' नासाच्या या तंत्रज्ञानामुळे पिकांच्या उत्पादनात होऊ शकते तीनपट वाढ – InMarathi

नासाच्या या तंत्रज्ञानामुळे पिकांच्या उत्पादनात होऊ शकते तीनपट वाढ

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासाबद्दल तुम्हाला माहिती असेलच. नासाची स्थापना २९ जुलै १९५८ मध्ये करण्यात आली. अमेरिकेच्या राष्ट्रीय वैमानिकी व अंतराळसंशोधन कायद्यान्वये आधीच्या नॅशनल अॅडवायझरी कमिटी ऑफ एरोनॉटिक्स ऊर्फ नाका या संस्थेच्या जागी, नासाची स्थापना करण्यात आली. नासा ही अंतराळामध्ये संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे. नासाचे खरे कामकाज १ ऑक्टोबर १९५७ पासून सुरु झाले. नासा ही अंतराळामध्ये शोधकार्य करणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे. जगातील मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी नासाबरोबर काम केले आहे.

 

Boosts wheat production.Inmarathi
climateprotection.org

धान्य हे सगळ्यांसाठीच महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे त्याची गरज सर्वांनाच असते. पण सध्या या धान्याची उणीव जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यावर काहीतरी उपाय करता यावा यासाठी शास्त्रज्ञांनी काही नवीन प्रयोग केले आहेत. चला तर मग जाणून घेऊया, याबद्दलची माहिती…

ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी जगातील पहिले ‘स्पीड ब्रीडिंग’ तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये गहूबरोबर इतर धान्यांच्या उत्पादनाच्या तीनपट वाढू शकते. हे तंत्रज्ञान नासाकडून करण्यात आलेल्या अंतराळात उगणाऱ्या गहूवर आधारलेले आहे.

यामध्ये नासाने गहूवर सारखा प्रकाशाचा प्रयोग करण्यात आला होता, ज्यामुळे ब्रीडिंगची क्षमता वाढली आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, २०५० पर्यंत आम्हाला जगभरातील नऊ अरब लोकांसाठी अन्न उपलब्ध करायचे आहे. यासाठी वर्तमानात ६० ते ८० टक्के अधिक धान्य उत्पादन करण्याची गरज आहे. अशावेळी नवीन तंत्रज्ञानाची उपयोग अजून वाढत जाते.

 

Boosts wheat production.Inmarathi1
clarksvilleonline.com

युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँडचे संशोधक ली हिकीने सांगितले की, ‘आम्ही नासाच्या या तंत्रज्ञानाने पृथ्वीवर देखील कमी वेळेमध्ये धान्य उगवण्याचा प्रयत्न केला.’ याच्या मदतीने वनस्पतींच्या अनुवांशिक विशेषतांना वाढवू शकते. स्पीड ब्रीडिंग तंत्रज्ञानाने विशेष वनस्पती घरांमध्ये एका वर्षातच गहू, काबुली चणे आणि बार्लीच्या सहा व तेलबियाच्या चार प्रजाती उगवल्या जाऊ शकतात.

जुन्या वनस्पती घरांमध्ये कोणत्याही धान्याच्या दोन ते तीन, तसेच शेतांमध्ये फक्त एकच प्रजाती उगवली जाऊ शकते. या प्रयोगावरून हे लक्षात येते की, खूपवेळ प्रकाश देणे आणि वातावरण नियंत्रित करून पिकांचे उत्पादन वाढवले जाऊ शकते. डॉव एग्रो सायन्सज बरोबर मिळून संशोधकांनी हे नवीन तंत्रज्ञानाने डीएस फराडे नावाच्या गव्हाच्या प्रजातीला विकसित केले आहे.

 

Boosts wheat production.Inmarathi2
sohucs.com

नेचर प्लांट पत्रिकेमध्ये छापलेल्या शोधाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, स्पीड ब्रीडिंग तंत्रज्ञानाचा वर्टिकल फार्मिंग सिस्टममध्ये देखील प्रयोग केला जाऊ शकतो. यामध्ये खूप मजली ग्रीन हाऊसमध्ये शेती केली जाते.

अशी ही सिस्टम नवीन पिकांचे उत्पादन झटपट घेण्यासाठी आणि त्याचा दर्जा कमी न होता, त्याची वाढ लवकर होण्यासाठी महत्त्वाची आहे. लवकरच याचा वापर करण्यात येईल अशी आशा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?