' कुणाच्या शिकवणींमुळे भारतासकट सर्वत्र रक्तपात आणि जिहाद फोफावतोय? – InMarathi

कुणाच्या शिकवणींमुळे भारतासकट सर्वत्र रक्तपात आणि जिहाद फोफावतोय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

विविध “सर्वधर्मसमभाव” वाद्यांची, अर्थातच चांगल्या हेतूमुळे आणि अज्ञानामुळे, नेहेमी एक गल्लत होते.

“सर्व धर्म सारखेच चांगले-वाईट असतात”, “सर्व धर्म प्रेम, अमन-शांती चाच संदेश देतात”, “सर्व धर्म हे एकाच ईश्वराकडे जाण्याचे विविध रस्ते आहेत”

असा हा अज्ञानातून निर्माण झालेला दृढ विश्वास – इस्लाम समजण्यापासून आपल्याला थांबवतो. म्हणूनच आपण “जिहाद” समजू शकत नाही आणि त्यावरील उपायांकडे वळू शकत नाही.

इस्लाम शिकण्यासाठी इस्लामचा आणि पर्यायाने मोहम्मद पैगंबरांचा इतिहास समजून घेणं अत्यावश्यक आहे.

 

islam-marathipizza01
fthmb.tqn.com

 

मक्केत राहत असतांना मुहम्मद पैगंबर यांना प्रेषितत्व प्राप्त झाले. पहिली काही वर्षे प्रेषितांना आणि त्यांच्या अनुयायांना मक्कावासीय कुरेश जमातीकडून काही त्रास झाला नाही.

पण पुढे जसा उघड प्रचार सुरू झाला तसा त्यांच्याकडून अनुयायांचा छळ केला जाऊ लागला. मुर्तीपुजेला विरोध आणि अनेकेश्वरवाद अमान्य करणे याशिवाय इस्लामचा प्रचार करणे शक्यच नव्हते.

मक्केतल्या मूर्तिपूजक कुरेशांनी या प्रचाराला विरोध केला. आणि हळूहळू मक्केत श्रद्धावंत आणि श्रद्धाहीन लोकांत शत्रुत्वाची भावना वाढीस लागली.

सद नावाचा प्रेशितांचा एक अनुयायी होता. तो नमाज अदा करून घरी परतत असताना त्याचा तिथल्या श्रद्धाहिनांबरोबर वाद झाला.

तो वाढला आणि अनुयायाने उंटाच्या अणकुचीदार हाडाने भोसकून त्याचे रक्त सांडले. हा “इस्लाममधील पहिला रक्तपात” म्हणू प्रसिद्ध आहे.

हा रक्तपात झाल्यानंतर प्रेषितांनी अनुयायांना शांत राहण्याचा आदेश दिला. हे आदेश कुराणात सुरह अत-तारिक मध्ये १५ ते १७ व्या आयतीत आले आहेत. त्याचा साधारण अर्थ असा की

“आत्ता काफिरांशी लढू नका. ते योजना बनवत आहेत. पण अल्लाह्कडेही त्यांच्यासाठी योजना आहे. त्यांना ढील द्या जेणेकरून ते आपल्या पापाची मापे भरतील.

त्यांना असणारी ही सुट लवकरच समाप्त होईल आणि अल्लाह त्यांना शिक्षा करील. काफिरांवर सक्ती किंवा शारीरिक इजा करू नका. ते काम अल्लाहचे आहे. त्याच्यावर सोपवा.”

 

Mecca-inmarathi
reviewofreligions.org

 

आता हे सर्व सांगण्याचा उद्देश- मक्केत अनुयायांची संख्या इतकी कमी होती की काफिरांविरूढ थेट युद्ध पुकारणे शक्य नव्हते.

त्यामुळे काफिरांना इजा न करण्याचा आदेश प्रेषितांनी दिला आहे. हाच आदेश आपल्याला ‘इस्लाम शांतताप्रिय असल्याचे’ दाखले देताना सांगण्यात आला.

पण त्या आदेशाला ही पार्श्वभूमी (context) आहे. हा आदेश पुढे प्रेषितांच्या मृत्युपर्यंत कायम राहिला का?

आता मदिना काळातील प्रसंग पाहू. जिथे इस्लामचे राज्य होते आणि काफिर संख्येने कमी होते.

६२२ साली पैगंबरांनी मदिनेत स्थलांतर केले आणि थोड्याच काळात तिथल्या ज्यूंच्या मोजक्या टोळ्यांशी कधी वाटाघाटी तर कधी शत्रुत्व घेऊन त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित केले.

यानंतर मक्कावासीय लोकांविषयी प्रेषितांची भूमिका कठोर होत गेली. अद्याप मक्केतील कुरेशांनी मुस्लीमाविरुध्द पाऊलही उचलले नव्हते.

प्रेषितांचे काही अनुयायी अजूनही मक्केत सुरक्षित राहत होते.

पण इकडे मदिनेत मक्कावासीय जनतेविरुद्ध अंतिम युद्ध पुकारण्याची इच्छा प्रेषितांनी कित्येकदा बोलून दाखवली होती.

अल्लाहने मुस्लिमांना मक्कावासीय काफिरांच्या विरोधात लढण्याचा आदेश दिला आहे असे प्रेषितांनी सांगितले.

हे आदेश कुराणात सुरह अल-हज मध्ये ३९, ४० व्या आयतीत आले आहेत. त्याचा साधारण अर्थ असा,

“ज्यांच्यावर अन्याय झाला होता त्यांना शस्त्र उचलण्याची परवानगी देण्यात येत आहे. आणि अल्लाह त्यांना विजय मिळवून देण्यासाठी खंबीर आहे.”

 

4.bp.blogspot.com

 

हीच आयत कुरणातली “जिहादची पहिली आयत” मानली जाते.

म्हणजे हा आदेश आला तेव्हा मक्केतील लोकांनी मदिनावासी अनुयायाविरुध्द युद्ध पुकारले नव्हते, हा आदेश स्व संरक्षणासाठी शस्त्र उचला असा नव्हता. कारण इथे शत्रू समोर नव्हताच.

मक्का काळात झालेला विरोध आणि मूर्तीपूजा यांचा समाचार घेण्यासाठी युद्ध पुकारण्याचा हा आदेश आहे हे समजून घेतले पाहिजे. ‘अल्लाह विजयी करील’- मुस्लिमांच्या श्रद्धेला म्हणजे इस्लामला.

आता आपण निष्कर्षाप्रत पोचायला हरकत नाही. इस्लामचा राजकीय प्रवास “इस्लाममधील पहिला रक्तपात” ते “जिहादची पहिली आयत” असा आहे.

आणि जगात आता अस्तित्वात असणाऱ्या प्रखर इस्लामी राष्ट्रवादाचा पाया इस्लामच्या या राजकीय प्रवासात आहे.

भारतात जो इस्लामी राष्टवाद ४७ च्या आधी आणि नंतर दिसून आला त्याची मुळे याच प्रवासात आहेत.

एकराष्ट्रवाद आणि हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी तेव्हाचे मुस्लिम नेते इस्लामचा आधार देताना मदिना कराराचा दाखला देतात हे उदाहरण पुरेसे बोलके आहे.

मदिना करार नक्की काय होता आणि त्याची समकालीन पार्श्वभूमी काय होती हे जाणून घेऊ.

मक्का येथुन प्रेषितांनी मदिना येथे हिजरत केली त्याच्या आधी मादिनेतल्या दोन व्यापारी टोळ्यामध्ये आपापसात युद्ध होत असे. या युद्धाला बौसचे युद्ध असे म्हणतात.

या दोन अरब टोळ्या एकमेकांशी लढत असल्याने तिथल्या स्थानिक ज्यू व्यापारी काफिल्यांनी स्वतःचे स्थान मदिनेत पक्के केले.

 

medina-inmarathi
archinect.imgix.net

 

ही परिस्थिती लक्षात घेऊन मादिनेतील त्या दोन टोळ्यांनी इस्लाम स्वीकारून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रेषितांना मदिनेत निमंत्रण दिले.

त्या बदल्यात खज्रज आणि औस या टोळ्यांनी प्रेषितांचे रक्षण करण्याची शपथ घेतली (अकाबाची दुसरी शपथ)  मक्केतील मुर्तीपुजकांचा विरोध आणि मादिनेतून निमंत्रण या दोन गोष्टी स्थलांतरासाठी कारणीभूत ठरल्या.

मदिनेत आल्यानंतर निर्वासित मुस्लिम “मुहाजिरीन” आणि दोन अरबांच्या मदतनीस टोळ्या म्हणजे “अन्सार” हे दोन्ही गट प्रेषितांच्या बाजूचे होते.

पण स्थानिक प्रबळ असणाऱ्या ज्यूंचा त्रास होताच. त्या भागात टिकून राहण्यासाठी बिगरमुस्लीम ज्यू आणि अरब यांच्यासोबत काहीतरी ठराविक धोरण आखणे प्रेसितांना गरजेचे वाटले. आणि या गरजेतून तयार झाला मदिना करार.

या करारात साधारणपणे खालील बाबींचा उल्लेख आहे:

“बिगरमुस्लीम जनतेला धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्वातंत्र्य असेल. त्यांना त्यांच्या ठरलेल्या कर्मकांडांचा अवलंब करता येईल. आपल्या सामायिक शत्रूशी लढा देत असताना बिगरमुस्लीम जनतेने मुस्लिमांची साथ द्यायला हवी.

परंतु मुस्लिमांच्या धार्मिक लढाईत भाग घेण्याची सक्ती बिगरमुस्लिमांवर केली जाणार नाही. थोडक्यात, सार्वजनिक जीवनात पैगंबरांच्या अनुयायांना असलेले जवळजवळ सर्व हक्क बिगरमुस्लिमांना असतील.”

हा करार करून मदिनेत शांतता प्रस्थापित करण्यात प्रेषितांना यश आले. पण महत्वाची बाब ही की बिगरमुस्लीम ज्यू आणि अरब यांची ताकद जास्त असताना हा करार करण्यात आला आहे.

त्या व्यापारी टोळ्यांचे वर्चस्व जेव्हा संपुष्टात आले तेव्हा प्रेषितांनी त्यांच्याबद्दलचे धोरण बदलले आहे आणि हेच धोरण ‘काफिर अप्लासंख्यांक असताना काफिरांसोबत कसे वागले पाहिजे’ ते ठरवण्यासाठी आज वापरले जाते.

 

The-Constitution-of-Medina-inmarathi
i0.wp.com

 

भारतात असताना मदिना कराराचा दाखला देणारे पाकिस्तानात गेल्यानंतर अचानक वेगळे धोरण का स्वीकारतात हे यावरून पुरेसे स्पष्ट आहे.

इस्लामचा इतिहास आक्रमणाचा, रक्तपाताचा आणि सूडाचा आहे. हे आधी लक्षात घ्या. शांततेचा धर्म वगैरे गप्पांना काही पुरावे नाहीत आणि इस्लामिस्ट त्या चर्चेकडे ढुंकूनही पाहत नाहीत.

अस्तनीत निखारा आहे. तो काढून फेकून देणे आता शक्य नाही आणि व्यवहार्यही नाही. तो विझवावा लागेल. पण “आमच्या अस्तनीत जो आहे तो रस्त्यावर पडलेला निरागस दगड आहे, निखारा नाहीच.”

असे सांगत फिरणारे जे आहेत त्यांचे डोळे कोण उघडणार?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?