' खरं वाटणार नाही पण ह्या महाविद्यालयात दिली जाते अपयशी होण्याची पदवी – InMarathi

खरं वाटणार नाही पण ह्या महाविद्यालयात दिली जाते अपयशी होण्याची पदवी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्याला घरात असो वा शाळेमध्ये प्रत्येकवेळी हेच सांगितल्या जाते कि कसे जिंकावे. जीवनात यशस्वी व्हावे असे कोणाला वाटत नाही. प्रत्येकाला जीवनामध्ये आपण यशस्वी बनावे आणि काही तरी मोठे करावे अशी इच्छा असते.

पण जीवनात कधी–कधी असे अपयश येते, जे आपल्याला आतून खचून टाकते आणि त्यातून परत उठायला आपल्याला जमत नाही. त्यामुळे आपल्यामध्ये कोणतेही अपयश पचवण्याचे बळ असणे गरजेचे आहे.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका महाविद्यालयाबाबत सांगणार आहोत, ज्या महाविद्यालयात अपयशी कसे व्हावे याची पदवी दिली जाते.

चला तर मग जाणून घेऊया, या महाविद्यालयाबद्दल जिथे असे आगळेवेगळे सर्टिफिकेट दिले जाते.

 

smith college usa InMarathi

 

अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स विद्यापीठातील स्मिथ महाविद्यालयात एका विशेष वर्गात विद्यार्थ्यांना नापास कसे व्हायचे, म्हणजे अपयशाला कसे सामोरे जायचे याचे धडे दिले जात आहेत. अपयश स्वीकारण्यासाठी हा उपाय योजण्यात आला आहे.

महाविद्यालयात ”फेलिंग वेल” नावाने चालवल्या जाणाऱ्या वर्गात कोणत्याही त्रासाविना विद्यार्थी मोकळेपणाने चर्चा करतात. महाविद्यालयीन जीवनात चांगले विद्यार्थी नसलेले किंवा अपयशी ठरलेल्या यशस्वी व्यक्तींना महाविद्यालयात बोलावले जाते.

 

massachusetts university in usa 1 InMarathi

 

आयुष्यात एखाद्या वळणावर नापास होणे फार वाईट बाब नाही हे विद्यार्थ्यांना सांगण्याचा मुख्य उद्देश हा वर्ग सुरू करण्यामागे आहे. सर्वांनी अपयश स्वीकारण्यासाठी तयार राहिले पाहिजे.

एका सत्रात जवळपास अर्ध्याहून जास्त विद्यार्थ्यांना बी ग्रेडपेक्षा कमी यश मिळाले होते. या सर्वांना सकारात्मक वातावरण देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे अपयश सांगण्याचीही स्पर्धा होते.

 

massachusetts university in usa 2 InMarathi

 

एका स्पर्धेत एक विद्यार्थी म्हणाला, मी पहिल्या लेखी परीक्षेत नापास झालो होतो. दुसऱ्या विद्यार्थ्याने सांगितले की, पदवी कधीपर्यंत पूर्ण करणार असे आईने अनेकदा विचारले होते. पुढच्याच वर्षी तिला पदवी दाखवली तेव्हा चकित झाली. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांनीही अनुभव सांगितले.

इंग्रजीचे प्राध्यापक म्हणाले, मी कॉलेजमध्ये अनेकदा नापास झालो. अमेरिकन स्टडीजच्या प्राध्यापकाने सांगितले की, मी चॉकलेट केरेमल्स शीर्षकाची कविता लिहिली. २१ पेक्षा जास्त मासिकांनी ती नाकारली आहे. रेचेल सिमोन्स या कार्यक्रमाच्या कर्त्याधर्त्या व लीडरशिप डेव्हलपमेंट तज्ज्ञ आहेत.

 

certificate of failure in massachusetts university InMarathi

 

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना अपयशाचे प्रमाणपत्र दिले जाते. त्यात लिहिलेले असते, आम्ही अधिकृतरीत्या सांगतो की, नाते, मैत्री, परीक्षा, वर्ग, ई-मेल, मेसेज, शाळा, कॉलेज, स्पोर्ट्स अशा कोणत्याही क्षेत्रात अयशस्वी झालो आहोत. काही निवडताना किंवा निर्णय घेताना गंभीर चूक केली आहे. मात्र, हे पूर्णपणे योग्य आहे आणि सर्वात मोठी बाब म्हणजे विश्वासू व चांगला माणूस आहे.

 

massachusetts university in usa 3 InMarathi

 

अशी ही पदवी ऐकताना थोडी विचित्र वाटत असली, तरी देखील आपल्यातला आत्मविश्वास वाढला जातो, हे मात्र नक्की आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?