' भारताची “सौर उर्जा” तळपत आहे! २०२२ चे लक्ष्य २०१८ तच साध्य! – InMarathi

भारताची “सौर उर्जा” तळपत आहे! २०२२ चे लक्ष्य २०१८ तच साध्य!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक: विनीत वर्तक

===

कोळशाचे संपत चाललेले साठे, त्याने होणारे प्रदूषण आणि एकूणच जागतिक तापमानातील फरक आता प्रकर्षाने जाणवायला लागले आहे. टोकाची थंडी, टोकाचा उन्हाळा आणि प्रचंड पाउस ही सगळीच पृथ्वीच्या बदलत्या वातावरणाची लक्षणे आहेत. गेले काही वर्ष अनेक ठिकाणी अनेक रेकोर्ड ह्या तापमानातील बदलांनी धुळीला मिळवले आहेत.

म्हणूनच गरज आहे ती अपारंपरिक उर्जा स्त्रोतांकडे वळण्याची. भारत लोकसंखेच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश असून उर्जेची गरज आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर येत्या काळात भासणार आहे.

गतिमान असलेली अर्थव्यवस्था आणि उंचावणार राहणीमान ह्या सगळ्याला उर्जेची गरज ही आहेच. म्हणूनच निसर्गाच नुकसान कमीत कमी करत ह्या उर्जेची गरज भागवण्यासाठी भारताने येत्या काळात काही पावल झपाट्याने टाकली. त्याची फळ आता यायला लागली आहेत.

 

solar-power-inmarathi01
dnaindia.com

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार भारताने २० गिगावॅट सौर उर्जा निर्मितीचा टप्पा गाठला आहे. नॅशनल सोलार मिशन ने आधी २० गिगावॅटचे उद्दिष्ठ हे २०२२ पर्यंत गाठण्याचे निश्चित केले होते. पण २०१८ च्या सुरवातीला भारताने हे लक्ष्य गाठताना ठरवलेल्या वेळेच्या आधी ४ वर्ष हे लक्ष्य पूर्ण केल आहे.

आता २०२२ पर्यंत १०० गिगावॅट उर्जा निर्मिती सौर प्रकल्पातून करण्याच मोठ उद्दिष्ठ भारताने आपल्या समोर ठेवले आहे. २०२२ पर्यंत जगात ७४० गिगावॅट उर्जेची निर्मिती हि सौर उर्जेतून होईल असा अंदाज आहे.

त्यातील १०० गिगावॅट एकटा भारत निर्माण करेल असा अंदाज आहे. २०३० पर्यंत भारताच्या गरजेपेकी ४०% उर्जा निर्मिती सौर उर्जेच्या प्रकल्पातून होईल असा अंदाज आहे. २०१७ मध्ये एका वर्षात भारताने जवळपास ९.७ गिगावॅट इतक्या सौर उर्जा प्रकल्पांची बांधणी केली आहे. ज्यात कमर्शियल आणि हाउसहोल्ड प्रकल्पांचा समावेश आहे.

 

solar-power-inmarathi02
eqmagpro.com

सौर उर्जेकडे आपण वेगाने जाण हि काळाची गरज आहे. भारतात बहुतांश भागात सूर्य हा वर्षभर तळपत असतो. पूर्वेकडील आणि उत्तरेकडील काही भाग सोडला तर जवळपास पूर्ण भारतभर सौर उर्जेला पूरक अस वातावरण आहे. सौर उर्जेत बसवलेल्या प्यानेल मधून दोन प्रकारे उर्जा निर्मिती होत असते. पहिल्या प्रकारात ज्याला फोटोवोल्टीक इफेक्ट अस म्हंटल जाते.

ह्यात सूर्याकडून प्रकाश किरणांच्या रुपात आलेल्या उर्जेला शोषून घेऊन त्यातून इलेक्ट्रोन ला एक्साईट केल जाते. ह्या एक्साईट झालेल्या इलेक्ट्रोन कडून इलेक्ट्रिकल उर्जेच्या स्वरूपात उर्जेची निर्मिती होते.

घराच्या छपरावर किंवा इतर ठिकाणी बसवलेल्या सोलार प्यानेल मधून अश्या प्रकारे उर्जा निर्मिती होते. पण ह्या प्रकारात काही अडचणी आहेत. ह्यातील उर्जेची निर्मिती हि सूर्याच्या पडणाऱ्या प्रकाशावर अवलंबून असते. प्रकाश जितका प्रखरतेने प्यानेल वर पडेल त्यानुसार उर्जेची निर्मिती जास्त. आकाशातील सूर्याची स्थिती सारखी नसल्याने ह्या प्यानेल ना सतत सूर्याच्या दिशेने फिरवावे लागते.

त्यामुळे हे फिरवण्यासाठी बसवलेली यंत्रणा १०-१५% उर्जा फस्त करते. तसेच आकाशात असलेले ढगाळ वातावरण आणि इतर गोष्टी उर्जेच्या निर्मितीवर बंधन आणतात.

 

solar-power-inmarathi03
energy.gov

दुसऱ्या प्रकाराला सी.एस.पी. असे म्हणतात. सी.एस.पी. म्हणजे (Concentrated solar power).

ह्यात सूर्याकडून येणारे किरण आरसे किंवा लेन्स च्या माध्यमातून एका ठिकाणी आणले जातात. भिंगामध्ये जसे आपण सूर्याच्या किरणांना एकवटून कापूस पेटवतो त्याच प्रमाणे मोठ्या पातळीवर त्यांना एकत्र आणून निर्माण झालेल्या हिट मधून स्टीम इंजिन चालवले जाते.

जे इलेक्ट्रिकल उर्जेची निर्मिती करते. सूर्यास्त झाल्यावरही काही काळ हिट ही प्यानेल च्या मध्ये साठवली असल्याने उर्जा निर्मिती शक्य होते. जगातील काही सोलार पार्क मध्ये अश्या तऱ्हेने उर्जेची निर्मिती केली जाते.

 

solar-power-inmarathi04
ornatesolar.com

धिरुभाई अंबानी सोलार पार्क हे भारताच्या धुरसर गावात जैसलमेर जिल्ह्यात वसले असून ३५० एकर मध्ये पसरलेल्या ह्या पार्क मध्ये ५००,००० सी.डी.टी.ई. मोड्युल असून त्यातून ४० मेगावॉट उर्जेची निर्मिती होते.

फक्त १२९ दिवसात हे पूर्ण पार्क वसवण्यात आल असून रोज भारताच्या सौर उर्जा निर्मितीत हातभार लावत आहे.

ही एक सुरवात आहे. ह्याच पातळीवर भारतात अनेक सोलार पार्क निर्माण होत असून त्यांची क्षमता ह्यापेक्षा खूप मोठी असणार आहे.

१) भाडला सोलर पार्क:  २२५५ मेगावॉट, १०,००० एकर वर वसणार आहे.

२) कामुठी सोलर पार्क: ६४८ मेगावॉट

३) चारंका सोलार पार्क: आशियातील सर्वात मोठ्या पार्क पेकी एक असून ह्यातून ११०० मेगावॉट उर्जेची निर्मिती होत आहे. ५३८४ एकर वर हे पार्क वसलेलं आहे.

४) साकरी सोलर पार्क धुळे महाराष्ट्र: ह्यातून १५० मेगावॉट उर्जेची निर्मिती अपेक्षित आहे.

ह्याशिवाय इतर अनेक प्रकल्प हे मार्गी लागले असून येत्या काळात भारताच्या सौर उर्जा निर्मितीत झपाट्याने वाढ अपेक्षित आहे.

क्लीन रीनेवेबल उर्जा ही काळाची गरज आहे.

इंधनांच्या, कोळशाच्या ज्वलनाने होणार घातक प्रदूषण पृथ्वीच्या एकूण वातावरणाला आतून पोखरत आहे. त्याला पूर्ण थांबवण अशक्य असल तरी ते कमी केल तरी आपण आपल्या पुढल्या पिढीची अनेक वर्ष वाढवू शकणार आहोत.

भारताने निश्चित केलेल सौर उर्जेच लक्ष्य आणि आत्ता मिळवलेल लक्ष्य भारताच्या वसुधैव कुटुंबकम भावनेला पुन्हा एकदा अधोरेखित करते आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?