' मुलींसाठी (व त्यांच्या मातांसाठी) अत्यंत महत्वाचं : मासिक पाळी सुरु होताना घ्यावयाची काळजी – InMarathi

मुलींसाठी (व त्यांच्या मातांसाठी) अत्यंत महत्वाचं : मासिक पाळी सुरु होताना घ्यावयाची काळजी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागील भागाची लिंक : कडू मेथीचे आरोग्यदायी गुण : आहारावर बोलू काही – भाग 15

===

लेखिका – डॉ. प्राजक्ता जोशी 

===

पौगंडावस्था (puberty) म्हणजे स्त्रीयांतील मासिक पाळी पूर्व किंवा सुरू होण्याचा काळ. या काळातील स्त्रीचे शारीरीक व मानसीक स्वास्थ्य यावर संपुर्ण प्रजनन संस्थेची वाढ व स्वास्थ्य अवलंबुन असते व त्यासाठी योग्य आहार अत्यंत महत्वाचा आहे.

 

puberty InMarathi

 

या अवस्थेत शरीरासाठी अत्यंत अवश्य घटक पुढीलप्रमाणे आहेत.

१) Iron-रक्तवृद्धीसाठी

२) Calcium-हाडांच्या मजबुतीसाठी

३) Zinc-रोगप्रतिकार क्षमतेसाठी

४) योग्य वजन कायम राखणे-मासिक पाळी योग्य प्रकारे यावी म्हणुन

आता एक-एक भाग विस्ताराने पाहु.

 

puberty-inmarathi01

 

  • Iron ची योग्य मात्रा आहारात असणे अत्यंत आवश्यक असते. नसल्यास या वयातील anemia आयुष्यभर पाठ सोडत नाही.त्यामुळे सर्व प्रकारची धान्ये, कडधान्ये, सुकामेवा, दाळींब, सेफ यासाखी फळे,पालक, मेथी यारख्या पालेभाज्या यांचा अवश्य समावेश असावा.
  • Red meat, lean beef  ह्यांचे देखील सेवन करावे.
  • सब्जा, हळीव, राजगिरा हेही रक्तवर्धक आहेत. त्याचाही समावेश असावा.
  • Calcium – दुध, दही, तुप याचे नियमीत सेवन करावे.
  • Low fat cheese, yogurt हेही पर्याय आहेत.
  • Zinc-pumpkin seeds (लाल भोपळ्याच्या बीया) फळे, फळभाज्या यात zinc चे प्रमाण भरपुर असते .

Zinc-Rich-Foods InMarathi

 

हे झाले महत्वाचे घटक.पण त्या व्यतिरीक्त काही नियम पाळावेत.

१) आहार हा चौरस असावा. वैविध्य असल्यास सर्व पोषणमुल्ये तर मिळतातच. पण food allergy होण्याची शक्यता कमी होते.

२) ताजे अन्न खावे.

३) Processed food -पिझ्झा, बर्गर, जॅम, साॅस ईत्यादीचे सेवन टाळावे.

४) भाज्या भरपुर खाव्यात.

५) दाळिंचे नियमीत सेवन करावे.

६) फळे भरपुर खावीत.

७) तेल हे unrefined किंवा cold pressed असावे.

 

Calcium-Foods InMarathi

 

८) Essential fatty acids हे prostaglandin ची निर्मीती करतात. हे hormone पाळितील पोटदुखीत गर्भाशय शिथील करण्यास मदत करते. त्यामुळे dysmenorrhoea मध्ये ऊपयुक्त ठरते. याचा ऊत्तम स्त्रोत आहे जवस. जी सहज ऊपलब्धही होते.

९) सोयाबीन ही या वयातील मुलींनी अवश्य खावे. Proteins, Calcium याचा तो ऊत्तम स्त्रोत आहे. तसेच plant oestrogen चे ते ऊत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे pre menstrual syndrome मध्ये ऊपयुक्त ठरते.

१०) पाणी भरपुर प्यावे.

 

 

water-health-inmarathi05

 

११) या वयातील मुलींनी सुदृढ वजनाचे नियमन करणे आवश्यक असते. कारण वजन वाढल्यास PCOD, Irregular Mences अशी लक्षणे दिसु लागतात.

१२) या ऊलट वजन कमी असल्यास अशक्तपणा,थकवा, लक्ष केंद्रीत न होणे अशी लक्षणे दिसतात.

१३) त्यामुळे मुलींना आवडेल असा कुठलाही व्यायाम किमान अर्धा तास तरी करायला हवा. तसेच योगा, प्राणायाम केल्यास मानसिक स्वास्थ्यही जपल्या जाते.

 

morning yoga inmarathi

 

आयुर्वेदाने हा स्त्रीच्या आयुष्यातील हा काळ “पित्तप्रधान” सांगितला आहे.

पित्ताचे कार्य हे शरीरात होणारे बदल, चयापचय यांच्याशी निगडीत असतात. ऊष्ण गुणाचे प्राधान्य असते. त्यामुळे भरपुर पाणी प्यावे. खजुर, मनुका, भिजवलेला सुकामेवा खावा असे सांगितले आहे.

तुप व तिळ हे गर्भाशयासाठी tonic सारखे कार्य करतात. पाळीमध्ये पोट दुखत असेल तर १ चमचा तुप व १ चमचा तिळतेल एकत्र करून द्यावे. लगेच आराम मिळतो.

मेथी ही देखील अत्यंत ऊपयुक्त ठरते. मेथी natural hormonal balancer आहे. तसेच वजन नियमीत ठेवते व प्रजननक्षमता वाढवते.

 

methi seeds InMarathi

 

त्याचप्रमाणे, तारूण्यपिटीका, केस लवकर पांढरे होणे यावरही ऊपयुक्त ठरते. रोज अर्धा चमचा मेथी पावडर खावी.
त्याचप्रमाणे आयुर्वेदात “स्नेहन” (oil bath ) या वयात अत्यंत ऊपयुक्त सांगितले आहे.

आजच्या लेखातील सर्व माहीतीचा ११-१४ वयोगटातील मुलींनी पालन केल्यास “मासीक पाळी” तर त्यांना सुखावह होईलच पण एक स्वस्थ जीवनशैली जगण्याची सवयदेखील अंगीभूत होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा:इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल:https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?