' कुठे समोसा तर कुठे किंडरजॉय, जगातील अनेक देशांत खाण्याच्या या १० वस्तू बॅन आहेत – InMarathi

कुठे समोसा तर कुठे किंडरजॉय, जगातील अनेक देशांत खाण्याच्या या १० वस्तू बॅन आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

खाण्याची आवड नसणारी व्यक्ती या जगात शोधून सुद्धा सापडणार नाही. खाण्याचं नाव जरी काढलं तरी लोकांचे चेहरे अगदी खुलून जातात. तुम्ही कधी कुठल्या फुडी म्हणजेच ज्याला खाण्याचं वेड असेल अश्या कुणाशी बोलला आहात का?

त्यांच्याशी खाण्याविषयी बोलताना तुम्हाला नक्कीच भन्नाट अनुभव आला असेल. अनेकांसाठी तर खाण्याव्यतिरिक्त इतर गोष्टच महत्त्वाची नसते.

आजकाल असे अनेक फूड लव्हर्स आपल्याला बघायला मिळतात. आपणही त्यातलेच एक असाल. पण जर कुठे या खाण्याच्या पदार्थांवरच बंदी असेल तर!! तुम्ही म्हणालं हा तर अन्याय आहे.

पण असे अनेक फूड प्रोडक्ट्स आहेत ज्यांच्यावर अनेक देशांत चक्क बॅन आहे. आज आम्ही आपल्यासाठी अशाच काही प्रोडक्ट्सची माहिती घेऊन आलो आहोत…

 

haldiram inmarathi

 

आपला आवडता स्नॅक ब्रँड म्हणजे हल्दीराम! पण यूएसएच्या फूड अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशनने हल्दीरामच्या सर्व फूड प्रोडक्ट्सला बॅन केले आहे. त्यांच्या परीक्षणात हल्दिरामचे फूड प्रोडक्ट्स चांगले नसल्याचं सिद्ध झालं.

 

Vicks-inmarathi
thehindu.com

 

D-Cold, Vicks Action 500, Enteroquinol, Analgin, Syspride ही औषधं तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात सापडतील. पण जगातील अनेक ठिकाणी या औषधांवर बॅन आहे.  यातील काही औषधांवर तर, भारतात सुद्धा बंदी घालण्यात आली होती.

मात्र २०१६ साली घातलेली बंदी फार काळ अस्तित्वात राहिली नाही.

 

khas-khas-inmarathi
saydiet.wordpress.com

 

खसखस ज्याशिवाय अनेक भारतीय पदार्थ अपूरे वाटतात, पण हीच खसखस सौदी अरब, युएई, तायवान आणि सिंगापूर येथे बॅन आहे.

 

india facts-inmarathi03
thebetterindia.com

 

समोसा म्हणजे भारतीयांचा आवडता पदार्थ… भारतीय तर समोसा लव्हर्स असतात. कुठल्याही प्रसंगावर कुठल्याही वेळी जर समोसा समोर आला तर आपण स्वतःला रोखू शकत नाही. पण या समोस्याच्या त्रिकोणी आकारामुळे हा सोमालिया या देशात बॅन आहे.

 

kinder joy-inmarathi
biggerbolderbaking.com

 

‘किंडर जॉय’ आजच्या पिढीच्या लहान मुलांचं आवडतं आहे. पण या फूड आयटमवर युएस आणि इतर अनेक देशांत बॅन लावण्यात आला आहे.

food-color-inmarathi
biggerbolderbaking.com

 

रस्त्याने येताना जर कुठे गरम जिलेबी जर कधी आपल्या नजरेस पडली तर आपण नक्कीच त्यावर तव मारत असाल. या जिलेबित फूड कलर वापरण्यात येतो. तसेच भारतात अनेक पदार्थांत फूड कलर वापरला जातो. पण जगातील अनेक देशांत या फूड कलरवर बॅन आहे.

 

 

ban on food-inmarathi
wittyfeed.com

 

अमेरिकेत जर कुठल्या फूड आयटमवर त्याचं नाव आणि वापरण्यात आलेली सामुग्री लिहिलेली नसेल तर ते फूड आयटम तिथे बॅन असते.

 

olestra-inmarathi
allwomenstalk.com

 

अनेक फॅट फ्री प्रोडक्ट्समध्ये ‘OLESTRA’ नावाच्या आर्टिफिशियल फॅटचा वापर करण्यात येतो, पण यावर युकेमध्ये बॅन आहे.

 

mirabelle plum-inmarathi
coconutandlime.com

 

मीरबेलल प्लम हे फ्रान्समध्ये उत्पादित करण्यात येणारे एक फळ आहे जे अमेरिकेत बॅन आहे.

 

contaminated-milk-inmarathi
lovindublin.com

 

आजकाल कॉन्टॅमिनेटेड दुधाचा वापर वाढला आहे. त्यामुळे जगातील अनेक देशात कॉन्टॅमिनेटेड दुधावर बॅन लावण्यात आला आहे.

हे होते ते १० फु प्रोडक्ट्स ज्यांच्यावर अनेक देशात बॅन लावण्यात आले आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?