या लंका मिनारमध्ये बहिण-भाऊ एकत्र जाऊ शकत नाहीत, का? ते जाणून घ्या…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
धार्मिक स्थळे म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट असते. त्यांच्या धर्माचे, त्यांच्या कुळाचे, त्यांच्या संस्कृतीचे दर्शन या अशा धार्मिक स्थळांमध्ये घडते!
यात मंदिरे, मस्जिदी, गुरुद्वारा अशा बऱ्याच स्थळांचा समावेश असतो!
भारतात वेगवेगळ्या धर्माच्या आणि जातीतल्या लोकांचे वास्तव्य असल्याने, प्रत्येक धर्माचे श्रद्धास्थान म्हणून त्यांच्या प्रत्येक धर्मस्थळाचे इथे संरक्षण आणि जतन केले जाते, त्यामुळेच भारताला इतक्या प्राचीन धर्मस्थळांचा वारसा लाभला आहे!
या गोष्टींवरून कधी कधी इथे वाद सुद्धा निर्माण होतात आणि ते अत्यंत टोकाला सुद्धा जातात, याचा अनुभव बऱ्याच रहिवाशांनी घेतला असेल. पण तरीही इथली लोकं कितीही वाद झाले तरी एकमेकांना धरून आहेत याच दर्शन सुद्धा बऱ्याच वेळेला घडत!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
पण आपण त्या नकारात्मक गोष्टींकडे कानाडोळा करून अशाच एका धर्मस्थळाबद्दल जाणून घेऊ.
भारतामधील प्रत्येक धार्मिक स्थळाचे किंवा एखाद्या स्थळाचे एक वेगळे महत्त्व असते आणि याच वेगळ्या महत्त्वामुळे या स्थळांना प्रसिद्धी मिळते.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्थळाची माहिती देणार आहोत, जे आपल्या वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. हे कारण थोडे विचित्रच आहे. चला तर मग जाणून घेऊया, या प्रसिद्ध स्थळाबद्दल..
यूपीच्या जलौनमध्ये २१० फूट उंच लंका मिनार आहे. याच्या आतमध्ये रावणाच्या पूर्ण कुटुंबाचे चित्रण करण्यात आले आहे. याची खास गोष्ट अशी कि, या मिनारवर सख्खे भाऊ – बहिण एकत्र जाऊ शकत नाही. चला तर मग जाणून घेऊया, या मिनारामागे लपलेली गोष्ट.
या मिनाराला मथुरा प्रसादने तयार केले होते, ज्यांनी रामलीलामध्ये रावणाची व्यक्तीरेखा बरीच दशके साकारली होती. रावणाची व्यक्तीरेखा त्यांच्या मनावर एवढी काही बिंबली होते की, त्यांनी रावणाच्या आठवणीमध्ये ही लंका मिनार तयार केली.
–
- समुद्रमंथनातून प्राप्त झालेला अमृतकलश ‘या’ मंदिरात असल्याचा दावा…!!
- पॅरेलिसिस झालेली व्यक्ती ठणठणीत बरी होते या मंदिरात! खरं की खोटं? वाचा
–
१८७५ मध्ये मथुरा प्रसाद निगमने रावणाच्या स्मृतीमध्ये येथे २१० फूट उंच मिनार बनवली आहे, ज्याला त्याने लंका नाव दिले आहे. कस्तुरी, उडदाची डाळ, शंख आणि कवड्यांनी ही मिनार बनलेली आहे. या लंका मिनाराला बनवण्यासाठी जवळपास वीस वर्ष लागली.
त्या काळी या मिनाराला बनवण्यासाठी १ लाख ७५ हजार रुपये एवढी रक्कम लागली होती, असे म्हटले जाते. स्वर्गीय मथुरा प्रसाद फक्त रामलीलाचे आयोजनच करत नसत, तर या रामलीलामध्ये रावणाची व्यक्तिरेखा स्वत:च साकारत असत.
या रामलीलेमध्ये मंदोदरीची भूमिका घसीटीबाई नावाची एक मुस्लिम स्त्री साकारत असे.
या मिनारामध्ये १०० फूट कुंभकर्ण आणि ६५ फूट उंच मेघनाथची मूर्ती लावण्यात आलेली आहे. तिथेच मिनारच्या समोर भगवान चित्रगुप्त आणि भगवान शंकराची मूर्ती आहे.
हे मंदिर अशाप्रकारे तयार करण्यात आलेले आहे कि, रावण आपल्या लंकेमधून भगवान शंकराचे २४ तास दर्शन घेऊ शकतो. या परिसरामध्ये १८० फूट लांब नाग देवता आणि ९५ फूट लांब नागीण प्रवेशद्वाराजवळ आहे, जी मिनाराची राखण करते.
नागपंचमीला या परिसरांमध्ये भव्य जत्रेचे आयोजन करण्यात येते. कुतुबमिनार नंतर भारताच्या सर्वात उंच मिनारांमध्ये लंका मिनार समाविष्ट आहे.
भावा – बहिणीने एकत्र जाणे निषिद्ध आहे.
आजही आपल्या देशात अनेक रूढी परंपरांचे अंधपणे पालन केल्या जातात, आपल्याला माहीत सुद्धा नसते कि यामागे नेमका काय हेतू आहे तरी मोठ्यांच्या आदराखातर आपण त्यांचं पालन करत असतो, अशीच एक परंपरा या मंदिराची सुद्धा आहे!
या मिनाराच्या परिसरात भाऊ आणि बहिण एकत्र जाऊ शकत नाही. याचे कारण आहे की, लंका मिनाराच्या खालपासून वरपर्यंत चढाईमध्ये सात परिक्रमा करायच्या असतात, ज्या भाऊ – बहिण करू शकत नाहीत.
ह्या फेऱ्या फक्त पती–पत्नीसाठी मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भाऊ–बहिणीला एकत्र येथे जाण्यास मनाई आहे.
असे हे मिनार देशभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि वर दिलेल्या कारणामुळे भाऊ–बहिणीला एकत्र येथे जाण्यासाठी मनाई आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.