“टर्मिनेटर” मधील स्कायनेट खरंच अवतरतोय की काय?!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
मानवजाती आज उत्क्रांतीच्या एका महत्वाच्या टप्यावर आहे. माकडापासून मानव होण्याचा प्रवास हा खूप साऱ्या घडामोडींचा, चढउतारांचा राहिला आहे. या प्रवासात मानवाने बुद्धी वापरुन स्वतः डार्विन च्या ‘ Survival ऑफ फिटेस्ट ‘ नियमाप्रमाणे त्याचा पुढच्या प्रवास अग्रेसर केलाय. त्यामुळे आज मानव हा भूतलवर निर्विवाद राज्य करतो आहे.
नुसतं राज्य नाही तर, नवीन तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर त्यानं नैसर्गिक शक्तींवर काही प्रमाणात राज्य करायला सुरवात केली आहे.
पर्यावरणाच्या बाबतीत म्हणाल तर त्यांनी नवीन मानव निर्मित बेटं बनवलीत. कृत्रिम पाउस पडायचे तंत्र विकसित केले. आपली पृथ्वी सोडून चंद्रावर जाऊन आला आणि आता मंगळाच्या स्वारीसाठी प्रयत्न सुरु आहेत.
अश्या वेळी डार्विनच्या नियमाप्रमाणे आता मानव जातीला कोणीही शह देऊ शकत नाही असं वाटत आहे.
आता मानवाची खरी लढत ही त्याच्या सवतःच्या बुद्धीच्या बळावर उभ्या असलेल्या तंत्रज्ञानाशीच असू शकते.
AI, Machine Learning तंत्रामध्ये मध्ये खूप जास्त प्रगती झाली आहे.
तब्बल ३३ वर्षा आधी आलेला टर्मिनेटर हा चित्रपट हळू हळू खरा होताना दिसत आहे. तसं पाहिलं तर त्या चित्रपटाप्रमाणे जून १२ वर्ष शिलक आहेत जेवहां ‘स्कायनेट’ नावाच्या AI ने मानवाचा विनाश करायचं ठरवलं आहे.
आज AI मध्ये होणारे नवीन नवीन Innovation पहिले की पोटात गोळा आल्या शिवाय राहणार नाही. तर खरंच AI ची प्रगती स्काइनेट सारखी होत आहे का? पाहू या.
AI आहे तरी काय ??
AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे असा कॉम्पुटर प्रोग्रॅम जो माणसाप्रमाणे विचार करून निर्णय घेण्यात तरबेज असतो, खरं पाहिलं तर हे त्याला शिकवलं जातं आणि नंतर त्या शिकवणीचा उपयोग वेळ आल्यावर AI करतं.
आकाशात झेप घेऊन उड्डाण करणार ड्रोन असो किंवा रॉकेट, चालक नसणारी स्वयंचलित कार पासून तर फेसबुकवर फोटो टाकताना टॅग करण्यासाठी सुचवलेली नावं, Gmail चा वापर करताना आलेले suggested रिप्लाय ही AI ची किमया आहे. अजून तरी AI आपल्या बाल्यावस्थेत होती ती आता कुठे त्याच किशोरअवस्थेत जाताना दिसत आहे.
AI ला स्वतःचे विचार आणि निर्णय करण्याची शक्ती आहे ??
एक शब्दात याचं उत्तर देता येणार नाही कारण जगात एक AI नाही आणि त्यांचे काम सुद्धा एक नाही. आधी सांगितल्या प्रमाणे AI निर्माण करणारी टीम वेगळे वेगळे उद्देश घेऊन काम करत आहे. ज्या कामासाठी एखादी AI तयारी केली असेल त्या कामात ती अत्यंत तरबेज असते. काम करण्याची क्षमता एका मानवापेक्षा कित्येक पटीने सरस असते.
हे किती जरी खरं असेल तरी आता पर्यंत अशी कोणतीही AI नाही जी स्वतःहून सर्व मानवाप्रमाणे काम करेल.
AI ची काय गरज ??
डिजिटल जगाचा व्याप दिवसेंदिवस वाढत जात आहे. ऑगमेंटेड रिऍलिटी, रोबोटिक्स मध्ये झालेल्या प्रगतीला शिखरावर नेण्यासाठी AI ची नितांत गरज आहे. आज जर फॅक्टरी मध्ये असेम्बली लाईन पहिली तर रोबोट शिवाय काम शक्य नाही. रोबोट्स साठी फॅक्टरी मधली कामे कितीही गुंतागुंतीची असली तरी रिपीटेटिव्ह आहेत, तिथेही AI चा उपयोग होऊ शकतो पण तशी गरज भासत नाही. रोबोट्सने काम उत्तम करायचे असेल तर त्याला स्मार्ट AI ची जोड अत्यंत आवश्यक आहे.
जर या रोबोट्स ना सर्जरी साठी वापरले गेले तर उत्तम काम करून घेण्यासाठी AI ची गरज असते.
आज स्पेशालिस्ट डॉक्टर्सची खूप उणिव आहे आणि त्यांची गरज असलेले रोग आणि अपाय पण खूप सारे आहेत. प्रत्येक जागी प्रत्येक देशात असे उपचार शक्य पण नाही. उपचार उपलब्ध असून फक्त डॉक्टर नाही म्हणून उपचार होत नाहीत. हेच काम फॅक्टरीच्या काम सारखे रोबोट्स कडून करून घेतले तर? यासाठी रोबोट्सला स्मार्ट असण्याची खूप गरज आहे.
जर रोबोट्सला साधे ऑपरेशन्स करायचे झाले तरी AI शिवाय शक्य नाही. कारण प्रत्येक रुग्णाची केस वेगळी असते.
त्यासाठी unique निर्णयक्षमता आवश्यक असते. ही निर्णयक्षमता फक्त शिकून येत नाही. सध्यातरी रोबोट्स सर्जरी करतील असे दिसत नाही. मागील वर्षी रोबोट्सना मानवापेक्षा चांगले टाके घालण्यात यश आलं (Source). पण सध्या तरी ते सर्व operation करणार हे शक्य नाही. AI चा उपयोग डेटा analysis साठी मात्र शक्य आहे. रुग्णाची केस स्टडी करण्यासाठी पण डॉक्टर्सचा खूप वेळ जातो, निर्णय पण अचूक असतील याची खात्री नाही. AI चे तसे नाही.
सध्या AI डॉक्टर पेक्षा खूप उत्तम काम करून योग्य निर्णय सुचवू शकते तेही काही मिनटात. MRI, CT scan असो किंवा कॅन्सर, AI डॉक्टर पेक्षा उत्तम काम करताहेत. डॉक्टर्स आणि AI मध्ये कोण उत्तम आहे हे दर्शवणारा तक्ता इथे पाहता येईल (Source).
वरील उदाहरणे AI ची गरज आणि क्षमता सांगण्या साठी होती, मेडिसिन सोडून सुद्धा AI ने खूप क्षेत्रात उत्तम कार्य नोंदवले आहे.
AI मध्ये जास्त प्रकार नसतात. त्यांची उपयोगिता (अँप्लिकेशन) महत्वाची आहे.
जगात असणाऱ्या काही महत्वपूर्ण AI आणि त्याची अँप्लिकेशन्स ?
सध्या जगात असलेली ही खूप प्रगत AI पैकी एक, ‘गो ‘ नावाच्या गमे मध्ये विख्यात ‘ली सीडॉल’ ला अविश्वसनीय पद्धतीने हरवणारी. या AI ने बुद्धीबळ स्पर्धेत ४ तासात प्राविण्य मिळवलं. AI ची निर्णय क्षमता दाखवणारी ही चित्रफीत नक्की पाहण्या लायक आहे. (Source)
वॉटसन या AI ने Jeopardy मध्ये भूतपूर्व विजेत्यांना हरवले आहे. यामध्ये प्रश्नोत्तरे विचारले जातात. साध्या बोली भाषेत (नॉर्मल इंग्लिश ). ही AI सध्या बोली भाषेत तरबेज आहे. तुम्ही कितीही घुमवून प्रश्न विचारला तरी AI तुम्हाला काय बोलायचे आहे हे समजून उमजून उत्तर देते. Cognitive Analysis ही या AI चा अजून महत्वाची ताकद आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.