हे मंदिर पाहिल्यानंतर ५०० वर्षांपुर्वीही भारतीयांकडे असलेल्या सौंदर्यदृष्टीची पुन्हा एकदा साक्ष पटते
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारत हा देश एक धार्मिक देश म्हणून ओळखला जातो. येथे अनेक ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहेत. आपल्या देशातील प्रत्येक ऐतिहासिक स्थानाची एक पौराणिक कथा आपल्याला ऐकायला मिळते. अशीच एक पौराणिक कथा आहे तिरुचिरापल्ली येथील श्रीरंग येथे असणाऱ्या प्रसिद्ध श्री रंगनाथस्वामी मंदिराची.
याला श्रीरंगम मंदिर म्हणून देखील ओळखल्या जाते. हे विष्णूचे मंदिर असून ते देशातील विष्णू भाग्वांच्या १०८ मुख्य मंदिरांपैकी एक आहे.
पौराणिक कथांनुसार वैदिक काळात या ठिकाणी गौतम ऋषींचे आश्रम गोदावरीच्या किनाऱ्यावर होते. ज्यामुळे हा परिसर इतर परीसरांच्या तुलनेत जास्त हिरवागार आणि येथील जमीन अधिक सुपीक होती. दुष्काळावेळी गौतम ऋषींच्या परिसरावर दुष्काळाचा परिणाम होत नसे.
दुष्काळावेळी काही ऋषी-मुनी पाण्याच्या शोधात गौतम ऋषींच्या आश्रमात येऊन पोहोचले.
गौतम ऋषींनी देखील त्या ऋषींचे स्वागत केले, पण गौतम ऋषींच्या जवळपासचा परिसर बघून त्या ऋषींच्या मनात लालसा उत्पन्न झाली.
त्यांनी गौतम ऋषींवर गौ हत्येचा आरोप करत त्यांचे आश्रम आणि त्यांची जमीन हस्तगत केली.

त्यांचे आश्रम त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आले होते, या दुखात गौतम ऋषी श्रीरंगम येथे पोहोचले, हेथे त्यांनी भाग्वान विष्णुंची आराधना केली. त्यांची तपस्या बघून भगवान विष्णू आनंदी झाले आणि त्यांनी गौतम ऋषींना दर्शन दिले. तसेच त्यांनी वरदान म्हणून श्रीरंगम येथील संपूर्ण क्षेत्र त्यांना दिले.

यानंतर गौतम ऋषींनी भगवान ब्रह्मा यांची तपस्या केली आणि त्यांना या ठिकाणी विष्णू मंदिर बनविण्याचे वरदान मागितले, तेव्हापासून हे ठिकाण भगवान रंगनाथ यांच्या नावाने ओळखले जाऊ लागले.
तसेच हे मंदिर वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर बघण्याकरिता दुरून दुरून लोकं या ठिकाणाला भेट देतात.
दक्षिण भारतीय शैली ने सुशोभित रंगनाथ मंदिरला UNESCO ने वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा दिला आहे.

५०० वर्ष जुने हे मंदिर खडकाला कापून बनविण्यात आले होते. तेव्हा ना मोठ-मोठी मशीन्स होती नाही टेक्नॉलॉजी. या मंदिराच्या भिंती ३२,५९२ फुट पर्यंत पसरलेली आहेत, या मंदिरात १७ मोठे गोपुरम, ३९ पवेलीयन, ५० श्राईन, ९ तलाव आणि १०० स्तंभ आहेत.

या स्तंभांची विशेषता म्हणजे केवळ १५-२० फुट उंच असून देखील आजही हे या मंदिराला आधार देत उभे आहेत. यापैकी काही स्तंभांवर भगवान विष्णू यांच्या प्रतिमा कोरलेल्या आढळतात. हे स्तंभ एका रांगेत अश्या प्रकारे उभे करण्यात आले आहेत की, बघितल्यावर ते एखाद्या बांबूच्या जंगलाप्रमाणे दिसतात.
हे सर्व उभारताना केल्या गेलेल्या मेजरमेन्ट्स – मोजमापाची, अप्रतिम स्थापत्याची कल्पना येऊन थक्क व्हायला होते. त्याकाळचे विज्ञान किती प्रगत होते ह्याची खात्री पटते.

जर कधी तिरुचिरापल्ली येथे जाण्याची संधी मिळाली तर या मंदिराला नक्की भेट द्या.
हे मंदिर तुम्हाला भारताचा प्राचीन आणि धार्मिक इतिहास किती प्रगल्भ आणि मजबूत आहे, याची जाणीव नक्की करवून देईल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.