' एके काळी मंदिरात भिक मागणारा ‘तो’ आज फुटबॉलमध्ये नाव गाजवतोय! – InMarathi

एके काळी मंदिरात भिक मागणारा ‘तो’ आज फुटबॉलमध्ये नाव गाजवतोय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

संधी चालून येणे, संधी मिळणे हे आपण नेहेमी ऐकत असतो. पण संधीचं सोनं करून दाखवणं हे आपल्या हातात असतं. जे खुप कमी लोकांना जमतं. आणि ज्याला जमतं तो जगभर गाजतो. आज आपण अश्याच एका मुलाची कहाणी बघणार आहोत.

 

manikandan-inmarathi01

 

१४ वर्षांचा आर. मनिकंदन, ज्याला लीग क्लब रियल मेड्रीड कडून फुटबॉल टीममध्ये खेळण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे.

२०११ साली मनिकंदन आपल्या बहिणीसोबत अलप्पुझा जिल्ह्यातील ओचीरा परब्रह्म मंदिर परिसरा बाहेर भिक मागत होते.

त्यानंतर एका अनाथालयाचे सुपरवायझर असलेले श्रीकुमार ह्यांनी ह्या भटकत्या मुलांची मदत केली आणि त्याला कोल्लमच्या श्री नारायण ट्रस्ट सेन्ट्रल शाळेत पाठवलं.

तर मनिकंदनच्या बहिणीला गर्ल्स चिल्ड्रेन होम पाठवले.

 

manikandan-inmarathi02

 

ह्यानंतर मनिकंदनचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. शाळेत दाखल झाल्यानंतर मनिकंदन हा आपल्या मित्रांसोबत मैदानात फुटबॉल खेळायला जायचा. असच एकदा तो खेळत असताना त्याला कोच एमपी अभिलाष ह्यांनी बघितले. आणि त्यानंतर मनिकंदनच्या जीवनाने एक वेगळेच वळण घेतले.

एमपी अभिलाष ह्यांनी मनिकंदनला ट्रेनिंग देण्याचं ठरवलं. मनिकंदनच्या खेळत निरंतर ग्रोथ होत गेली. आणि त्याच्या मेहेनतीच फळ म्हणून आज तो अंडर-१५ आय-लीग मध्ये खेळणार आहे. तो या जुलैमध्ये मध्ये महिन्या भराकरिता स्पेनच्या दौऱ्यावर जाणार आहे. हेच नाही तर त्याला फुटबॉलच्या अतिरिक्त ट्रेनिंगसाठी युएस किंवा लॅटिन येथे पाठवले जाईल.

 

manikandan-inmarathi

 

सुपरवायझर श्रीकुमार ह्यांच्या मते मनिकंदनला काहीही बोलायची गरज नाही एक कारण त्याचं कामच बोलतं. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. आणि त्याच्या टेक्निक आणि क्षमता त्याला इतर खेळाडूंपेक्षा वेगळं बनवतात. तो फुटबॉल साठी खूप पॅशनेट आहे आणि तो एक ना एक दिवस ह्या देशाचे नाव नक्की मोठ्ठ करेल.

 

messey-inmarathi

 

मनिकंदन हा मेस्सी चा खूप मोठा फॅन आहे…

जगात असे खूप कमी लोकं असतात ज्यांना अशी संधी मिळते. आणि ते त्या संधीच सोनं करून दाखवतात. त्यापैकीच एक हा मनिकंदन…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?