' ‘ह्या’च्या हुंडा प्रथेविरोधी एका छोट्याश्या मोहिमेतून आज अनेकांना प्रेरणा मिळत आहे – InMarathi

‘ह्या’च्या हुंडा प्रथेविरोधी एका छोट्याश्या मोहिमेतून आज अनेकांना प्रेरणा मिळत आहे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

कोणीही महान जन्मापासून नसतो, तर तो त्याच्या कर्तुत्वाने महान होत असतो. यापैकीच एक म्हणजे बिहार येथे राहणारे इम्तियाज… त्यांनी जवळपास दीड वर्षांपूर्वी हुंडा प्रथेविरुद्ध एक मोहीम सुरु केली होती, ज्या मोहिमेने आज एका कॅम्पेनचं स्वरूप घेतलं आहे.

 

imtiyaz-inmarathi

 

याची सुरवात त्यांनी त्यांच्या लग्नापासून केली. १८ नोव्हेंबर २०१६ ला त्यांचा विवाह झाला. त्यांच्या या लग्नात ना कोणी वऱ्हाडी होते नाही कुठल्या प्रकारच नाचणे-गाणे. त्यांच्या या साध्याध्या-सुध्या लग्नात त्यांच्या कुटुंबातील ६ लोकांनीच सहभाग घेतला होता. त्यांच्या लग्नात कुठलीही गाणी वाजली नाहीत आवाज झाला नाही पण तरी त्याच्या सामाजिक मनावर खूप मोठा परिणाम झाला. त्यांच्या लग्नात कुराण आणि हदीसच्या जागी त्या संदेशांचे पठन झाले ज्यातून मुलींची समाजातील स्थिती कळून येत होती.

 

imtiyaz-inmarathi04

 

त्यांच्या लग्नात सजावटीसाठी फुलं किंवा पुष्पगुच्छ नाही तर हाताने लिहिलेले पोस्टर लावण्यात आले होते, ज्याद्वारे हुंडा प्रथेचा विरोध दर्शविण्यात आला. इम्तियाज एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांच्या पत्नीने त्यांच्या घरात गृहप्रवेश देखील खाली हातांनी केला.

 

imtiyaz-inmarathi02

 

त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला देखील त्यांनी अश्याच अनोख्या पद्धतीने साजरे केले. त्यांनी याला ‘Unnoticed Clothes’ कॅम्पेनचं नाव दिलं. त्यांच्या या कार्यक्रमात त्यांच्या पत्नीने देखील सहभाग घेतला. त्यांनी या कॅम्पेन दरम्यान मुजफ्फरपूर येथील चंदवारा परिसरातील मशिदींमध्ये आणि मंदिरात पोस्टर लावले. ज्याद्वारे लोकांना अशील अपील करण्यात आली की, त्यांच्या घरातील जुने वापरात नसलेले कपडे कार्टनमध्ये आणून टाका. जेणेकरून ते कुठल्या गरजुंच्या कामात येईल.

 

imtiyaz-inmarathi05

 

या कॅम्पेन बद्दल बोलताना इम्तियाज सांगतात की,

“सध्या या कॅम्पेनला सुरु होऊन काही दिवसच झाले आहेत, तरी आमच्याजवळ अडीच हजाराच्या जवळपास स्वेटर, जॅकेट्स, टी-शर्ट, शर्ट, पॅण्ट आणि महिलांचे कपडे जमा झाले आहेत. या कपड्यांना गरजूंपर्यंत पोहोचवून आम्ही त्यांचा थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

 

imtiyaz-inmarathi03

 

या कपड्यांच्या कॅम्पेन बाबत इम्तियाज सांगतात की,

“आज माणसाचे वय हे ५५-६० वर्ष आहे. ज्यात २५-३० वर्षांत त्याचं लग्न होऊन जाते. म्हणजेच आपल्या देशातील व्यक्ती त्याच्या जीवनात २५-३० वेळा आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतो. जर १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील १% लोकांनी जरी आपल्या लग्नाचा वाढदिवस सामाजिक स्तरावर सर्जा केला तर आपण १,२५,००,००० लोकं काही ना काही चांगल नक्कीच करू शकू. ही कॅम्पेन सुरु करण्यामागे आमचा हा उद्धेष्य होता.”

आता त्यांच्या या कॅम्पेन बद्दल लोकांचे विचार देखील बदलायला लागले आहेत. ते आतापर्यंत अश्या १३ लोकांच्या लग्नात सहभागी झाले आहेत, जिथे पैसा वाया न घालवता, हुंडा न घेता लग्न झाले.

इम्तियाज यांनी केलेली एक छोटीशी सुरवात आज एका कॅम्पेनमध्ये बदलली आहे. कदाचित यालाच बदल म्हणतात. त्यांनी आपल्या या मोहिमेसाठी घेतलेली मेहनत हळूहळू यशस्वी होताना दिसत आहे.

आज जिथे एका मुलीचं लग्न म्हणजे त्या मुलीच्या बापाची जन्मभराची कमाई लागून जाते. हुंडा प्रथेमुळे कित्येक मुली या जगात जन्म घेण्याआधीच त्यांचा बळी जातो. तिथे इम्तियाजने उचलेले पाऊल हे खरच कौतुकास्पद आणि तेवढेच प्रेरणादायी देखील आहे…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?