आज देशाला बुलेटवरून झेंडे मिरावणारे नव्हे तर असे ४ जिद्दी मेहनती तरुण हवेत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपण सगळे नेहेमी चर्चा करत असतो की आज आपल्या देशाला परिवर्तनाची गरज आहे. पण ही निव्वळ चर्चा असते. कारण आपण त्यावर फक्त बोलत असतो.
आपल्याला हे कळतच नाही परिवर्तन हे बोलून येत नसत तर त्यासाठी आपल्यालाही काही करावं लागतं.
पण आपण केवळ चर्चेपुरतेच असतो, त्यासाठी पुढाकार घेणारे खूप कमी असतात. आज आपल्या देशाला त्याच पुढाकार घेणाऱ्या तरुण पिढीची गरज आहे.
आणि जर तुम्हाला वाटत असेल की त्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात, तर असं नाहीये. तुम्ही लहान लहान गोष्टीतून देखील परिवर्तन घडवून आणू शकता.
त्यासाठी केवळ पुढाकार घेण्याची गरज आहे, जो ह्या चार तरुणांनी घेतला.
१. सूर्य प्रकाश राय
प्रयोग (प्रोफेशनल्स अलांयस फॉर यूथ ग्रोथ) नावाच्या संस्थेमार्फत सूर्य प्रकाश राय गावातील मुलांना शिकविण्याचे काम करत आहेत.
बिहार येथील गोपालगंज जिल्ह्यातील एक छोट्याश्या गावातून सुरु झालेला हा प्रयोग आज १२ गावांच्या जवळपास ४०० मुलांना शिक्षित करण्याचं काम करत आहे.
सूर्य प्रकाश ह्यांनी केवळ मुलांना शिकविण्याचच काम नाही केलं, तर त्यांनी गावात लायब्ररी देखील बनवली. ज्याचा फायदा मुलांना झाला. सूर्य प्रकाश यांच्या गावातील सर्वात मोठी समस्या शिक्षण आणि वीजपुरवठा ही आहे.
एवढेच नाही तर मुलांच्या आई-वडिलांमध्ये देखील शिक्षणा संबंधी काहीही जागरूकता नव्हती.
त्यामुळे त्यांनी सर्वात आधी लोकांची विचारसारणी बदलण्याचा प्रयतन केला आणि त्याचेच फळ म्हणून आज शेकडो मुलं त्यांच्या ह्या पुढाकाराने शिक्षणाच्या वाटेवर चालत आहेत.
२. ऋचा सिंह
ऋचा सिंह हिने आयआयटी गुवाहाटी येथून शिक्षण घेतले आहे. तिने www.yourdost.com नावाने एक वेबसाईट बनवली आहे.
हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक त्यांच्या इमोशनल प्रॉब्लम्स शेअर करू शकतात. तसेच ह्या ठिकाणी त्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण देखील मिळेल.
सध्याच झालेल्या रिसर्च नुसार भारतात डिप्रेशनने ग्रसित लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. WHO च्या रिसर्च नुसार भारतात एकूण ३६% लोक डिप्रेशनने, पॅनिक अटॅक ह्या व्याधींनी ग्रासलेले आहेत.
ऋचा हिने बनविलेल्या वेबसाईटवर असे लोक आपल्या समस्यांबाबत चर्चा करू शकतात. तेही आपली ओळख उघड न करता. ह्या वेबसाईटवर एका महिन्याच्या आत ३०००० लोकांनी साईन इन केले आहे.
३. विकास पालकोट
विकासने जस्ट फॉर किड्स (JFK) नावाने एक संस्था बनविली आहे. ज्याचा उद्देश हा आहे की, सर्वांनी खेळावं. शिक्षणासंबंधी विकास पालकोट ह्यांचा विचार जरा वेगळा आहे. त्यांच्यामते पुस्तकी शिक्षणासोबतच खेळ देखील महत्वाचा आहे.
या संस्थेचे उद्धेष्य देशातील मागासलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना फुटबॉलच्या माध्यमातून जीवन कौशल्य शिकविणे हा आहे.
विकास शाळांतील शिक्षकांना आणि पालकांना देखील यासंबंधी प्रेरित करण्याचे काम करतात. जेणेकरून त्यांनी देखील खेळाला मुलांच्या शिक्षणाचा एक महत्वाचा भाग मानावा.
JFK पुणे, मुंबई आणि हैद्राबाद येथे जवळपास १२०० मुलांच्या खेळ संबधी गरजांना करत आहे. ही संस्था फुटबॉल टीम बनवते. त्यांना कोचिंग देते आणि त्यानंतर २ महिन्यांच्या फुटबॉल लीग चे आयोजन करते.
४. सुरेश अडिगा :
महाराष्ट्रात अनेक शेतकरी आत्महत्या करतात. खासकरून विदर्भात. अमेरिकेतून इंजिनीअरिंग केलेल्या सुरेशचे ह्या समस्येकडे लक्ष गेले.
त्यानंतर त्याने ह्या समस्येच्या समाधानासाठी पैसे जमा करण्यास सुरवात केली. त्याला देश आणि विदेशातून ह्याकरिता दान देणारे अनेक लोक मिळाले.
ह्या पैश्यांनी ते पिडीत कुटुंबांची मदत करतात. ते विदर्भातील पिडीत कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी देखील काम करतात. ज्याची आज खरच आपल्या शेतकऱ्यांना गरज आहे.
हे आणि ह्यासारखे अनेक असे तरुण आहेत जे आपल्या देशातील समस्यांवर गोंधळ घालत नाहीत, मोर्चे/आंदोलन करून रस्त्यावर उतरत नाहीत तर शांतपणे आपले कार्य करत असतात.
ज्यातूनच खरा आपला देश घडतो आहे. आज आपल्याला बुलेटवरून हातात झेंडे घेऊन फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची नाही तर अश्या तरुण वर्गाची गरज आहे. ज्यातून आपण आपल्या देशाच्या विकासाची स्वप्ने बघू शकतो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.