' भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल ह्या गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील – InMarathi

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल ह्या गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताचे माजी पंतप्रधान, भाजपचे एक प्रमुख ज्येष्ठ नेते आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेलेले अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वालियर येथे झाला.

त्यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये भारतात खूप मोठमोठे बदल घडवून आणले.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

 

Atal Bihari Vajpayee.Inmarathi
ndtvimg.com

 

वाजपेयी यांना आधुनिक राजकारणाचा भीष्म पितामह म्हटले जाते. ते आपल्या भाषणाने सगळयांचे मन मोहून घेत. त्यांच्या अफाट वक्तृत्वशैलीमुळे विरोधकही त्यांचा आदर करायचे.

विरोधक देखील त्यांच्या भाषणामुळे आणि त्यांच्या स्वभावामुळे त्यांचाकडे आकर्षित होत, त्यांना मान देत.

आज आम्ही अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील…

१. किशोरवयामध्येच वाजपेयी यांना ब्रिटीश वसाहती नियमांचा विरोध केल्यामुळे काही काळासाठी कारावासाची शिक्षा झाली होती.

२. लहानपणापासूनच साहित्य आणि कवितेचं बाळकडू अटल बिहारी वाजपेयी यांना मिळाले. यांचे वडील कृष्ण बिहारी हे संस्कृत भाषेचे आणि साहित्याचे प्राध्यापक होते.

त्यांनी घरात भरपूर पुस्तकांचा संग्रह केला होता. त्यांच्यामुळेच अटल बिहारी वाजपेयी हे देखील पुढे चालून कविता करायला लागले.

 

Atal Bihari Vajpayee.Inmarathi1
ndtvimg.com

 

३. आरएसएसचे मासिक चालवण्यासाठी १९५० च्या सुरुवातीला वाजपेयींनी कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडले. पुढे त्यांनी आरएसएस मधून राजकारणात प्रवेश केला आणि पुढे भाजपाचा खंबीर आवाज म्हणून ते उदयास आले.

४. त्यानंतर वाजपेयी हे भारतीय जनता संघाचे संस्थापक श्याम प्रसाद मुखर्जी यांचे निकटवर्ती आणि सहकारी बनले.

५. श्याम मुखर्जी यांच्याकडून बॅटन घेऊन १९५७ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी लोकसभेची पहिली निवडणूक लढवली.

 

Atal Bihari Vajpayee.Inmarathi2
indiatimes.com

६. अटल बिहारी वाजपेयी हे कॉंग्रेस पक्षाव्यतिरिक्त पहिल्या सरकारचे प्रमुख बनले आणि त्यांना पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ देण्यात आला होता.

७. अटलजींचा स्वभाव शांत होता. त्यांना कोणी कधी रागात असलेलं पाहिले नव्हतं. ते त्यांच्यासोबत काम करणाऱ्यावर कधी रागावत नसत. पण जे त्यांच्या जवळचे होते त्याना अटलजींचा चेहरा बघूनच कळत असे की, काही तरी चुकलंय किंवा त्यांना काहीतरी आवडले नाही.

८. १९९६ साली अटल बिहारी वाजपेयी हे स्वातंत्र्याच्या चार दशकानंतर पहिल्यांदाच काँग्रेस-विरोधी पक्षाचे पंतप्रधान बनले. याआधी बहुतेक सर्व पंतप्रधान हे कॉंग्रेसचे किंवा काँग्रेस समर्थनाचे होते, जनता सरकार चा अपवाद वगळता.

पण बहुमताच्या अभावी ते केवळ १३ दिवसच ते पंतप्रधान म्हणून राहू शकले.

 

Atal Bihari Vajpayee.Inmarathi4
abplive.in

 

 

९. एका स्थिर बहुमताने त्यांनी १३ महिन्यानंतर १९९८ पासून दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली पण AIADMK च्या सुप्रिमो जे जयललिता यांनी आपला पाठींबा काढून घेतल्यानंतर त्यांचे सरकार पुन्हा कोसळले.

१०. ते देशातील पहिलेच नेते ज्यांनी 1977 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सभेत हिंदीत भाषण केले. या आधी कोणीही तिथे हिंदीमध्ये भाषण दिले नव्हते. अटलजी यांनीच हिंदीला संयुक्त राष्ट्रांत ओळख मिळवून दिली.

११. अटल बिहारी वाजपेयी  यांनी १९९९ मध्ये पुन्हा एकदा पुनर्रचना केली आणि यावेळी एका स्थिर युतीने पूर्ण काळासाठी निवडून आले.

१२. ते नेहमी धाडसी निर्णय घेत असत. त्यांच्या कार्यकाळात ११ मे १९९८ रोजी भारताने पोखरणची अणुचाचणी केली होती. यामुळे विकसित देशांनी भारतावर खूप प्रकारचे निर्बंध देखील लादले होते.

याची कल्पना असूनही वाजपेयी यांनी न्युक्लियर स्टेट बनवण्याची जोखीम पत्करली. त्यांच्या काळातच अग्नी २ याची यशस्वी अणुचाचणी केली.

 

Atal Bihari Vajpayee.Inmarathi3
kremlin.ru

१३. वाजपेयी यांना १९९२ रोजी पद्मविभूषण, १९९४ साली लोकमान्य टिळक पुरस्कार तसेच उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार आणि २०१४ मध्ये भारतरत्न या पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.

शांत स्वभाव असूनही कधीही कुठल्या कार्यामध्ये मागे न हटलेले धाडसी व्यक्तिमत्त्व असलेले अटल बिहारी वाजपेयी यांना इनमराठी परिवारातर्फे आदरांजली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?