' कित्येक अपघातांस जबाबदार धरलं गेलेलं, रडणाऱ्या बाळाचं हे ‘शापित’ चित्र… – InMarathi

कित्येक अपघातांस जबाबदार धरलं गेलेलं, रडणाऱ्या बाळाचं हे ‘शापित’ चित्र…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्हाला एनाबेला या बाहुलीची कहाणी तर माहित असणारच. त्यावर चित्रपट देखील बनविण्यात आला होता, जो अतिशय भयानक होता. भलेही आपण भूत-प्रेत यांसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत नसलो तरी भूतकाळातील अशा अनेक घटना प्रचलित आहेत ज्या या अदृश्य शक्ती असल्याचे संकेत देतात. असो… भुतं असतात किंवा नसतात हा एक वेगळाच विषय आहे.

आज मात्र आम्ही तुम्हाला एनाबेला प्रमाणेच गूढ अशा एका पेंटिंगची कहाणी सांगणार आहोत. एक असं पेंटिंग जे शापित मानलं जायचं.

 

 

आता तुम्ही विचार करत असाल की, एका पेंटिंग ने काय होईल बरं.. पण या पेंटिंगबद्दल असं सांगितलं जातं, की

आजवर हे पेंटिंग जिथेही लावण्यात आलं, तिथे विनाश झाला आहे.

आता यावर किती विश्वास ठेवायचा हे आपल्यावर आहे, पण आम्ही असल्या कुठल्याही अंधविश्वासाला पाठिंबा देत नाही आहोत. आम्ही तर तुम्हाला केवळ एक प्रचलित कहाणी सांगत आहोत.

 

The Crying Boy Painting-inmarathi08

 

हे पेंटिंग कुठल्याही साधारण चित्रकाराने नाही तर इटलीचा प्रसिद्ध चित्रकार जीयोवनी ब्रागोलिन यांनी रंगवले होते.

हे पेंटिंग एका रडणाऱ्या लहान मुलाचे होते. या पेंटिंगचे नावच ‘दि क्राइंग बॉय’ असे होते. या पेंटिंगला जीयोवनी ब्रागोलिन यांनी १९८५ साली बनविले होते. त्यांनी केवळ हे एकच पेंटिंग रंगवलं नव्हतं, तर त्यांनी या पेंटिंग्जची एक मालिका तयार केली होती.

काही काळातच या पेंटिंग्जची मालिका सुप्रसिद्ध झाली. त्यामुळे या खास पेंटिंगच्या ५० हजार प्रती बनविण्यात आल्या.

===

हे ही वाचा – २०० वर्ष जुन्या पेंटिंग वरील पिवळेपणा काढल्यानंतर जे “खरं चित्र” समोर आलं ते…

===

या पेंटिंगने जीयोवनी ब्रागोलिन यांना खूप प्रसिद्धी आणि बक्कळ पैसाही मिळवून दिला. पण त्यासोबतच त्यांना आणखी एक गोष्ट मिळाली ती म्हणजे बदनामी…

 

The Crying Boy Painting-inmarathi03

 

लोकांनी या पेंटिंगला मोठ्या संख्येने विकत घेतले आणि आपल्या घराच्या भिंती सजवल्या. पण त्यानंतर या घरांमध्ये अपघातांच्या घटना घडू लागल्या.

अनेक वृत्तपत्रांनी सदर चित्र आणि त्याबद्दल जोडल्या गेलेल्या अपघातांची दखल घेतली. एका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने असा दावा केला की,

‘तो जवळपास १५ घरांमध्ये आग लागल्यावर आपल्या टीमसोबत तिथे गेला. ज्याही घरात तो आग विझवायला जायचा त्या घरात ही ‘दि क्राइंग बॉय’ ची पेंटीग दिसायची.

त्याने हेदेखील सांगितले होते, की घरातील सर्व सामान जळून जायचं पण ही ‘दि क्राइंग बॉय’ पेंटिंग कधीच जळली नाहीत.

 

The Crying Boy Painting-inmarathi06

 

याप्रकारच्या घटना वारंवार घडत होत्या, त्यामुळे लोकांनी आपल्या घरात हे पेंटिंग ठेवणे बंद केले आणि या पेंटिंगला शापित घोषित करण्यात आले.

 

The Crying Boy Painting-inmarathi07

 

एवढेच नाही तर एका वृत्तपत्रानुसार हॅलोविनला बोन फायरमध्ये या पेंटिंगच्या शेकडो प्रतिमा जाळण्यात आल्या.

संयोगवश यानंतर अश्या अपघाती घटना कमी झाल्या आणि लोकांनी असे मानून घेतले, की हे पेंटिंग शापित आहे. त्यानंतर लोकांनी हे पेंटिंग त्यांच्या घरात न लावण्यातच सुरक्षितता मानली.

पण आजही काही लोकांजवळ ही शापित मानल्या गेलेली पेंटिंग आहे आणि ते लोकं सुखरूप आहेत…

===

हे ही वाचा – आजवर कोणालाही सोडवता न आलेली ७ रहस्यमय कोडी! वाचा

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?