' एक भारतीय लिपी करतीये जगभरातील अँपल उपकरणं क्रॅश! – InMarathi

एक भारतीय लिपी करतीये जगभरातील अँपल उपकरणं क्रॅश!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

तंत्रज्ञानामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती घडून आलेली आहे. कधीकाळी खूप कठीण वाटणाऱ्या गोष्टीदेखील आज याच तंत्रज्ञानामुळे खूपच सोप्या झालेल्या आहेत. याच प्रगत तंत्रज्ञानाचा एक भाग म्हणजे मोबाईल फोन. मोबाइलला फोन जेव्हा पहिल्यांदा बाजारात आला, तेव्हा तो खूप साधा होता आणि त्यातून फक्त एखाद्याला फोनच लावता येत असे. पण हळूहळू मोबाईल तयार करण्यामध्ये वेगवेगळे बदल घडवण्यात आले आणि आज आपण सर्वात भारी स्मार्टफोन वापरतोय.

 

steve-jobs-marathipizza01
iphonehacks.com

सध्या मार्केटमध्ये खूप प्रकारचे आणि  वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आहेत. पण बहुतेकांच्या मनामध्ये बसलेला असतो, तो म्हणजे ऍप्पलचा आयफोन.

स्टीव्ह जॉब्सच्या ऍप्पल या कंपनीने तयार केलेल्या आयफोनमध्ये स्वतःची अशी ऑपरेटिंग सिस्टम आहे. जशी गुगलची अँड्रॉइड, मायक्रोसॉफ्टची विंडोज आहे, तशीच ऍप्पलची स्वतःची आयओएस ऑपरेटिंग सिस्टम आहे. जी ऍप्पलच्या आयफोनमध्येच पाहायला मिळते. इतर कोणत्याही मोबईल कंपनीला ही ऑपरेटिंग सिस्टम वापरता येत नाही.

मोबाईल फोन असो किंवा इतर कोणती टेक्निकल वस्तू, कधीही लोकांची पहिली पसंती ही ऍप्पलच असे. खूप कमी वेळामध्ये ऍप्पलने मार्केटवर स्वतःचे वर्चस्व कायम केले आणि लोकांमध्ये हा ब्रँड लोकप्रिय झाला.

पण अलीकडे असे सिद्ध झाले आहे की, काही भारतीय भाषेतील शब्द ऍप्पल मोबाईलच्या आयओएस प्रणालीला क्रॅश करण्यासाठी व्हायरस म्हणून जबाबदार ठरलेले आहेत. जर हा टेक्स्ट तुम्हाला मिळाला असेल किंवा तुम्ही तो टेक्स्ट फिल्डमध्ये पेस्ट केला असेल, तर ते तुमचे अप्लिकेशन फ्रिझ करेल किंवा तुमची पूर्ण आयओएसची  ऑपरेटिंग सिस्टमच क्रॅश करून टाकेल.

 

Iphone Crash.Inmarathi
cnet.com

या ऍप्पलची ऑपरेटिंग सिस्टम क्रॅश होण्यासाठी तेलगू भाषेमधील दोन शब्द जबाबदार आहेत. या दोन शब्दांमुळे आयओएसची संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टम क्रॅश  होते. जेव्हा या दोन शब्दांना भाषांतरित करण्यात आले, तेव्हा समजले की, हे स्वाक्षरी असे शब्द आहे. जे थोडेसे अशाप्रकारे दिसते :

 

Iphone Crash.Inmarathi1
nghenhinvietnam.vn

मोबाईल वर्ल्डच्या रिपोर्टनुसार, जेव्हा हे टेक्स्ट तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही त्याला पेस्ट कराल, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला ओपन कराल, त्यानंतर तुम्ही जो ऍप वापरत असाल तो क्रॅश होईल.

जर तुम्हाला कुणी हा सिम्बॉल पाठवला आणि आयओएसने तो तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, तर तुमची संपूर्ण आयओएस सिस्टम सॉफ्टवेयर आणि होम ब्लॉक होऊन जाईल.

दुर्दैवाने, फक्त ऍप्पलचे आयफोन याने प्रभावित होत नाहीत, तर त्याचबरोबर तुमचे ऍप्पलचे घड्याळ आणि मॅक देखील यापासून सुरक्षित नाही. शिवाय, या गॅझेट वापरकर्त्यांना गॅझेटला रिबूट करण्याची चेतावणी दिली जाते आणि रिबूट करण्यास सांगितले जाते. पण जर तुम्ही त्यावेळी यासाठी बूटलूप मधे गेलात, तर तुम्हाला मोठ्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळे तुम्ही वापरत असलेला मोबाईल किंवा इतर गॅझेट पूर्णपणे बंद होण्याची संभावना वाढते.

 

Iphone-Crash.Inmarathi2
cnet.com

हा व्हायरस एकदम नवीन आहे आणि आताच काही दिवसांपूर्वी हा सापडलेला आहे. ऍप्पलने या व्हायरसबद्दल अद्याप कोणतेही विधान केलेलं नाही आहे. लवकरच ऍप्पल कंपनी यावर कोणतातरी उपाय नक्की शोधून काढेल, अशी आशा ऍप्पल वापरकर्त्यांना आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?