लक्षद्वीपच्या निळ्याशार समुद्रावरून आता तुम्ही घेऊ शकणार उड्डाण, तयार होत आहे नवीन रनवे
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
फिरायला जायचे म्हटले तर कधीही त्यातील प्रवास हा महत्त्वाचा टप्पा असतो. कधी – कधी आपल्या गंतव्य स्थानापेक्षा आपल्याला प्रवासामध्ये खूप मज्जा येते, वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या दळणवळणाच्या साधनांचा वापर करावा लागतो. तसेच, कमी वेळामध्ये आपल्याला लांब पल्ल्याचे अंतर कापायचे असल्यास आपल्याकडे विमान हा उत्तम पर्याय असतो. आपले बजेट चांगले असले आणि आपण विमानामधून जाण्यासाठी पुरेसे पैसे खर्च करत असू शकल्यास हा पर्याय खूपच योग्य आहे.
विमानातील प्रवास देखील इतर दळणवळणाच्या साधनांपेक्षा खूपच आरामदायी असतो, त्यामुळे त्या बाबतीत देखील विमान हे सरस ठरते. पण काही ठिकाणी विमानतळाच्या कमी क्षेत्रफळामुळे किंवा विमानाला उतरण्यासाठी आणि उड्डाण घेण्यासाठी असलेल्या धावपट्टींच्या अभावी काही मोठी विमाने त्या ठिकाणे जाण्यास अडथळा निर्माण होतो.
विमानाला उड्डाण घेण्यासाठी रनवे म्हणजेच धावपट्टी हे फार महत्त्वाचे असते. तुम्ही नेहमी पाहिले असेल की, विमानतळ ही खूप मोठमोठी असतात. या विमानतळावर असलेल्या रनवेमुळेच या विमानतळांचे क्षेत्रफळ वाढते. आपला भारत देश प्रत्येक दिवशी यशस्वीपणे पुढे वाटचाल करत आहे. इतर देशांसारखीच आपल्या देशाची प्रगती देखील झपाट्याने होत आहे. याच प्रगतीचे एक चित्र लक्षद्वीपच्या अगाट्टी विमानतळावर दिसून येत आहे. या विमानतळाचे क्षेत्रफळ वाढवण्यासाठी एयरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ़ इंडिया यांनी समुद्रांच्या लाटांवर रनवे बनवण्याची तयारी सुरु करण्यात आलेली आहे.
हा रनवे बनवल्यानंतर अगाट्टी विमानतळापेक्षा मोठे असलेल्या ATR विमानांचे येणे – जाणे शक्य होऊ शकते. सुरुवातीला या दोन बेटांना एकत्र जोडण्यासाठी Sea Bridge ची योजना होती, ज्याला कालांतराने रनवेमध्ये बदलण्यात आले. या रनवेला एक RCC प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहे.
एयरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ़ इंडियाच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे कि, ‘ सुरुवातीला हा ब्रिज आयर्लंड – लिंकिंग प्लॅनचा भाग होता, पण पर्यावरणाच्या चिंतेच्या कारणामुळे याला इथेच सोडण्यात आले. हा नवीन बनवण्यात येणारा रनवे किनाऱ्यापासून होत समुद्राच्या मधून जाईल.’
या प्रोजेक्टवर जवळपास १५०० कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एकदा काय हा रनवे सुरु झाला कि, त्यांनतर या ठिकाणावरून ATR – ७२ विमान येथून उड्डाण भरू शकेल. अधिकाऱ्यांचे यावर असे म्हणणे आहे कि, या होणाऱ्या रनवेमुळे विंमानाच्या भाड्यामधील पैसे खूप कमी होतील आणि येथील पर्यटनाला अजून प्रोत्साहन मिळेल आणि खूप पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतील.
या सर्व कारणांमुळे ही नवीन होणारी धावपट्टी खूपच महत्त्वाची ठरणार आहे आणि पर्यटकांना या ठिकाणी येण्यासाठी यामुळे खूपच सोयीस्कर होणार आहे. तसेच, ही धावपट्टी पाण्यातून होत येणार असल्याने पर्यटकांना अप्रतिम असे दृश देखील येथे विमानातून पाहण्यास मिळणार आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.