' “फ्रीजमध्ये” ठेवलेल्या पदार्थांपासून सुद्धा अपाय होऊ शकतो, यावर कोणते उपाय कराल? – InMarathi

“फ्रीजमध्ये” ठेवलेल्या पदार्थांपासून सुद्धा अपाय होऊ शकतो, यावर कोणते उपाय कराल?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण जे अन्न सेवन करतो ते आपल्या दैनंदिन आयुष्यात खूप मोलाचे काम करते आणि त्यामुळेच खरतर आपण एक सुंदर आयुष्य जगत असतो!

आपण जे अन्न सेवन करतो मग ते मांसाहारी असो किंवा शाकाहारी, ते अन्न आपल्या शरीरावर एक प्रकारची प्रक्रिया करते, त्यामुळे आपण काय खातोय, कसं खातोय, कोणबरोबर खातोय, कधी खातोय अशा सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात!

कोणतेही अन्न आपण गरम खाल्लेलं कधीही उत्तम, त्याने अपाय काहीच होत नाही उलट ते अन्न ताजं पोटात जाऊन पचन प्रक्रिया आणखीन सुरळीत होते!

 

hot food inmarathi

 

बऱ्याच वर्षांपूर्वी जेंव्हा रेफ्रीजरेटर आला नव्हता तेंव्हा लोकं अन्न ताजं बनवूनच खात होते आणि त्यामुळे कोणती गोष्ट उरण्याचा आणि वाया जाण्याचा किंवा खराब होण्याचा प्रश्न फार कमी उद्भवत होता!

पण जेंव्हा फ्रीज प्रत्येक घरात दिसू लागला आणि काही काळानंतर तो एक आवश्यक गोष्टींपैकी एक यात गणला जाऊ लागला तेंव्हापासून ताजं अन्न खाण्याच प्रमाण ही हळू हळू कमी होत गेलं आणि आता तर मायक्रोवेव्ह ओव्हन मुळे तर चांगलं अन्न सेवन करणं आणखीनच कमी झालं!

आपल्या घरातील अन्न आणि इतर पदार्थ चांगल्याप्रकारे आणि जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी फ्रिज उपयुक्त आहे. त्यामुळे त्याला योग्यप्रकारे वापरणे तेवढेच गरजेचे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

या फ्रिजचे जेवढे आपल्याला फायदे आहेत, तेवढेच त्याचे आपल्या आरोग्यावर काही अपायकारक परिणाम देखील होऊ शकतात.

फ्रिजमुळे आपल्या शरीरावर होणाऱ्या अपायकारक परिणामांना टाळण्यासाठी आम्ही काही टिप्स सांगणार आहोत. हे परिणाम टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता. त्याबद्दल..

 

fridge inmarathi

 

जर्नल ऑफ द अमेरिकन डायटेटिक असोसिएशनच्या २००४ च्या अंकानुसार, अन्नधान्याच्या रोगांमुळे अंदाजे ७६० लाख लोकांना विकार होतात . ३२५०० लोक हॉस्पिटलाइज आणि जवळपास ५००० लोकांचा मृत्यू दरवर्षी एकट्या अमेरिकेमध्ये होतो.

फ्रिजचे तापमान 

फ्रिजमध्ये अन्न थंड ठेऊन अन्नामध्ये होणाऱ्या जीवाणूंचा विकास कमी केला जातो. ५ अंश सेल्सियस ते ६३ अंश सेल्सियस यांच्यादरम्यान अन्नामध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यात जास्त असते.

त्यामुळे कधीही फ्रिज हा ५ अंश सेल्सियस किंवा त्याच्या खालीच ठेवावा. सलाड ड्रॉवरच्या वर असलेल्या शेल्फवर मर्क्युरी फ्री फ्रिज थर्मामीटर ठेवा आणि आठवड्यातून एकदा तापमान चेक करा.

फ्रीजचा दरवाजा नेहमी व्यवस्थित बंद ठेवा, कारण दरवाजा उघड राहिला तर तापमान वाढेल. तसेच फ्रिजमध्ये गरम अन्न ठेवू नका, कारण त्यामुळे फ्रिजचे तापमान वाढण्याची शक्यता आहे.

indian fridge 1 inmarathi

 

तुम्ही खरेदी केल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू पाच दिवसांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवू नयेत. जास्त काळ फ्रिजमध्ये कोणताही अन्नपदार्थ ठेवू नये.

तुम्ही फ्रिजमध्ये ठेवणार असलेल्या वस्तूंची खरेदी देखील योग्य पद्धतीने करा. खरेदी करताना त्या वस्तू किती काळ चांगल्या राहू शकतात, याचा विचार करूनच खरेदी करा. तसेच,

डेन्ट पडलेले किंवा लीक झालेले डब्बे, फ्रेश वाटणारे पण जुनाट असल्यासारखा वास येणारे अन्नपदार्थ, तसेच अंडी खरेदी करताना ते फुटलेले नाही ना, हे नक्की तपासा. तसेच सर्व पदार्थांची तारीख नक्की तपासा.

त्यानंतर घरी आल्यावर खराब अन्नपदार्थ बाजूला काढा आणि लगेच नाशवंत असलेले पदार्थ फ्रिजमध्ये ठेवा. पण कधीही फ्रिज गच्च भरू नका.

फ्रिजमध्ये हवा खेळती राहण्यासाठी काही जागा मोकळी ठेवा, कारण अशावेळी फ्रिजचे ठराविक तापमान कमी होऊन जिवाणू वाढण्याचा धोका निर्माण होतो.

 

Avoid food poisoning from Refrigerator.Inmarathi2

 

प्रत्येकवेळी आपण फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न देखील तपासणे तेवढेच महत्त्वाचे असते, कारण काही काळाने फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न हळूहळू खराब व्हायला सुरुवात होते. तसेच, कधी – कधी फ्रिजमध्ये ठेवलेले हे अन्न बाहेरून चांगले दिसते,

परंतु या अन्न पदार्थांमध्ये घातक विषाणू निर्माण झालेले असल्याचा धोका असतो. त्यामुळे जेव्हा कधी अशी शंका वाटेल, तेव्हा ते पदार्थ बाहेर काढून टाका.

फ्रिज हा नियमितपणे साफ करा, विशेषतः  फ्रिज हॅण्डल, शेल्फ आणि स्टोरेज कंपार्टमेंट या सर्वांचे पृष्ठभाग उबदार साबण्याच्या पाण्याने धुवून स्वच्छ करा.

स्वच्छ टॉवेल किंवा स्वयंपाक घरातील रोलसह फ्रिजमधील भाग पूर्णपणे कोरडा करावा. कधीही फ्रिज साफ करताना साफसफाईची उत्पादने वापरू नका, कारण त्यामुळे तुमच्या अन्न पदार्थांवर त्यांचा परिणाम होऊ शकतो किंवा तुमचा फ्रिज खराब होण्याची शक्यता असते.

fridge clean inmarathi

 

फ्रिजमध्ये पदार्थ ठेवताना ते काळजीपूर्वक पॅक करून ठेवा आणि त्यांना लवकरात लवकर वापरा.

अन्नपदार्थ जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी स्टोरेज करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पिशव्यांमधून शक्य तितकी हवा काढून टाका. लवकर पदार्थ थंड होण्यासाठी गरम पदार्थ एका वेगळ्या कंटेनरमध्ये काढून ठेवा.

अशा पद्धतीने वरील सर्व प्रकारची काळजी घेऊन तुम्ही फ्रीजमुळे तुमच्या आरोग्यावर होणारे अपायकारक परिणाम टाळू शकता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?