' योगर्ट की दही? यातला फरक लक्षात घेतला तर आरोग्यासाठी उपयोग करून घेता येईल – InMarathi

योगर्ट की दही? यातला फरक लक्षात घेतला तर आरोग्यासाठी उपयोग करून घेता येईल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दही आणि योगर्ट … आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठी ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे एकाच पदार्धाची दोन वेगेवगेळी नावं. पण हे दोन्ही पदार्थ जरी सारखे वाटत असले तरी ते एकसारखे नाहीत.

 

 

काही वर्षांपुर्वीपर्यंत योगर्ट हा प्रकार तितकाचा प्रचलित नव्हता. घराघरात रात्री विरजण लावलं जायचं, कारण प्रत्येकाला ताटात थंडगार, मधुर दही वाढणं अनिवार्य होतं,
असे म्हणतात, की भारतीयांचं जेवण दह्याशिवाय पुर्ण होत नाही, किंबहुना जेवणातला सर्वात महत्वाचा, पौष्टिक घटक म्हणून दह्याचा विचार केला जातो.

दही भात, रायतं, कोशिंबीर, दही बुंदी यांसारख्या अनेक प्रकार करून दह्याची चव चाखली जाते.

dahi

 

गेल्या काही काळापासून दह्यासोबतच योगर्ट हा प्रकारही भारतीयांच्या पसंतीचा ठरत आहे. अनेकांना वाटते, की योगर्ट हा दह्यासाठी वापरला जाणारा इंग्रजी पर्यायी शब्द आहे.

===

हे ही वाचा विश्वास बसणार नाही, पण आपलं दही जगभरात इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने चाखलं जातं!

===

योगर्ट म्हणजेच दही, तुम्हालाही असंच वाटत असेल तर हा लेख तुम्ही वाचायलाच हवा. कारण यामुळे तुमचा एक गैरसमज आज नक्कीच दूर होईल.

योगर्ट आणि दही हे दोन्ही डेअरी प्रोडक्ट आहेत, म्हणजेच ते दुधाने बनतात.

त्यांची चवही जवळजवळ सारखीच असते. जास्तीतजास्त लोकांना ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असचं वाटत असतं.

पण असं मुळीच नाही, हे दोन्ही पदार्थ वेगळे आहेत.

दही म्हणजेच Curd आणि योगर्ट म्हणजेच Yogurt हे डेअरी प्रोडक्टचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. हे दोन्ही दुधात वेगवेगळ्या प्रकारे यीस्ट बनवून तयार केले जातात.

 

difference between yoghurt and curd-inmarathi02

 

योगर्ट दुधापासून बनलेले एक असे प्रोडक्ट आहे, जे बनवण्यासाठी दुधात बॅक्टेरियाच्या मदतीने यीस्ट तयार केले जाते. ह्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅक्टेरियाला ‘योगर्ट कल्चर’ म्हणतात.

जेव्हा हा बॅक्टेरिया तापवलेल्या आणि पाश्चराईज केलेल्या दुधात टाकला जातो, तेव्हा काही काळाने दुधातील लॅक्टोज आंबण्यास सुरुवात होते आणि लॅक्टिक अॅसीड तयार होते.

लॅक्टिक अॅसीडमुळे दुध घट्ट होते आणि त्याला योगर्टची विशिष्ट चव येते. हे तयार झालेले योगर्ट त्यानंतर थंड केले जाते आणि त्यात आवडीनुसार स्वाद घातले जातात. त्यालाच आपण फ्लेवर्ड योगर्ट म्हणतो.

हे तयार झालेले योगर्ट व्यवस्थित पकिंग करून विकण्यासाठी पाठवले जाते. बाजारात वेगवेगळ्या फ्लेवरचे योगर्ट सहज उपलब्ध असतात.

 

difference between yoghurt and curd-inmarathi

दुसरीकडे दही बनविण्यासाठी दुधात खाण्यात वापरणारे अॅसीडीक सबस्टन्स जसे की, लिंबाचा रस किंवा व्हिनेगर मिसळण्यात येते.

दही हे आपण अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकतो. ह्यासाठी थोडसं दही गरम दुधात मिसळवून त्याला ३-४ तासांकरिता ठेवून द्या.

लॅक्टिक अॅसिड बनविणाऱ्या ‘योगर्ट कल्चर’ ह्या बॅक्टेरियामुळे योगर्टला आंबटगोड चव येते, तर दह्यात योगर्टपेक्षा जास्त आंबटपणा असतो. पण दह्यात योगर्टच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात.

 

difference between yoghurt and curd-inmarathi04

योगर्ट हा शब्द एक तुर्की शब्द ‘yoğurt’ वरून घेण्यात आला आहे. इंग्रजीत योगर्टला वेगवगळ्या प्रकारे लिहिले जाते. जसे की yogurt, yoghourt, yogourt, yaghourt, yahourth, yoghurd, joghourt आणि jogourt.

योगर्ट हे कॅलशियम, रायबोफ्लेविन-विटॅमिन B2, फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम, आयोडिन, विटॅमिन B-12 आणि प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. ह्याशिवाय त्यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटीक्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.

===

हे ही वाचा केवळ आवड म्हणून खाल्ला जाणारा हा पदार्थ आरोग्यासाठी किती लाभदायी आहे याची तुम्हाला कल्पनाही नसेल

===

म्हणून योगर्ट खाणे शरीरासाठी चांगले असते. असे देखील म्हटले जाते की, ज्या लोकांना डेअरी प्रोडक्ट्स पासून एलर्जी असते ते देखील योगर्ट खाऊ शकतात. कारण ह्यात लॅक्टोज नसल्याने त्यापासून होणारी एलर्जी होत नाही.

 

difference between yoghurt and curd-inmarathi03

तर दह्यात विटॅमिन A, E आणि K असतात. याव्यतिरिक्त दह्यात रायबोफ्लेविन, थायमीन, विटॅमिन B6, फोलेट, विटॅमिन B12, कॅलशियम, आयरन, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक सारखी पोषकद्रव्ये देखील असतात.

दही हे पोटासंबंधी आजारात, त्वचेसाठी, केसांसाठी, तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

योगर्ट बनवण्यासाठी गाय, म्हैस, बकरी, उंट, यॉक, मेंढी आणि घोडी ह्यांच्या दुधाचा वापर केला जातो. तर दही बनविण्यासाठी गाय, म्हैस, बकरी, उंट, मेंढी, रेनडियर आणि लामा ह्यांच्या दुधाचा वापर केला जातो.

दही आणि योगर्ट हे जरी एकसारखे वाटत असले तरी ते बनविण्याच्या पद्धतीपासून ते त्यांच्यातील पोषकतत्त्वांपर्यंत सर्वच भिन्न आहे. म्हणून हे दोन्ही पदार्थही वेगवेगळे आहेत.

 

eating dahi

===

हे ही वाचा आयुर्वेदाच्या पंचामृतातील ‘या’ पदार्थाला नाकारण्याची चूक कधीही करु नका

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?