण ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्की बसेल.
तिने लग्नाचे हे खोटे सोंग ह्यासाठी घडवून आणले की, ती गर्भवती असल्याने तिच्या कुटुंबाची प्रतिष्ठा समाजात टिकून राहावी. तिने हे ह्यासाठी केले कारण ती गर्भवती आहे आणि तिच्या सिंगल मदर असण्यावर कोणीही तिला किंवा तिच्या कुटुंबाला वाईट बोलू नये.
व्हियेतनाम हा एक रूढीवादी देश आहे. इथे विना लग्नाचं गर्भवती होणे, आई होणे पाप समजले जाते. लग्नाशिवाय गर्भवती झाल्यामुळे ‘खा’ च्या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असते. म्हणून तिने हे लग्नाचे सोंग रचले. ह्या लग्नात नवरदेवापासून ते सर्वच खोटं होतं.
हे ही वाचा –
===
ह्या खोट्या लग्नाच्या एका महिन्यानंतर ‘खा’ हिने AFP ला दिलेल्या मुलाखतीत सारी कहाणी सांगितली.
“माझे वडील खूप दुखी झाले असते. जेव्हा त्यांना हे कळाले असते की, मी विना लग्नाची आई होणार आहे तेव्हा त्यांना माझी लाज वाटली असती. त्यावेळी मला काहीच कळाले नाही की, मी काय करू, ह्या परिस्थितीला कसं हाताळू.”
‘खा’ हिने संगितले की, ह्या लग्नात १,५०० डॉलर म्हणजेच ९७ हजार ७०९ रुपयांचा खर्च आला पण हा सर्व खर्च त्या बाळाच्या खऱ्या बापाने केला, जो लग्न झालेला आहे.
‘खा’ सांगते की, “मी आता खूप आनंदी आहे. कारण आता मला माझी प्रेग्नेन्सी कोणापासून लपविण्याची काहीही गरज नाही. काही काळानंतर मी माझ्या कुटुंबाला सांगेन की माझा नवरा मला सोडून गेला. आणि माझे आई-वडील देखील हे खोटं स्वीकार करतील. मी लग्नाशिवाय आई होणार आहे त्यांना हे कळण्यापेक्षा तर खोटं जास्त चांगल आहे.
व्हियेतनाम येथे सध्या अश्या लग्नाचं प्रमाण वाढत चाललं आहे. ह्या लग्नात भाड्याने पाहुण्यांना बोलविण्याचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. येथे अनेक जोडपे हे विना लग्नाचे राहतात आणि त्यांनी स्वतःसाठी भाड्याने घरं देखील घेतली आहेत. येथे १५ च्या वर वय असलेले जवळपास ७०% लोक हे विवाहित आहेत. तर येथील लोकसंख्येचे सरासरी वय ३० वर्षे आहे.
हे ही वाचा –
===
येथे ‘खा’ सारख्या अनेक मुली आहेत ज्या समाजाच्या भीतीने अश्या खोट्या लग्नाचा आधार घेत आहेत. एका लग्नात नवरदेव आणि नातेवाईकांची व्यवस्था करण्याचे ४ लाख रुपये घेतले जातात.
येथील तरुण आई-वडील, काका-काकू तसेच मित्रांना भाड्यावर घेण्यासाठी हजारो डॉलर खर्च करत आहेत. जेणेकरून समाजात कुटुंबाचा मान राखला जाईल.
येथे Vinamost नावाची एक कंपनी आहे, जिच्या माध्यमातून हे जोडपे लग्नाकरिता नातेवाईक आणि पाहुणे भाड्याने घेतात. हनोईत अश्या प्रकारच्या अनेक कंपन्या आहेत, ज्या अश्या प्रकारच्या सुविधा देतात. Vinamost ही देखील त्यापैकीच एक आहे. ही कंपनी ४,४०० डॉलर म्हणजेच २, ८६,५६९ रुपयांत असे लग्न करण्याचे फुल पॅकेज देते.
Vinamost चे फाउंडर Nguyen Xuan Thien ह्यांच्या मते, “आम्ही एका वर्षात अशी शेकडो लग्न करविली आहेत. याचा कुठलाही रेकॉर्ड नाही आहे की व्हियेतनाममध्ये असे किती लग्न होत असतील. Nguyen Xuan Thien सांगतात की, आम्ही हा व्यवसाय एका दशकाआधी काही पाहुणे भाड्यावर देत सुरु केला होता. आणि आज आम्ही ४०० असे खोटे पाहुणे भाड्यावर देण्याची व्यवस्था करू शकतो.
हे सर्व किती चुकीचं आहे हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही. म्हणजे समाजात मान प्रतिष्ठा बनून राहावी म्हणून खोटे लग्न करणे त्यात नातेवाईकांपासून ते नवरदेवापर्यंत सर्वच भाड्याने घेणे, आता ह्याला वाईट परिस्थिती म्हणावी का एखाद्या समाजाचा फोलपणा हेच कळत नाही..
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.