' लोकांना एकमेकांशी जोडणाऱ्या ‘फेसबुकच्या’ ह्या काही रंजक गोष्टी वाचून थक्क व्हाल! – InMarathi

लोकांना एकमेकांशी जोडणाऱ्या ‘फेसबुकच्या’ ह्या काही रंजक गोष्टी वाचून थक्क व्हाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : विशाल दळवी

===

आपण रोज फेसबुक वापरतो. कित्येक तास त्यावर खर्च करतो. आपल्याला वाटतं की आपल्याला फेसबुक बद्दल सगळ माहित आहे…पण हा आपला भ्रम आहे.

फेसबुक स्वत: इतकं प्रचंड आहे की बहुधा फेसबुकलाच माहित नसावं की ते किती मोठ आहे (अर्थात, मार्क झुकर्बर्गचा अपवाद वगळता…आता बापाला आपल्या पोराविषयी माहिती नसेल तरच नवल!)

तर मग जाणून घ्या हे फेसबुक नक्की किती मोठं आहे आणि अश्या कोणत्या गमतीदार गोष्टी आपल्या पोटात साठवून आहे…!

 

facebook-facts-marathipizza01

 

गुगल नंतर सर्वात मोठी वेबसाईट कोणती असेल तर ती आहे ‘फेसबुक’! फेसबुक वर सध्या २.६ अब्ज अॅक्टीव्ह युजर्स आहेत.

दर २० मिनिटांनी फेसबुकवर १० लाख लिंक्स शेअर केल्या जातात आणि जवळपास २० लाख फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या जातात, तर सुमारे ३० लाख मेसेजेस पाठवले जातात.

 

fb request inmarathi
komando.com

 

जेव्हापासून फेसबुक सुरु झाले आहे तेव्हापासून आजपर्यंत फेसबुकवर तब्बल ३०० अब्ज फोटोज पोस्ट केले गेले आहेत…आणि हे काम अविरत सुरूच आहे…

फेसबुकचं जे ‘लाईक’ बटण आहे ते पहिले ‘ऑसम’ बटण म्हणून सादर केल जाणार होतं!

फेसबुकमध्ये १२,००० कर्मचारी काम करतात आणि यांच्या सहाय्याने फेसबुक जवळपास १२ अब्ज रुपयांची कमाई करतं.

ईबे, याहू, लिंक्ड, नेटफ्लिक्स यांच्या कमाईच्या दुप्पटीपेक्षा जास्त फेसबुक कमावतं

 

facebook-facts-marathipizza02
telxweb.com

 

तीन फुटबॉल ग्राउंड एकत्र केल्यावर जेवढी जागा निर्माण होईल तेवढ मोठं फेसबुकचं डेटा सेंटर आहे आणि त्यामध्ये २ कोटी १० लाख फुट लांबीच्या फायबर केबल्स आहेत

फेसबुकमध्ये दर दिवसाला हजारो सर्व्हर्स रिसीव्ह केले जातात. या प्रत्येक सर्व्हर्सची साईज ५०० टीबी इतकी असते.

दर दिवसाला १०० पीटी अर्थात १०० पेटाबाईट्स साईजचे फोटोज आणि व्हिडीयोज रिसीव्ह केले जातात. हे कल्पनेपलीकडचं आहे.

 

fb deta centre inmarathi
engineering.fb.com

 

फेसबुकने इंस्टाग्राम, ऑक्यूलस आणि वॉट्सअप या तिन्ही कंपन्या खरेदी केल्या आहेत.

आणि सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे मार्कच्या ह्या फेसबुकची आजची किंमत ही ३५ बिलियन डॉलर्स – ३५ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे २४५० अब्ज रुपये इतकी आहे.

 

fb logo inmarathi
financialtimes.com

 

फेसबुकला इतकं मोठं केलंय आपण! आणि ते इतक पसरलयं की त्याशिवाय जगणं असह्य आहे. त्यामुळे मुलभूत गरजांमध्ये फेसबुकचा पण नंबर लागलाच पाहिजे की!!

अन्न, वस्त्र, निवारा आणि फेसबुक – एक अघोषित गरज!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?