“भगवद्गीतेचा भ्रष्टाचार”…चीड आणणारी घटना
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय राजकारणात भ्रष्ट्राचाराचे बीज हे खूप आधीपासून रोवले गेले आहे. आणि आता तर हे राजकारणात सर्वत्र पसरले आहे. रोज कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आपल्या कानी पडत असतात. कधी ते लहान स्वरूपाचे असते तर कधी खूप मोठे… असाच एका नेत्याचा आणखी एक भ्रष्ट्राचार उघडकीस आला आहे. आणि हा भ्रष्ट्राचार चक्क ‘भगवद्गीते’चा आहे…
आरटीआय नोटीसमध्ये असे आढळून आले की, मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भगवद्गीतेची एक प्रत थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ३८००० रुपयांना खरेदी केली. या योजनेद्वारे २०१७ मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाच्या काळात उपस्थित असणाऱ्या व्हीव्हीआयपींना गीतेची प्रत भेट म्हणून दिली गेली.
10 #Gita purchased for Rs. 3,79,500 By .@mlkhattar Govt. At #gitajayanti
Wah .@narendramodi ji what an Honest government we have in #Haryana.
Gita ke naam pe bhi chori
Uper Se Sina Jori #Scam .@cmohry pic.twitter.com/iUYsVQ3di4— Dushyant Chautala B- (@Dchautala) January 7, 2018
एका आरटीआय म्हणजेच माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत आलेल्या प्रश्नाच्या उत्तराने हा भ्रष्ट्राचार उघडकीस आला आहे. यात असे सांगण्यात आले की, मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली सरकारने भगवद्गीतेच्या काही प्रती विकत घेतल्या ज्यांची किंमत ३८ हजार रुपये प्रती प्रत आहे. या प्रती २०१७ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवात व्हीव्हीआयपी लोकांना भेट देण्याकरिता विकत घेण्यात आल्या होत्या.
सरकारने या दहा प्रती खरेदी करण्याकरिता जवळजवळ ३.८ लाख रुपये खर्च केले.
ह्यात केवळ १० च प्रत खरेदी करण्यात आल्या. बाजारात भगवद्गीतेच्या पुस्तकाची किंमत जास्तीतजास्त १५०-२५० रुपये एवढी आहे. जेव्हाकी मनोहर लाल खट्टर यांनी भगवद्गीतेच्या एका प्रतीसाठी तब्बल ३८ हजार रुपये खर्च केले.
टाईम्स ऑफ इंडियाच्या सुत्रांच्या माहितीनुसार, या खास प्रत होत्या, ज्या केवळ त्या कार्यक्रमाकरिता बनवून घेण्यात आल्या होत्या. ही पवित्र पुस्तकं बनविण्याकरिता एक अतिशय महाग कागद वापरण्यात आल्या होता जो प्राचीन हस्तलिखित ग्रंथासारखा दिसायचा.
या कार्यक्रमा दरम्यान, अभिनेत्री आणि राजकारणी हेमा मालिनी आणि मनोज तिवारी यांनी परफॉर्मन्स सादर केले होते, ज्याकरिता त्यांना एक मोठी रक्कम देण्यात आली होती. राज्य सरकारने हेमा मालिनी यांना त्यांच्या परफॉर्मन्स साठी १५ लाख तर मनोज तिवारी यांना १० लाख दिले होते.
हा कार्यक्रम २५ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१७ या काळात घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील हजेरी लावली होती. तसेच केंद्रीय मंत्री उमा भारती, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, हरीयाणाचे राज्यपाल यांच्यासह अनेक नेत्यांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदविली होती.
हिसार येथील रहिवासी राहुल सेहरावत यांनी ही RTI फाईल केली होती. यांनी यात असा दावा केला होता की, या कार्यक्रमासाठी केवळ ४.३२ कोटी रुपयांचा खर्च आला होता पण याकरिता १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.
आता सेहरावत हे आणखी एक RTI टाकण्याच्या तयारीत आहेत ज्यात यासंदर्भात इतर खर्चाची माहिती असेल.
सरकारच्या एखाद्या नेत्याचा असा भ्रष्टाचार उघडकीस येईल आणि विरोधीपक्ष यावर आपली पोळी नाही भाजणार.. हे तर शक्यचं नाही. या प्रकरणात आता विरोधीपक्षांनी देखील उडी घेत खट्टर यांना विरोध केला तर, दुसरीकडे राज्य सरकारचे म्हणणे आहे की, अश्याप्रकारचे खर्च हे गरजेचे आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले आहे की,
बराच विचार केल्यानंतर हा खर्च करण्यात आला आहे आणि अशा प्रकारे पैसे खर्च करणे सुरूच राहिलं.
या सर्व प्रकरणात प्रश्न हा उपस्थित होतो की, जी भगवद्गीता १५०-२५० रुपयांपर्यंत मिळते त्यावर या नेत्याने ३.८ लाख रुपयांचा खर्च का केला. तसेच जर या कार्यक्रमाकरिता केवळ ४.३२ कोटी रुपयांचा खर्च आला असेल तर १५ कोटी रुपये सरकारने का मंजूर केले.
हे नेते लोकं अश्या कार्यक्रमांच्या नावावर जे पैसे सरकारकडून मंजूर करवून घेतात त्याचा हिशोब यांना कुठे ना कुठे नक्कीच द्यायला हवा, नाहीतर आपल्या देशात अश्या कार्यक्रमांत भ्रष्ट्राचार होत राहिलं आणि जनतेचा पैसा या भ्रष्ट्राचारी नेत्यांच्या खिशात जात राहिल…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.